Wagon R EV : टोयोटाची इलेक्ट्रिक कार भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास?

Maruti Suzuki गेल्या काही वर्षांपासून Wagon R EV ची चाचणी घेत आहे. परंतु कंपनीने या कारच्या लाँचिंगबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Wagon R EV : टोयोटाची इलेक्ट्रिक कार भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या काय असेल खास?
Toyota Electric Car (PS- Gaadiwale)
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 10:57 PM

मुंबई : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) गेल्या काही वर्षांपासून वॅगन-आर ईव्हीची (Wagon R EV) चाचणी घेत आहे, परंतु कार निर्मात्या कंपनीने या कारच्या लाँचिंगबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. याऊलट, इंडो-जपानी कार उत्पादक कंपनीने बऱ्याचदा सांगितले आहे की, पारंपारिक आयसी-इंजिन वाहनांपेक्षा ईव्हीच्या अधिक किंमती आणि विक्रीचं प्रमाण कमी असल्यामुळे इलेक्ट्रिक वाहन अव्यवहार्य असेल. तथापि, या कारबाबत काही नव्या डेव्हलपमेंट होत आहेत आणि आम्ही लवकरच वॅगन-आर ईव्ही भारतीय बाजारात लाँच करु. (Maruti Suzuki Wagon R EV Toyotas upcoming electric car seen in India)

अलीकडेच, कोणत्याही कव्हरशिवाय टेस्टिंगदरम्यान इलेक्ट्रिक हॅचबॅकचे टेस्टिंग मॉडेल पाहायला मिळाले होते. टेस्टिंग मॉडेल वाहनाचं बाहेरचं डिझाईन दर्शविणारे काही फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. जरी एकूण स्टाईलच्या बाबतीत हे वाहन नियमित वॅगन-आरसारखेच असले तरी त्यामध्ये काही बदल केले आहेत, नवीन बंपर, वेगळी साइड प्रोफाइल, पूर्णपणे नवीन फ्रंट फॅसिआ आणि अंडरबॉडी देखील मिळू शकते. वॅगन-आर ईव्हीच्या बाहेरील बाजूस एलईडी लाइटिंग आहे, ज्याच्या समोर एक शार्प-लुकिंग स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन आहे. तथापि, येथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारवरील टोयोटा बॅजची उपस्थिती!

Ignis सारखं डिझाईन

अ‍ॅलोय व्हील्सचे डिझाइन इग्निससारखे आहे परंतु मध्यभागी टोयोटा बॅज आहे. टोयोटा आणि सुझुकीची जागतिक भागीदारी झाली आहे, जी मारुती सुझुकी आणि टोयोटा किर्लोस्कर मोटरपर्यंत विस्तारित आहे. यासाठी मारुतीची वाहने (जसे की Glanza आणि Urban Cruise) टोयोटा ब्रँडअंतर्गत भारतीय बाजारात रीबॅज केली गेली आहेत.

टोयोटाची भारतात प्रीमियम ब्रँड अशी प्रतिमा आहे, म्हणून एका विशिष्ट उत्पादनाच्या नावाला अधिक लोकप्रियता मिळते. टोयोटाने म्हटलं आहे की, मारुती कंपनी हे वाहन नंतर स्वत:च्या ब्रँडअंतर्गत लाँच करु शकते.

सिंगल चार्जवर 120 किमी रेंज

टोयोटा बॅज आणि नवीन नावाने वॅगन-आर ईव्ही विक्रीसाठी कधी उपलब्ध केली जाईल, हे पाहणे मनोरंजक असेल. ही आगामी टोयोटा इलेक्ट्रिक हॅचबॅक या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीस लाँच केली जाण्याची शक्यता आहे, या कारची सुरुवातीची किंमत सुमारे 9.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी असू शकते. असे म्हटले जात आहे की, ही कार एकदा फुल चार्ज केल्यानंतर 120 किमीपेक्षा जास्त रेंज देईल.

इतर बातम्या

सिंगल चार्जवर 95Km रेंज, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला देशात सर्वाधिक पसंती

सिंगल चार्जमध्ये 70 ते 100 किमी धावेल ही सायकल, जाणून घ्या याचे खास फिचर्स

अवघ्या एका मिनिटात बॅटरी बदला, Gogoro Viva Electric Scooter भारतात लाँच होणार

(Maruti Suzuki Wagon R EV Toyotas upcoming electric car seen in India)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.