पेट्रोल पंपप्रमाणेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ‘चार्जिंग’ स्टेशन उघडणार, चार्जिंगसाठी येणार ‘इतका’ खर्च!

जसे इतर गाड्यांसाठी पेट्रोल पंप, गॅस स्टेशन आहेत, तसेच आता लवकरच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी देखील चार्जिंग स्टेशन बनवण्यात येणार आहेत.

पेट्रोल पंपप्रमाणेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ‘चार्जिंग’ स्टेशन उघडणार, चार्जिंगसाठी येणार ‘इतका’ खर्च!
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 11:08 AM

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. आता सरकारनेही इलेक्ट्रिक कारच्या विक्रीला चालना देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा अधिक विचार करू शकतील. जसे इतर गाड्यांसाठी पेट्रोल पंप, गॅस स्टेशन आहेत, तसेच आता लवकरच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी देखील चार्जिंग स्टेशन बनवण्यात येणार आहेत (Mcd to open electric car charging station in Delhi soon know about fees and how it works).

आता इलेक्ट्रिक कार चालवणारे लोक घरी कार चार्ज करण्यास विसरले असतील किंवा ते बराच वेळ गाडी चालवत असतील, तर पेट्रोल प्रमाणे चार्जिंग स्टेशनवर जाऊन काही ठराविक पैसे देऊन गाडी चार्ज करू शकणार आहेत. यासाठी दिल्ली महानगरपालिकेने पुढच्या वर्षापर्यंत अनेक ई-चार्जिंग स्टेशनची योजना तयार केली आहे.

कुठे असतील ही चार्जिंग स्टेशन?

दिल्लीतील ही चार्जिंग स्टेशन, पेट्रोल पंप आणि सीएनजी स्टेशनप्रमाणे रस्त्याच्या कडेलाच उभारण्यात येणार आहेत. यासाठी कार पार्क करण्यासाठी पुरेशी जागा, तसेच कार चार्ज करण्यास कुठलाही अडथळा येणार नाही, अशा जागा निवडण्यात येणार आहे. गाडी चार्ज करण्यास उत्तम अशा दिल्लीतील बऱ्याच जागा एमसीडीने आतापर्यंत निश्चित केल्या असल्याचे बोलले जात आहे. यात दक्षिण एमसीडीने 75, उत्तर 127, पूर्व 93 स्थानांना आपली पसंती दर्शवली आहे (Mcd to open electric car charging station in delhi soon know about fees and how it works).

वाढत्या प्रदूषणाशी युद्ध!

सध्या दिल्लीत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत सातत्याने वाढत होत आहे.  याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दिल्ली सरकारदेखील या विक्रीला चालना देत आहे. वाढत्या प्रदूषणाच्या लढाईत दिल्ली सरकारने इलेक्ट्रिक गाड्यांची जाहिरात करणे, हा देखील एक महत्त्वाचा पुढाकार आहे. अशा वेळी इलेक्ट्रिक वाहने वाढत असतील तर, ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशनची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशनची संख्याही वाढविली जात आहे. जेथे ई-रिक्षा ते ई-बाईक, ई-सायकलदेखील काही शुल्क आकारून चार्ज केली जाऊ शकते.

किती असेल ही ‘फी’?

सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर वाहन चार्ज करण्यासाठी तुम्हाला फी देखील भरावी लागणार आहे. चार्जिंग स्टेशनवर कार चार्ज करण्याचे दोन पर्याय असणार आहेत. यामध्ये आपल्याला प्रति तास किंवा प्रति युनिट याप्रमाणे पैसे आकारले जातील. आतापर्यंत त्यांच्या दरांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. चार्जिंग स्टेशन बनवणाऱ्या कंपन्या आणि एमसीडी मिळून हे दर निश्चित करणार आहेत. तसेच, जर एखाद्याकडे वाहन चार्ज करण्यासाठी जास्त वेळ नसेल आणि वाहन चार्ज करणे महत्त्वाचे असेल तर, त्यांच्यासाठी बॅटरी एक्सचेंजची सुविधा देखील उपलब्ध असेल. बॅटरी एक्सचेंज करण्याच्या व्यवस्थेसंदर्भातही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत (Mcd to open electric car charging station in delhi soon know about fees and how it works).

दिल्ली सरकारची सबसिडी

दिल्ली सरकार ई-वाहन खरेदीला चालना देण्यासाठी अनुदान अर्थात सबसिडी देत आहे. कोणतेही इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यास, दिल्ली सरकारकडून अनुदानही दिले जाते आणि आता दिल्ली सरकारही ही योजना सायकलवर लागू करणार आहे. म्हणजेच, जर आपण इलेक्ट्रिक सायकल विकत घेतली तर, लवकरच या योजनेंतर्गत तुम्हाला अनुदान मिळेल आणि काही ग्राहकांना जादाचे पैसेही मिळतील.

(Mcd to open electric car charging station in delhi soon know about fees and how it works)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.