घरबसल्या शोरूममधून कार खरेदीचा अनुभव घ्या, MG Motor चा ‘एमजी एक्स्पर्ट’ प्लॅटफॉर्म लाँच

एमजी मोटर इंडियाने (MG Motor) इंडस्ट्री-फर्स्ट प्रॉडक्ट एक्स्प्लोरेशन व्यासपीठ एमजी एक्स्पर्टच्या लाँचची घोषणा केली. एमजी एक्स्पर्टमध्ये (MG Expert) स्थिर व सोईस्कर इंटरअॅक्शन्सची श्रेणी आहे, जी ग्राहकांना ह्युमन इंटरवेन्शन आणि एआर तंत्रज्ञानाचा (Artificial intelligence) वापर करत त्यांच्या घरामधूनच आरामशीरपणे विविध टचपॉइण्ट्समध्ये सर्वांगीण खरेदी अनुभव देईल.

घरबसल्या शोरूममधून कार खरेदीचा अनुभव घ्या, MG Motor चा 'एमजी एक्स्पर्ट' प्लॅटफॉर्म लाँच
MG MotorImage Credit source: MG Motor
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 11:58 PM

मुंबई : एमजी मोटर इंडियाने (MG Motor) इंडस्ट्री-फर्स्ट प्रॉडक्ट एक्स्प्लोरेशन व्यासपीठ एमजी एक्स्पर्टच्या लाँचची घोषणा केली. एमजी एक्स्पर्टमध्ये (MG Expert) स्थिर व सोईस्कर इंटरअॅक्शन्सची श्रेणी आहे, जी ग्राहकांना ह्युमन इंटरवेन्शन आणि एआर तंत्रज्ञानाचा (Artificial intelligence) वापर करत त्यांच्या घरामधूनच आरामशीरपणे विविध टचपॉइण्ट्समध्ये सर्वांगीण खरेदी अनुभव देईल. एमजी एक्स्पर्ट एसेन्ट्रिक इंजिन्स एक्स्पेरिअन्स मॅनेजर साधनाचा वापर करत एमजी मोटर इंडियाच्या तंत्रज्ञानाच्या नवीन टप्प्याच्या शुभारंभाला सादर करते. या साधनामध्ये एकसंधी उत्पादनाचा शोध घेण्याची सुविधा देण्यासाठी सर्वोत्तम ऑडिओ व व्हिज्युअल कन्टेन्ट आहेत, ज्यामुळे व्हर्च्युअल व फेस-टू-फेस इंटरअॅक्शनसंदर्भातील पोकळी दूर होते.

एमजी मोटर इंडियाचे प्रमुख व्यावसायिक अधिकारी गौरव गुप्ता म्हणाले, “आम्हाला मानव-संचालित, आवाज-सक्षम, एआय-समर्थित व्यासपीठ एमजी एक्स्पर्ट लाँच करण्याचा आनंद होत आहे. ऑटो-टेक ब्रॅण्ड म्हणून एमजीने भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये अनेक इंडस्ट्री फर्स्टस सादर केले आहेत. आमच्या ब्रॅण्ड तत्त्वामध्ये ग्राहकांना तंत्रज्ञान-सक्षम एकसंधी अनुभव देण्याला प्राधान्य देत एमजी एक्स्पर्ट उत्पादनाच्या वैशिष्ट्यांपासून मालकी हक्कापर्यंत विविध चौकशीसाठी एक-थांबा सुलभ व सोईस्कर सोल्यूशन म्हणून कार्य करते. आम्ही ग्राहकांना त्यांच्या घरामध्येच आपल्या सोयीने सुधारित, माहतीपूर्ण, परस्परसंवादी व तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत प्रॉडक्ट एक्स्प्लोरेशन अनुभव देण्यास उत्सुक आहोत.”

घरबसल्या शोरूममधून कार खरेदीचा अनुभव

‘लाइव्ह स्ट्रिमिंग’ एआर ऑन-वेईकलसह ग्राहक त्यांच्या घरामध्ये आरामात प्रत्यक्ष कार पाहू शकतात, रंगसंगती पाहू शकतात आणि अंतिम लुक व फिलसाठी कारला अॅक्सेसराइज करू शकतात. ग्राहक स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शनासह खरेदीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी प्रॉडक्ट एक्स्पर्टससोबत प्रत्यक्ष कनेक्ट होऊ शकतात. कारच्या व्हर्च्युअल लुकव्यतिरिक्त एमजी एक्स्पर्टस् ग्राहकांना ऑन-रोड किंमत, अपेक्षित डिलिव्हरी तारीख व व्हेरिएण्ट तुलना यांची देखील माहिती देऊ शकतात, ज्यामुळे घरामध्येच डिलरशिपमध्ये असल्यासारखा अनुभव मिळू शकतो. तसेच ग्राहक त्यांच्या जवळच्या डिलरशिपमध्ये टेस्ट ड्राइव्ह बुक करू शकतात.

एसेन्ट्रिक इंजिनचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी वरूण शाह म्हणाले, “आम्हाला उत्पादनांच्या एकीकृत श्रेणीसह व्हर्च्युअल इंटरअॅक्शन्सना नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी एमजी मोटरसोबतचा आमचा सहयोग अधिक दृढ करण्याचा आनंद होत आहे. आमचा नवीन एक्स्पेरिअन्स मॅनेजर आमचे भागीदार एमजी मोटर व त्यांच्या डिलरशिप सहयोगींना परस्परसंवाद साधण्याच्या स्वरूपामध्ये परिवर्तन करत त्यांच्या ग्राहकांशी अद्वितीय संबंध निर्माण करण्याची व्यापक संधी देईल.”

एमजी एक्स्पर्ट व्यासपीठ एमजी मोटर इंडियाचा मुलभूत विश्वास ‘पॉवर ऑफ चॉईस’च्या तत्त्वावर डिझाइन करण्यात आले आहे. हे व्यासपीठ ग्राहकांना त्यांच्या घरामध्येच आरामशीपणे स्मार्ट एमजी वाहने खरेदी करण्यापूर्वी उत्पादनांचा शोध, अनुभव घेण्यासोबत योग्य निर्णय घेण्यामध्ये सक्षम करेल.

इतर बातम्या

Yamaha FZ अवघ्या 40 हजारात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

बहुप्रतीक्षित Skoda Slavia भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

10-15 वर्षे जुन्या कार मालकांना दिलासा, NOC जारी करण्यासह सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.