शानदार…जबरदस्त…! मॅटरच्या इलेक्ट्रिक बाइकची जोरदार चर्चा, सिंगल चार्जमध्ये धावते 125 किमी
मॅटर एनर्जीने भारतात आपली पहिली वहिली इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. या बाइकचं नाव मॅटर एरा असं ठेवण्यात आलं आहे. गियर असलेली पहिली इलेक्ट्रिक बाइट आहे.
1 / 5
मॅटर एरा ही स्ट्रीट फायटर इलेक्ट्रिक बाइक असून आकर्षक डिझाईन आहे. यामध्ये एलईडी लाइटिंग सिस्टीम, ऑटो-कॅन्सलिंग इंडिकेटर, स्प्लिट सीट्स, स्प्लिट ग्रॅब रेल, क्लिप-ऑन हँडलबार देण्यात आलं आहे. ग्रे अँड निऑन, ब्लू अँड गोल्ड, ब्लॅक अँड गोल्ड- रेड आणि ब्लॅक अँड व्हाइट अशा चार ड्युअल टोन रंगांचे पर्याय दिले आहेत. (PS: Matter Energy)
2 / 5
मॅटर एरामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाचा टच डिस्प्ले दिला आहे. याशिवाय पार्क असिस्ट, कीलेस ऑपरेशन्स, ओटीए अपडेट्स यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. त्याच वेळी, टॉप-मॉडेल 5000+ व्हेरियंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. (PS: Matter Energy)
3 / 5
या बाइकमध्ये लिक्विड-कूल्ड, 5kWh बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी एकदा फुल चार्ज केली की, 125 किलोमीटरपर्यंतची रेंज देते, असा कंपनीचा दावा आहे. त्याची लिक्विड-कूल्ड मोटर 10.5kW असून वजन 180 किलोग्रॅम आहे. बॅटरी पॅकचे वजन सुमारे 40 किलो आहे. ई-बाईकमध्ये 4-स्पीड गिअरबॉक्स आहे. ही बाईक ड्युअल-चॅनल एबीएसने सुसज्ज आहे. (PS: Matter Energy)
4 / 5
मॅटर एरा बाईक मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद, कोलकाता आणि अधिक सारख्या मेट्रो आणि टियर 1 शहरांमध्ये बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. कंपनी बॅटरी पॅक आणि ई-बाईकवर 3 वर्षांची वॉरंटी देत आहे. (PS: Matter Energy)
5 / 5
मॅटर एरा इलेक्ट्रिक बाइक Aera 5000 आणि Aera 5000+ या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्यांची किंमत अनुक्रमे 1.44 लाख आणि 1.54 लाख रुपये आहे. ही किंमत एक्स-शोरूमनुसार आहे. (PS: Matter Energy)