Mercedes-Benz ची नवी मेड इन इंडिया कार लवकरच बाजारात, 4 सेकंदात 100 किमी वेग पकडणार
Mercedes-Benz India ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्थानिक पातळीवर असेंबल केलेली गाडी GLC 43 एएमजी कूप (GLC 43 AMG coupe) लाँच केली होती.
मुंबई : मर्सिडीज बेंझ इंडियाने (Mercedes-Benz India) गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्थानिक पातळीवर असेंबल केलेली गाडी GLC 43 एएमजी कूप (GLC 43 AMG coupe) लाँच केली होती. या कारची किंमत 76.70 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. कंपनी आता अजून एक लोकल लेव्हलवर असेंबल केलेली कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. A35 AMG असं या कारचं नाव असेल. पुढील महिन्यात लाँच होणारी ही कार मर्सिडीज बेंझ ए-क्लास लिमोझिनवर आधारित असेल. (Mercedes Benz A35 AMG to be second locally assembled in India)
मॉडेलमध्ये 2.0 लिटर, फोर सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन दिले जाईल जे 301bhp आणि 400Nm टॉर्क निर्माण करेल. हे इंजिन 7-स्पीड डीसीटी स्वयंचलित ट्रांसमिशनशी जोडले जाईल. यात 4 Matic सिस्टिमच्या मदतीने चारही चाकांना एनर्जी दिली जाते. हे मॉडेल अवघ्या 4.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास इतका वेग घेऊ शकतं. इलेक्ट्रॉनिकली या कारचा कमाल वेग 250 किमी प्रतितास इतका आहे.
आगामी मर्सिडीज-बेंझ A 35 AMG व्हिज्युअल अपडेटमध्ये ए-क्लास लिमोझिनपेक्षा थोडी वेगळी वाटते. त्यामध्ये नवीन सिंगल-स्लेट ग्रिल, रीडिझाइन फ्रंट आणि रीअर बम्पर, रीअर डिफ्यूझर आणि ड्युअल क्रोम टेल-पाईपचा समावेश आहे. या मॉडेलला AMG परफॉर्मन्स सीट्स, एएमएस स्पेक स्टीयरिंग व्हील, एमबीयूएक्स कनेक्टिव्हिटी आणि एक टचपॅड मिळेल. हे मॉडेल एएमजी परफॉर्मन्स सीट्स, AMS स्पेक स्टीयरिंग व्हील, MBUX कनेक्टिव्हिटी आणि टचपॅडसह सुसज्ज असेल.
Get ready to welcome a Star that’s #JustLikeYou with the exciting #ALimo media drive that begins tomorrow. Stay tuned for more. pic.twitter.com/ZvXNRVnDUp
— Mercedes-Benz India (@MercedesBenzInd) February 22, 2021
मर्सिडीज बेंझने 1994 मध्ये भारतीय बाजारात प्रवेश केला होता. भारतातील मर्सिडिज बेंझचं मुख्यालय पुण्यात आहे. 1996 मध्ये या कंपनीने बंगळुरू येथे आपले संशोधन आणि विकास केंद्र स्थापन केले होते. भारतात मर्सिडीज-बेंझचा विस्तृत उत्पादन पोर्टफोलिओ आहे. भारत आता कंपनीसाठी मोठी बाजारपेठ आहे. मर्सिडीज बेंझच्या बर्याच मोटारी भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या कंपनीने भारतात आतापर्यंत एकूण 14 मॉडेल्स लाँच केल्या आहेत.
नव्या बदलांसह TATA Tiago चं लिमिटेड एडिशन सादर, जाणून घ्या काय आहे खास#TataTiago #Tata #TataMotors #Tiago https://t.co/b9EOtaKQqj
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, 2021
संबंधित बातम्या
2021 च्या पहिल्या तिमाहीत लक्झरी कार्सचा धडाका, Mercedes, BMW, Skoda च्या शानदार कार्स लाँच
Tesla ला टक्कर देण्यासाठी Mercedes ची शानदार इलेक्ट्रिक कार लाँच, 8.9 सेकंदात 100 किमी वेग पकडणार
Christmas Discounts विसरा! ‘ही’ कार कंपनी देतेय तब्बल 7 लाखांचा बंपर डिस्काऊंट
(Mercedes Benz A35 AMG to be second locally assembled in India)