MG Hector Plus 7 Seater ची प्रतीक्षा संपणार, पुढील महिन्यात कार लाँच होण्याची शक्यता

एमजी मोटर इंडियाने नुकतीच घोषणा केली आहे की, हेक्टर प्लसची 7 Seater एडिशन असलेली कार 2021 च्या जानेवारी महिन्यात लाँच केली जाणार आहे.

MG Hector Plus 7 Seater ची प्रतीक्षा संपणार, पुढील महिन्यात कार लाँच होण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 10:48 PM

मुंबई : एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) नुकतीच घोषणा केली आहे की, हेक्टर प्लसची 7 Seater एडिशन 2021 च्या जानेवारी महिन्यात लाँच केली जाणार आहे. या वर्षीच्या सुरुवातीला हेक्टर प्लस सहा सीटर असलेल्या लेआऊटमध्ये कॅप्टन सीट्ससह सादर करण्यात आली होती. एमजीने त्यांची पहिली कार हेक्टर भारतीय बाजारात 2019 मध्ये लाँच केली होती. कंपनी आता या मध्यम आकाराच्या लोकप्रिय एसयूव्हीला अपडेट करणार आहे. (MG Hector Plus seven-seat version coming in January 2021)

मिड साइज एसयूव्ही एमजी हेक्टरला सध्या भारतीय बाजारात चांगली पसंती मिळत आहे. MG Motor India ही प्रसिद्ध कार 7 सीटर व्हेरियंटसह (MG Hector Plus 7 Seater) जानेवारी 2021 मध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. सध्या भारतात MG च्या MG Hector, MG ZS EV, MG Hector Plus 6 Seater आणि MG Gloster या कार उपलब्ध आहेत.

किंमत

कंपनी या वर्षीच्या मध्यात सात सीटर हेक्टर लाँच करणार होती, परंतु कोरोना महामारीच्या संकटामुळे कंपनीने या कारचे लाँचिंग पुढे ढकलले. भारतात एमजी हेक्टर प्लस 6 सीटरची किंमत 13.73 लाख ते 18.68 लाख रुपयांपर्यंत आहे. MG Hector Plus 7 Seater ची किंमत 6 सीटर मॉडलच्या तुलनेत एक लाख रुपयांनी अधिक असू शकते, असे बोलले जात आहे. ही कार महिंद्राची अपकमिंग एसयूव्ही New Mahindra XUV500 आणि टाटा मोटर्सची आगामी एसयूवी Tata Gravitas ला टक्कर देणार आहे.

फिचर्स

हेक्टरकडे स्वतःचे असे अनेक फिचर्स आहेत. कारच्या बाहेरील प्रोफाईलवर एक मोठं ग्रिल, स्वतःची एलईडी डीआरएल शैली, नवीन स्किड प्लेट आमि क्रोम आहे. यामध्ये अपडेटेड आय स्मार्ट इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि ड्युल-टोन अपहोल्स्ट्री मिळते. सहा-सीटर हेक्टर अधिक प्रिमीय दिसते. त्यामुळे हेक्टरच्या सात-सीटर एडिशनची सध्या जोरदार चर्चा आहे.

इंजिन

MG Hector Plus 7 Seater ही कार 6 सीटर एमजी हेक्टर प्लस प्रमाणे तीन इंजिन पर्यांयासोबत लाँच केली जाण्याची शक्यता आहे. ज्यात 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि हायब्रिड सिस्टिमसोबत 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 143 बीचएपीची पॉवर आणि 250 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. पेट्रोल इंजिन 6 स्पीड मॅन्यूअल आणि डीटीसी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत येते. तर 2.0 लीटर डिझेल इंजिन 168bhp पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करतं.

इतर फीचर्स

या कारच्या सीट पोझिशनमध्ये थोडे बदल अपेक्षित आहेत. यामध्ये सीट्सच्या दुसऱ्या ओळीत (दुसरी रो) 60.40 प्रमाणे सीट असणार आहे. तर थर्ड रोच्या सीट स्लायडिंग फिचर्ससोबत असणार आहेत. इन्फोटेनमेंट सिस्टम सोबत पॉवर अॅडजस्टेबल फ्रंट पॅसेंजर सीट, ड्रायव्हर सीट, स्मार्ट स्वाइफ फंक्शनसोबत पॉवर टेल गेट, 8 कलर एंबियट लायटिंग, पॅनारेमिक सनरूफ, कनेक्टेड व्हेईकल टेक्नोलॉजी, मल्टी फंक्शन स्टियरींग व्हीलसोबत सेफ्टी फीचर्समध्ये 6 एअरबॅग्स, ट्रॅक्शन कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटर, एबीएस, ईएससी, 360 डिग्री कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट सह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

एमजी कार्सच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता

एमजीने अगोदरच भारतात नवीन हेक्टर फेसलिफ्टची टेस्टिंग सुरु केली आहे. दरम्यान ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. देशातील अनेक कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांप्रमाणे एमजीनेदेखील नुकतीच घोषणा केली आहे की, जानेवारी महिन्यात ते त्यांच्या किंमतींमध्ये संशोधन करतील, हा प्रोडक्ट पोर्टफोलियोचा भाग असेल. असे सांगण्यात येत आहे की, एमजीच्या कारच्या किंमतीत तीन टक्क्यांची वाढ होऊ शकते. मॉडेलच्या आधारावर तीन टक्क्यांपर्यंत किंमती वाढवल्या जाऊ शकतात.

संबंधित बातम्या

सरकारचा मोठा निर्णय! वाहन चालकाच्या बाजूला बसणाऱ्या व्यक्तीसाठी लागू होणार ‘हे’ नियम…

हे वाचलंत का? ‘या’ राज्यात CNG आणि LPG गाड्यांची किंमत वाढणार

नव्या वर्षात महिंद्रा लाँच करणार पाच एसयूव्ही कार, जाणून घ्या सर्व फिचर्स

(MG Hector Plus seven-seat version coming in January 2021)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.