MG Car : ‘एमजी’ कारच्या विक्रीत घट… जूनच्या तुलनेत जुलैमध्ये 10 टक्क्यांनी घसरगुंडी…

एमजी मोटर्सने त्‍यांची इलेक्ट्रिक एसयुव्ही ZS EV बाजारात चांगल्या रेंजसह सादर केली होती आणि नंतर त्‍याच्‍या विक्रीत तेजी दिसली. मिडसाईज एसयुव्ही सेगमेंटमध्येही एस्टर चांगली कामगिरी करत आहे. या सगळ्यात हेक्टर आणि हेक्टर प्लसच्या विक्रीत कालांतराने घट दिसून येत आहे. दरम्यान, 2022 एमजी हेक्टर फेसलिफ्ट लवकरच लाँच होणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

MG Car : ‘एमजी’ कारच्या विक्रीत घट... जूनच्या तुलनेत जुलैमध्ये 10 टक्क्यांनी घसरगुंडी...
electric carImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 7:31 PM

एमजी मोटर इंडियाच्या (MG Motor India) कार विक्रीत गेल्या महिन्यात म्हणजे जुलै 2022 मध्ये वार्षिक आणि मासिक घट झाली आहे. एमजीने जुलै 2022 मध्ये फक्त 4013 कारचीच विक्री (Car Sales Decline In July 2022) केली आहे. जून 2022 च्या तुलनेत विक्रीमध्ये तब्बल 11 टक्के घट झाली आहे. त्याचप्रमाणे जुलैमध्ये वार्षिक विक्रीतही 5 टक्क्यांची घट झाली आहे. एमजी मोटर भारतात Aster, Hector, Hector Plus, ZS EV आणि Gloster सारख्या SUV ची विक्री करते. या गाड्यांना बऱ्यापैकी ग्राहक आहेत, परंतु वाढती स्पर्धा तसेच इलेक्ट्रिक कार्सची (Electric car) वाढलेली मागणी या सर्व कारणांमुळे एमजीच्या विक्रीत घट झाली असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

विक्रीत झाली घट

भारतीय बाजारपेठेत Aster, Hector, Hector Plus, ZS EV आणि Gloster सारख्या SUV ची विक्री करणाऱ्या एमजी मोटर्स इंडियाच्या कार विक्रीत मोठी घट झालेली दिसून येत आहे. कंपनीसाठी कार विक्रीच्या दृष्टीने मागील महिना चांगला नव्हता. मासिक विक्री असो किंवा वार्षिक विक्री असो, एमजी मोटरच्या कारच्या विक्रीत जुलै 2022 मध्ये घट झाली आहे. गेल्या महिन्यात एमजी मोटर इंडियाने 4013 कार विकल्या. ZS EV सह इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये MG चांगली कामगिरी करत आहे. परंतु शेवटच्या महिन्या कार विक्रीच्या बाबतीत कंपनीला बराच तोटा सहन करावा लागला.

काय आहे विक्री अहवाल

एमजी मोटर इंडियाचा जुलै 2022 कार विक्री अहवाल पाहता, कंपनीने गेल्या महिन्यात 4013 कार विकल्या, त्या जुलै 2021 मधील 4225 युनिट्सपेक्षा 5 टक्के कमी आहे. त्याच वेळी, मासिक विक्रीत सुमारे 11 टक्के घट झाली आहे. जून 2022 मध्ये, MG ने भारतीय बाजारपेठेत एकूण 4503 युनिट्सची विक्री केली. गेल्या महिन्यात एमजीच्या गाड्यांवर लोकांनी कमी लक्ष दिले आणि ह्युंदाइ मोटर्स, किआ मोटर्स आणि टाटा, महिंद्रा आदीच्या गाड्या या कंपनीपेक्षा जास्त विकल्या गेल्या. मागील महिन्याचा विक्री अहवाल कंपनीसाठी थोडा निराशाजनक राहिला आहे.

एमजी मोटर्सने त्‍यांची इलेक्ट्रिक एसयुव्ही ZS EV बाजारात चांगल्या रेंजसह सादर केली होती आणि नंतर त्‍याच्‍या विक्रीत तेजी दिसली. मिडसाईज एसयुव्ही सेगमेंटमध्येही एस्टर चांगली कामगिरी करत आहे. या सगळ्यात हेक्टर आणि हेक्टर प्लसच्या विक्रीत कालांतराने घट दिसून येत आहे. दरम्यान, 2022 एमजी हेक्टर फेसलिफ्ट लवकरच लाँच होणार असल्याचीही माहिती मिळत आहे. यात ग्राहकांना अधिक चांगला लुक आणि फीचर्स पाहता येणार आहे. आगामी काळात एमजी मोटर इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये अनेक नवीन गोष्टींची चाचपणी करीत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.