SUV चा ट्रेंड असतानाही Maruti च्या छोट्या कारनी मारली बाजी, इतका वाढला सेल

मारुती उद्योगाने भारतीय बाजारात छोट्या कारद्वारे मार्केट काबिज केले होते. आता बहुतांशी लोक सुव्ह कार खरेदी करीत असतानाही भारतीय बाजारात मारुतीच्या छोट्या कारचा जलवा कायम आहे. ही छोट्या कारमुळे शहरी भागात कार पार्किंग आणि ट्रॅफीक जाममध्ये सुटका होत आहे.

SUV चा ट्रेंड असतानाही  Maruti च्या छोट्या कारनी मारली बाजी, इतका वाढला सेल
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 1:03 PM

भारत जपानला मागे टाकत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचले आहे. एकीकडे भारतात रस्त्यांचे जाळे वाढत असताना कार घेणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. आधी हॅचबॅक कारना पसंती होती आणि नंतर SUV घेण्याची फॅशन आली. परंतू तरीही मारुती सुझुकीच्या छोट्या कारचा दबदबा कायम आहे. नोव्हेंबर महिन्यात मारुती सुझुकीने डिझायर ( Dzire ) कारचा नवा अवतार लाँच केला होता. यानंतर फाईव्ह स्टार रेटिंगसह या गाडीने बाजारात चांगली जागा तयार केली आहे. डिझायर मारुती सुझुकीला लकी ठरली असून डिसेंबरमध्ये कंपनीचे घरगुती बाजारपेठ, निर्यात आणि एकूण विक्रीत वाढ झाली आहे.

मारुतीच्या या कारना मागणी

छोट्या कारमध्ये मारुती सुझुकीच्या मारुती सुझुकीच्या अल्टो  ( Alto ) आणि एस प्रेसो ( S Presso ) या कारना मोठी मागणी पाहायला मिळत आहे. कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये Celerio, Baleno, Swift, Dzire, WagonR आणि Ignis या कार ग्राहकांना जास्त पसंत येत आहेत. साल २०२४ मध्ये मिनी आणि कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये कंपनीने ६२,३२४ युनिट्सची विक्री केली आहे.साल २०२३ मध्ये या सेगमेंटमध्ये कंपनीने ४८,२९८ कारची विक्री केली होती.

मध्यम आकाराच्या कारची विक्री –

मध्यम आकाराच्या सेगमेंटमध्ये Ciaz ची बाजारात खूप मागणी आहे. पॅसेंजर कारचा विचार करता Fronx, Breeza, Grand Vitara, XL6, Jimny, Ertiga आणि Invicto सारख्या युटिलिटी व्हेईकलने देखील मार्केटमध्ये जबरदस्त पाय रोवला आहे. युटिलिटी व्हेईकल सेगमेंटमध्ये गेल्या वर्षी कंपनीने ५५,६५१ युनिट्सची विक्री केली आहे. तर २०२३ मध्ये याच सेगमेंटमध्ये ४५,९५७ युनिट्सची विक्री झाली होती.

हे सुद्धा वाचा

लाईट कमर्शियल वाहनात मारुती सुझुकीच्या सुपर कॅरी वाहनाने मार्केटमध्ये धमाल केली आहे. पॅसेंजर, लाईट कमर्शियल व्हेईकल आणि युटिलिटी व्हेईकलद्वारे मारुती सुझुकीने भारतीय बाजारात आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.

किती वाढली विक्री ?

मारुती सुझुकीने घरगुती बाजारात साल २०२३ मध्ये एकूण १,०६,४९२ युनिट्सची विक्री केली होती. तर साल २०२४ मध्ये कंपनीच्या विक्रीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. साल २०२४ मध्ये मारुती सुझुकीने घरगुती बाजार पेठेत एकूण १,३२,५२३ युनिट्सची विक्री केली आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.