Maruti XL6 2022: मारुतीची शानदार कार भारतात लाँच, गाडी रिव्हर्स करताना टक्कर होणार नाही

मारुतीने भारतात आपली नवीन कार लॉन्च केली आहे. मारुती सुझुकी XL6 फेसलिफ्ट (Maruti Suzuki XL6 facelift) असे या कारचे नाव आहे. या कारमध्ये 360 व्ह्यू कॅमेरा (360 View Camera) आणि सुझुकी कनेक्ट सारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत.

Maruti XL6 2022: मारुतीची शानदार कार भारतात लाँच, गाडी रिव्हर्स करताना टक्कर होणार नाही
Maruti Suzuki XL6 2022 Image Credit source: Akshay Chorge
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 3:37 PM

2022 Maruti Suzuki XL6 Price: मारुतीने भारतात आपली नवीन कार लॉन्च केली आहे. मारुती सुझुकी XL6 फेसलिफ्ट (Maruti Suzuki XL6 facelift) असे या कारचे नाव आहे. या कारमध्ये 360 व्ह्यू कॅमेरा (360 View Camera) आणि सुझुकी कनेक्ट सारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत. ही प्रीमियम सेगमेंट MPV कार आहे. थ्री रो सीट्स असलेल्या या कारमध्ये 16 इंचांचे अलॉय व्हील देखील मिळतात. तसेच, कंपनीने पुढच्या सीट्स अधिक आरामदायी केल्या आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 11.29 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारला 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, ज्यामध्ये 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन युनिट देण्यात आले आहे.

मारुती XL6 भारतात पहिल्यांदाच 2019 मध्ये सादर करण्यात आली होती. ही कार Ertiga चं प्रीमियम व्हर्जन आहे. नवीन अर्टिगा गेल्या आठवड्यात भारतात सादर करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही लेटेस्ट कार एमपीव्ही सेगमेंटमध्ये कंपनीला लीडर बनवण्यात मदत करू शकते. तसेच, या कारच्या मदतीने, कंपनी Kia Carence ला मागे टाकण्याचा प्रयत्न करेल. Kia Carence ची सुरुवातीची किंमत 9.59 लाख रुपये ते 16.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

2022 Maruti Suzuki XL 6 चे कलर ऑप्शन

मारुतीची ही नवीन थ्री-रो कार सेलेस्टियल ब्लू, ब्रेव्ह खाखी, आर्क्टिक व्हाइट, ग्रँडर ग्रे, ऑप्युलंट ग्रे आणि स्लेन्डर्ड सिल्व्हर रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये खाकी, रेड आणि सिल्व्हर रंगांसह ड्युअल टोन सेटअप देखील दिसेल. यामध्ये ब्लॅक रुफचा पर्याय उपलब्ध आहे.

2022 Maruti Suzuki XL 6 ची केबिन

यामध्ये सुझुकी कनेक्टचे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये मालकाला कारशी संबंधित माहिती स्मार्टफोनवर पाहता येते. यात जवळपास 40 कनेक्टेड फीचर्स आहेत. कंपनीने या कारमध्ये 7 इंचाचा डिस्प्ले दिला आहे.

2022 मारुती सुझुकी एक्सएल 6 चे सेफ्टी फीचर्स

मारुती सुझुकीने आपल्या नवीन कारमध्ये 360 व्ह्यू कॅमेरा दिला आहे, जो कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या बलेनो कारमध्ये सादर करण्यात आला होता. मारुतीची ही एमपीव्ही कार हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामध्ये क्वाड एरबॅग्सचा वापर करण्यात आला आहे. यात दोन फ्रंट आणि दोन साईड एअरबॅक्स आहेत.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.