Maruti Suzuki 3 नव्या SUV लाँच करणार, जाणून घ्या तुमच्यासाठी परफेक्ट कार कोणती?
मारुती सुझुकी (Maruti Suzuki) भारतीय बाजारासाठी बर्याच नवीन एसयूव्हीवर काम करत आहे. (Maruti Suzuki to Launch 3 New SUVs In India)
मुंबई : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) भारतीय बाजारासाठी बर्याच नवीन एसयूव्हीवर काम करत आहे. हा ब्रँड लवकरच या वर्षाच्या अखेरीस नवीन विटारा ब्रेझा कार लाँच करू शकेल. यानंतर, कंपनी 5 डोर जिम्नी (Jimny) आणि नंतर एक नवीन मध्यम आकाराची एसयूव्ही बाजारात सादर करेल. म्हणजेच, जर तुम्ही मारुती कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आपल्यासाठी ही एक चांगली बातमी आहे. (Maruti Suzuki will Launch 3 New SUVs In India, check details)
अहवालात असेही सांगितले जात आहे की, ही कंपनी बलेनो आधारित क्रॉसओवरवर काम करत आहे जी एस-क्रॉसची जागा घेईल. मारुती सुझुकी या वर्षाच्या अखेरीस सेकेंड जनरेशन विटारा ब्रेझा लाँच करु शकते, परंतु कंपनीने अद्याप याबाबत पुष्टी केलेली नाही. नवीन मॉडेल HEARTECT प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल ज्यावर अर्टिगा देखील तयार केली गेली आहे. नवीन मॉडेलमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाईल.
विटारा ब्रेझाचे फीचर्स
नवीन ब्रेझामध्ये 1.5L K15B पेट्रोल इंजिन दिले जाईल. त्याचबरोबर त्यात मोठी बॅटरी देण्याचीही योजना आखली जात आहे. याद्वारे, कंपनी अधिक शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर देखील प्रदान करू शकते. एसयूव्हीमध्ये फॅक्टरी फिटेड सनरूफ, वायरलेस चार्जर, एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, 6 एअरबॅग आणि बरेच काही असेल. ही एसयूव्ही ह्युंदाय व्हेन्यू, किआ सोनेट आणि टाटा नेक्सॉनला टक्कर देणार आहे.
5 डोर मारुती Jimny
मारुती सुझुकी Jimny SUV वरदेखील काम करत आहे, जी भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच केली जाणार आहे. 5 डोर Jimny ची याआधीच युरोपमध्ये चाचणी झाली आहे. अशा परिस्थितीत ही कार जुलै 2021 पर्यंत भारतीय बाजारात दाखल केली जाऊ शकते. नवीन अहवालानुसार, या कारचा व्हीलबेस 300 मिमी लांबीचा असेल.
नवीन मॉडेलमध्ये टर्बोचार्ज्ड इंजिन आणि माइल्ड हायब्रीड सिस्टम मिळेल. यात तुम्हाला 1.4 लीटरचे टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते, जे स्विफ्ट स्पोर्टमध्येही दिले गेले आहे. 1.5 लीटर एनए पेट्रोल इंजिन भारतीय विशिष्ट मॉडेलमध्ये दिले जाईल. यात 3 डोर मॉडेल देखील असेल. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दोन्ही पर्याय ऑफरवर असतील.
मारुती-टोयोटा मिड साइज SUV
मारुती सुझुकी आणि टोयोटा नवीन मध्यम आकाराच्या एसयूव्हीवर काम करत आहेत. ही एसयूव्ही ह्युंदाय क्रेटा, किआ सेल्टॉस आणि आगामी VW Taigun, स्कोडा Kushaq आणि MG अॅष्टर यांच्या समोर ठेवली जाईल. टोयोटाच्या नवीन DNGA प्लॅटफॉर्मवर नवीन एसयूव्ही तयार केली जात आहे. टोयोटाच्या प्रॉडक्शन प्लांटमध्ये नवीन एसयूव्ही मॉडेल तयार केले जाईल.
इतर बातम्या
Baleno, Ciaz, Nexa सह Maruti च्या गाड्यांवर 50000 रुपयांचा बंपर डिस्काऊंट
बंपर ऑफर! मारुतीची CNG कार अवघ्या 34 हजारात खरेदीची संधी
Mahindra वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय
(Maruti Suzuki will Launch 3 New SUVs In India, check details)