लवकरच येत आहे मारूतीची सर्वात महाग कार, इनोव्हाला देणार टक्कर, किती असणार किंमत?

. मारुतीच्या नवीन (Maruti Upcoming Car) MPV चे नाव काय असेल हे सध्यातरी माहीत नाही. हे TNGA-C प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल आणि टोयोटाच्या बिदादी प्लांटमध्ये तयार केले जाईल.

लवकरच येत आहे मारूतीची सर्वात महाग कार, इनोव्हाला देणार टक्कर, किती असणार किंमत?
मारूती कारImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 8:51 PM

मुंबई : मारुती सुझुकी लवकरच नवीन MPV आणणार आहे. ही गाडी टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या धर्तीवर बनवला जाईल. टोयोटा आणि मारुती भारतात  कार बनवतात. दोन्ही कंपन्या त्यांच्या संबंधित ब्रँडिंगसह समान कार स्वतंत्रपणे लॉन्च करतात. मारुतीची नवी कारही याच पद्धतीने येणार आहे. पेट्रोल-हायब्रीड पर्यायासह येणारी मारुतीची ही दुसरी कार असेल. मारुतीच्या नवीन (Maruti Upcoming Car) MPV चे नाव काय असेल हे सध्यातरी माहीत नाही. हे TNGA-C प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल आणि टोयोटाच्या बिदादी प्लांटमध्ये तयार केले जाईल. नवीन मारुती एमपीव्ही हे कंपनीचे सर्वात महागडे मॉडेल असेल.

असे असणार नवीन मारुती MPV चे डिझाईन

या कारमध्ये ट्रिपल एलईडी डीआरएल सेट उपलब्ध असेल. याशिवाय, यात क्रोम फिनिश ग्रिल, एलईडी हेडलाइट, फ्लेर्ड व्हील आर्च, एलईडी टेललाइट आणि 18-इंच अलॉय व्हील असतील.

नवीन मारुती MPV चे इंटीरियर

नवीन मारुती कारचे इंटीरियर इनोव्हा हायक्रॉस सारखे असेल. यात ड्युअल-टोन डॅशबोर्ड, पॅनोरामिक सनरूफ आणि आरामदायी सीट मिळतील. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, ते 10.1-इंच इंफोटेनमेंट सिस्टम आणि मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोलने सुसज्ज असेल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यामध्ये ADAS (Advanced Driver Assist System) आणि 6 एअरबॅग मिळतील.

हे सुद्धा वाचा

नवीन मारुती एमपीव्ही इंजिन

मारुती सुझुकीची नवीन एमपीव्ही दोन इंजिन पर्यायांसह खरेदी केली जाऊ शकते. यापैकी एक 2.0-लिटर पेट्रोल इंजिन असेल, जे CVT गिअरबॉक्सशी जोडले जाईल. हा सेटअप 174hp पॉवर आणि 197Nm टॉर्क जनरेट करतो. दुसरे हायब्रिड सेटअप असलेले 2.0-लिटर इंजिन असेल, जे ई-CVT गिअरबॉक्सशी जोडलेले असेल. त्याचे पॉवर आउटपुट 186hp आणि 187Nm असेल.

नवीन मारुती MPV किंमत

मारुती सुझुकीची ही नवीन MPV येत्या काही महिन्यांत लॉन्च होऊ शकते. त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 18 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.