मुंबई : भारतात किफायतशीर कारप्रेमींची संख्या जरी मोठी असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये देशात लक्झरी कारप्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातील लक्झरी कार्सच्या विक्रीबाबतची आकडेवारी पाहता लक्झरी कार उत्पादक कंपन्यांकडून देशात सातत्याने नवनव्या लक्झरी कार्स लाँच केल्या जात आहेत. भारतातील ग्राहकांकडून त्यास पसंतीदेखील मिळत आहे. (Mercedes, BMW and Skoda launches luxury cars in india)
स्कोडा सुपर सेडान (Skoda Super Sedan)
स्कोडा ऑटो इंडियाने 2021 मध्ये लेटेस्ट शानदार सेडान मॉडल लाँच केलं आहे. 2021 स्कोडा सुपर्ब (Skoda Superb sedan) असं या कारचं नाव असून या कारमध्ये भरपूर सुविधा देण्यात आल्या आहेत. या सेडानची किंमत 31.99 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारच्या स्पोर्टलाईन व्हेईकलची किंमत 31.99 लाख रुपयांपासून सुरु होते तर लॉरिन अँड क्लेमेंट वेरियंटची किंमत 34.99 लाख (सर्व किंमती एक्स शोरुम भारत) रुपयांपासून सुरु होते.
2021 मॉडल स्कोडा सुपर्ब सेडानमध्ये अनेक शानदार फिचर्स देण्यात आले आहेत. भारतात काही महिन्यांपूर्वी स्कोडाचं फेसलिस्ट वेरियंट लाँच करण्यात आलं होतं. आता हिच कार नव्या फिचर्ससह सादर करण्यात आली आहे. 2021 स्कोडा सुपर्ब सेडानमध्ये नवीन अडॉप्टिव एलईडी हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. अडॉप्टिव फ्रंट-लायटिंगमध्ये डायनॅमिक हेडलॅम्प कंट्रोलसह स्वायलिंग आणि कॉर्नरिंग फंक्शनही देण्यात आलं आहे.
Skoda ची सर्वात स्वस्त सेडान रॅपिड रायडर
गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या अपडेटेड रॅपिड सेडानबाबत स्कोडा इंडियाला चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत. भारतीय ऑटो इंडस्ट्रीत पहिल्यांदाच असं झालंय की, एखाद्या गाडीच्या टॉप वेरियंटपेक्षा त्या गाडीच्या बेस वेरियंटची विक्री झाली आहे. काही महिन्यांपूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली होती, जेव्हा कंपनीला या कारचा पुरवठा नाईलाजास्तव रोखावा लागला होता. त्यानंतर कंपनीने स्कोडा रॅपिड रायडर प्लस ही कार लाँच केली. परंतु या कारची किंमत थोडी जास्त होती. अशातच आता कंपनीने याच कारचं नवीन वर्जन लाँच केलं आहे. जुन्या कारच्या तुलनेत या कारची किंमत 30 हजार रुपयांनी जास्त आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 7.79 लाख रुपये इतकी आहे. या सेडानच्या फिचर्समध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. कंपनीने म्हटलंय की, रॅपिडची मागणी पूर्वीपेक्षा थोडी कमी झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही बेस वेरियंट घेऊन आलो आहोत, जेणेकरुन आम्हाला विक्रीमध्ये त्याचा फायदा होईल.
मर्सिडीज-बेंझ जीएलसी-क्लास (2021 Mercedes-Benz GLC-Class)
जर्मन लक्झरी कार निर्माती कंपनी मर्सिडीज-बेंझने (Mercedes-Benz) भारतात नुकतीच त्यांची लोकप्रिय एसयूव्ही GLC चं 2021 वेरियंट (2021 Mercedes GLC) लाँच केलं आहे. या व्हीकलची किंमत 57.40 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते. मर्सिडीज-बेंझ इंडियाने एका निवेदनात म्हटलं आहे की, नवीन एसयूवही GLC 200 पेट्रोल आणि GLC 220d डिझेल वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. मर्सिडीज-बेंझ GLC च्या टॉप मॉडेलची किंमत 63.15 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) इतकी आहे. मर्सिडीज-बेंझ GLC मध्ये लेटेस्ट कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, ‘मर्सिडीज मी कनेक्ट’, अॅलेक्सा होम, गुगल होम, नेविगेशन सिस्टिम आणि अॅपवर पार्किंग लोकेशनसारखे फीचर्स सपोर्ट करतात.
कंपनीने म्हटलंय की, या SUV मध्ये रिमोट इंजिन स्टार्ट फिचरचा समावेश आहे. मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रोडक्ट लाईन-अपमध्ये पहिल्यांदाच एखाद्या SUV च्या फ्रंट सीटमध्ये मसाज फंक्शन देण्यात आलं आहे. फ्रंट एंट्री एयर कंडीशनिंगद्वारे कारमध्ये बसण्यापूर्वीच रिमोटद्वारे कारमधील तापमान थंड करता येईल.2020 मध्ये GLC ही कार मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या पोर्टफोलियोमधील सर्वाधिक विक्री झालेली कार आहे. कंपनीने 2016 मध्ये ही कार भारतात लाँच केली होती. गेल्या चार वर्षांमध्ये GLC च्या 8,400 युनिट्सची विक्री झाली आहे. मर्सिडीज-बेंझच्या 2021 जीएलसीच्या इतर फीचर्समध्ये MBUX युजर इंटरफेस, वायरलेस चार्जिंग, क्रुझ कंट्रोल, डायनॅमिक सिलेक्ट, एम्बियंट लायटिंगसह अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ही नवी एसयूव्ही मार्केटमध्ये बीएमडब्ल्यू एक्स 3, वोल्वो एक्ससी 60, लँड रोवर डिस्कवरी स्पोर्ट या गाड्यांना टक्कर देणार आहे.
Audi ची Q5 facelift लाँच होण्यास सज्ज
Audi कंपनी त्यांच्या बहुप्रतीक्षित Q5 SUV चं फेसलिफ्टेड वेरियंट भारतीय बाजारात लाँच करण्यास सज्ज झाली आहे. यशस्वी एसयूव्हींच्या यादीत Q5 चाही समावेश आहे. ही एक प्रिमियम एसयूव्ही आहे. या एसयूव्हीचं अपडेटेड वर्जन गेल्या वर्षी जूनमध्ये सादर करण्यात आलं होतं. ही कार या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत भारतात विक्रीसाठी उपलब्ध केली जाण्याची शक्यता आहे. भारतात Q5 च्या प्रोटोटाईप मॉडलचं पुण्यात टेस्टिंग करण्यात आलं आहे. या टेस्टिंगदरम्यान ही कार पाहावयास मिळाली आहे. 2021 Audi Q5 Facelift एका पोर्टेबल एमिशन मेजरमेंट सिस्टमसोबत अटॅच केली आहे. यावरुन अंदाज बांधला जातोय की ही एसयूव्ही एआरएआयमध्ये होमोलॉगेशन प्रक्रियेतून जात आहे. या गाडीचे जे फोटो सध्या समोर आले आहेत. या कारचं प्रोटोटाईप मॉडल कवर करण्यात आलं होतं, त्यामुळे या कारचं बाहेरचं डिझाईन आणि स्टायलिंग स्पष्ट झालेलं नाही. ऑडी Q5 नवीन क्रोम-फिनिश सिंगल-फ्रेम ग्रिल, एलईडी हेडलाईट्स, रीडिजाइन्ड फ्रंट बम्पर, नवीन फॉग लॅम्प, ट्विन एग्झॉस्ट टिप्स आणि टेल एलईडी लाईट्सना सपोर्ट करते.
या एसयूव्हीमध्ये आतल्या बाजूच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये अपडेटेड MIB 3 सिस्टिम आणि कनेक्टेड कार फीचर, व्हर्चुअल कॉकपिट, एम्बियंट लायटिंग, 3-स्पोक मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, हीटेड सीट्स, मल्टीपल एयरबॅगसह ऑल-न्यू 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट युनिट मिळेल, अशी शक्यता आहे. तसेच ABS सह EBD, ESP, TC, कीलेस एंट्री आणि अजून काही फीचर्स दिले जाऊ शकतात. 2021 ऑडी क्यू 5 फेसलिफ्ट ट्रिम मध्ये 2.0-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनासह सादर केलं जाऊ शकतं. पेट्रोल इंजिन 248 बीएचपी पॉवर आणि 370 एनएम टार्क जनरेट कर शकतं. हे इंजिन 7-स्पीड एस-ट्रॉनिक डुअल-क्लच ट्रान्समिशनसह अटॅच केलेलं असेल. ही लक्झरी एसयूव्ही डिझेल अवतारातही सादर केली जाऊ शकते. जागतिक बाजारात पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही वेरियंट सादर केले जाण्याची शक्यता आहे. परंतु डिझेल वेरियंट भारताल लाँच केलं जाण्याची शक्यता खूपच कमी आहे.
Mercedes ची शानदार इलेक्ट्रिक कार ग्राहकांच्या भेटीला
Mercedes Benz ने त्यांची नवीन इलेक्ट्रिक EQA 2021 ही कार वर्ल्डवाईड (जगभरात) लाँच केली आहे. Mercedes Benz ची नवीन इलेक्ट्रिक EQA ही SUV टेस्ला कंपनीच्या मॉडल Y ला जोरदार टक्कर देणार आहे. मर्सिडीजने ही कार युवकांना आणि शहरी ग्राहकांना नजरेसमोर ठेवून डिझाईन केली आहे. EQA ही कार GLA चं फुल इलेक्ट्रिक वर्जन आहे. या कारचं प्रोडक्शन (उत्पादन) जर्मनी, बीजिंग आणि चीनच्या Rastatt च्या कारखान्यात करण्यात आलं आहे. या कारचा फ्रंट लुक ग्रिल आणि LED हेडलाईट्ससह डिझाईन करण्यात आला आहे. ज्यामध्ये ब्लू टिंट देण्यात आला आहे. तर गाडीच्या मागच्या बाजूला हाईलाईट फ्लॅशलाईट आहे. या कारचा साईड व्ह्यूदेखील आकर्षक आहे. साईडला अलॉय व्हील्स खूप स्टायलिश दिसत आहेत. EQA मध्ये 190 हॉर्सपॉवर क्षमतेची इलेक्ट्रिक मोटार देण्यात आली आहे. जी 375 Nm टॉर्क जनरेट करते. तर मागच्या बाजूला 66 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
पॉवरफुल बॅटरी आणि फीचर्स
या कारमधील बॅटरी 100 kW च्या डीसी चार्ज्ड किंवा 11 kW च्या चार्जिंग बॉक्सद्वारे चार्ज केलं जाऊ शकतं. EQA ही कार 0 से 100 किमी प्रति तास इतका वेग केवळ 8.9 सेकंदांमध्ये पकडू शकते. ही कार जास्तीत जास्त 160 किमी प्रति तास वेगाने धावू शकते. भविष्यात या कारचं फोर व्हील ड्राइव वर्जन लाँच केलं जाऊ शकतं. जे 270 hp आणि 50 माइल्सच्या रेंजसह लाँच केलं जाईल. या कारचं वजन 2040 किलो आहे, ही कार 430 किलो लोड घेऊ शकते (वजन उचलू शकते). या कारमध्ये 340 लीटर इतकी बूट स्पेस आहे. रियर सीट फोल्ड केल्यानंतर ही स्पेस 1320 लीटर्स इतकी होते. या कारची लांबी 446 cm, रुंदी 183 cm आणि उंची 162 cm इतकी आहे. या कारमध्ये तुम्हाला 18 इंचांचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, जे LED हेडलाईट्स आणि MBUX इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह येतात. या कारची किंमत तब्बल 44 लाख रुपयांच्या आसपास असू शकते. 4 फेब्रुवारीपासून कंपनी या कारची ग्लोबल डिलीव्हरी सुरु करणार आहे.
हेही वाचा
जुनी कार घ्यायचीय? मग ‘या’ ठिकाणी दीड ते तीन लाखात गाडी
गाडीत बसलेल्यांनाही सीट बेल्ट आवश्यक, अन्यथा दंड, दंडाची रक्कम…
(Mercedes, BMW and Skoda launches luxury cars in india)