नागपूर : देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची वेळी आली आहे. अशा परिस्थितीत अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्या मदतीसाठी पुढे येत आहेत. दरम्यान एमजी मोटर इंडिया (MG Motor India) कंपनीने नागपूर स्थानिक प्राधिकरणाकडे रेट्रोफिटेड हेक्टर अॅम्ब्युलन्सच्या 8 युनिट्स सुपूर्द केल्या आहेत. या कस्टम-बिल्ट अॅम्ब्युलन्स आधुनिक लाईफ-सेव्हिंग प्रणालीसह सुसज्ज आहेत. (MG Motor India will give 100 Retrofitted Hector ambulances to Vidarbha and Nagpur)
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एमजी मोटर इंडियाला अशी 100 वाहने देण्याची विनंती केली होती. ज्यात नागपूर आणि विदर्भात 8 युनिट्स वितरित करण्यात आले आहेत. एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) सांगितले आहे की, त्यांनी नितीन गडकरी यांची विनंती मान्य केली आहे आणि त्वरित रुग्णवाहिकेच्या 8 युनिट्स नागपूर स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी राजीव छाबा म्हणाले की, “या वाईट काळात मंत्र्यांनी आम्हाला मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या विनंतीनंतर आम्ही ताबडतोब 8 रुग्णवाहिका सुपूर्द केल्या आहेत.
गुजरातमधील हलोल प्लांटमध्ये कंपनीच्या अभियंत्यांनी ही रेट्रोफिटेड रुग्णवाहिका कस्टम-बिल्ट केली आहे. या सर्व एसयूव्ही रुग्णवाहिका सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज आहेत. त्यामध्ये मेडिसिन कॅबिनेट, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा प्रणाली, 5 पॅरामीटर मॉनिटर, ऑटो-लोडिंग स्ट्रेचर, बॅटरी आणि अतिरिक्त सॉकेटसह इन्व्हर्टर, सायरन, लाइटबार आणि अग्निशामक यंत्र इत्यादींचा समावेश आहे.
या वर्षाच्या सुरूवातीच्या काळात कंपनीने नागपूरच्या नगीना स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये रिट्रोफिट हेक्टर अॅम्ब्युलन्सच्या 5 युनिट्स डोनेट केल्या होत्या. यासाठी कंपनीने एमजी नागपूर डीलरशिपसह भागीदारी केली होती. यापूर्वी या रुग्णवाहिका वडोदराच्या रुग्णालयात व गुजरातमधील हलोल येथे डोनेट करण्यात आल्या होत्या. याबाबत बोलताना छाबा म्हणाले होते की, “आम्हाला हेक्टर अॅम्ब्युलन्ससंदर्भात वडोदराच्या GMERS आणि हलोलच्या CHC रुग्णालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.”
कोरोनाविरुद्धच्या लढाईत आतापर्यंत अनेक वाहन कंपन्या पुढे आल्या आहेत. मारुती सुझुकी, ह्युंदाय, टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, महिंद्रा अँड महिंद्रा, फोर्ड इंडिया, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर्स आणि स्कोडा ऑटो इंडिया यांसारख्या कंपन्या आवश्यक वैद्यकीय साहित्य आणि मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत.
संबंधित बातम्या
टाटा समूह 60 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स एअरलिफ्ट करणार, देशभर 400 ऑक्सिजन प्लांट उभारणार
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात Mahindra कंपनी मैदानात, राज्यात Oxygen on Wheels सेवा सुरु
कोरोनाविरुद्धच्या लढाईत Force Motors चा मदतीचा हात, 50 Trax Ambulance महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द
(MG Motor India will give 100 Retrofitted Hector ambulances to Vidarbha and Nagpur)