Maruti Swift बाजारात आली दिमाखात! मायलेजच्या जोरावर इतर कारची होऊ शकते सुट्टी

Maruti Swift | मारुतीच्या नवीन स्विफ्टबद्दल बाजारात कमालीची उत्सुकता होती. आता ही नवीन दमदार कार बाजारात उतरली आहे. ही कार जपानमधील डीलर्सकडे पोहचली आहे. तिची जपानमधील कामगिरी भारतीय बाजारासाठी खास असणार आहे. मायलेजबाबत या कारने आशादायक चित्र निर्माण केल्याने इतर कारला आवाहन मिळू शकते.

Maruti Swift बाजारात आली दिमाखात! मायलेजच्या जोरावर इतर कारची होऊ शकते सुट्टी
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 10:57 AM

नवी दिल्ली | 16 जानेवारी 2024 : मारुतीची नवीन स्विफ्टचा भारतात अधिरतेने वाट पाहण्यात येत आहे. सध्या कंपनीने ही प्रतिक्षा जपानमध्ये तरी एकदाची संपवली आहे. जपानमधील डिलर्सकडे ही कार पोहचली आहे. सुझुकीने ही लोकप्रिय कार त्यांच्या डीलर्सकडे पोहचवली आहे. लवकरच ही कार जपानच्या रस्त्यांवरुन धावताना दिसेल. ही कार लवकरच भारतात पण लाँच होणार आहे. जपानमधील मारुती स्विफ्टसारखीच ही कार असण्याची शक्यता आहे. कंपनीने 4 थ्या जनरेशनची स्विफ्ट जपानमधील मोबिलीटी शो 2023 मध्ये उतरवली होती. जपानमध्ये ही कार पोहचल्याने आता भारतीय ग्राहकांची प्रतिक्षा पण संपणार आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये

सुझुकीच्या 4 थ्या जनरेशनची स्विफ्ट खास आहे. यामध्ये अनेक जोरदार फीचर्स आहेत. नवीन हेडलँप, LED DRLs आणि फॉग लँप यांचा यामध्ये समावेश आहे. तर फ्रंट ग्रिलचे डिझाईन मागील कार प्रमाणेच आहे. यामध्ये स्पोर्टी लूक आणि फील मिळेल. नवीन डिझाईन ग्राहकांच्या पसंतीला पडेल. फ्रंट बंपर मेटेलिक एलिमेंटसह अपडेट करण्यात आले आहे. बंपरच्या डिझाईनमध्ये पण बदल करण्यात आला आहे. एकूणच लूक आकर्षक असल्याने पाहता क्षणीच ही कार ग्राहकांच्या मनात घर करण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
  • या कारमध्ये रिअर स्टँडर्ड डोअर हँडल देण्यात आले आहेत
  • अपडेटेड व्हर्जनमध्ये कंपनीने नवीन एलॉय व्हीलचा वापर केला आहे
  • ब्लॅक कलरचे पिलर्स आणि बॉडी कलर्स पूर्वी प्रमाणेच ठेवण्यात आले आहेत
  • मागील बाजून नवीन टेल लँप आहेत, त्याचा लूक हटके ठेवण्यात आला आहे
  • नवीन स्विफ्टमध्ये मोनोटोन आणि ड्युअल टोन शेड्स अशा कलरचा पर्याय आहे

अजून काय आहे खास

इंटिरिअरमध्ये पण बरेच बदल करण्यात आले आहे. डॅशबोर्ड, सेंटर कन्सोल, एसी वेंटमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना एकदम नवीन लूक आणि फ्रेश फील येतो. यामध्ये 9 इंचाची फ्री स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेन्मेट सिस्टम देण्यात आले आहे. हे वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि एप्पल कारप्लेला सपोर्ट करते. यामध्ये एक नवीन ऑटो क्लायमेट कंट्रोल पॅनल आहे. त्यावर बलेनोचा प्रभाव दिसून येतो. एकूणच हे मॉडेल खास आहे.

  • नवीन जनरेशनच्या स्विफ्टमध्ये 1.2 लिटर, 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे
  • यामध्ये 48 वोल्टचा सेल्फ चार्जिंग हायब्रिड सेटअप असेल
  • यामुळे मायलेज जवळपास 25 किलोमीटर प्रति लिटर होण्याची शक्यता आहे
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.