Seltos, Creta ला जोरदार टक्कर, MG ची नवी SUV लाँच होणार

MG मोटर कंपनी (MG Motor India) सध्या ZS च्या पेट्रोल वर्जनवर काम करत आहे. (MG Motor working on MG ZS Petrol)

Seltos, Creta ला जोरदार टक्कर, MG ची नवी SUV लाँच होणार
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 10:52 AM

मुंबई : MG मोटर कंपनी (MG Motor India) सध्या ZS च्या पेट्रोल वर्जनवर काम करत आहे. ही कार भारतात एमजीच्या एंट्री लेव्हल व्हीकलच्या रुपात सादर केली जाणार आहे. या नव्या क्रॉसओव्हर SUV ला Astor या नावाने सादर केलं जाऊ शकतं. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ZS पेट्रोल ही SUV सेगमेंटमध्ये सर्वात दमदार असू शकते. ही गाडी किआ सेल्टॉस, ह्युंदाय क्रेटा, रेनॉ डस्टर आणि निसान किक्स या गाड्यांना टक्कर देणार आहे. MG Astor दोन पेट्रोल इंजिन प्रकारांसह सादर केली जाणार आहे. (MG ZS Petrol to be more POWERFUL than Hyundai Creta, Kia Seltos)

या गाडीत तुम्हाला 1.5 लीटर नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.3 लीटरचं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिलं जाणार आहे. नॅचुरली पेट्रोल इंजिन मॅनुअल ट्रांसमिशन आणि CVT ऑटोमेटिक गियरबॉक्ससह सादर केलं जाणार आहे. याच्या पॉवर आऊटपुटबाबत बोलायचे झाल्यास ही कार 120bhp मॅक्स पॉवर आणि 150Nm पीक टॉर्क जनरेट करेल. ZS पेट्रोलच्या 1.3 लीटर टर्बोचार्ज्ड इंजिनबाबत बोलायचे झाल्यास या कारचं इंजिन 163bhp मॅक्स पॉवर आणि 230Nm पीक टॉर्क देईल.

इंजिन

टर्बोचार्ज्ड इंजिन ड्यूल-क्लच ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह सादर केलं जाईल. मध्यम आकाराची एसयूव्ही निसान किक्स आणि रेनॉ डस्टर या दोन एसयूव्ही सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वात शक्तिशाली एसयूव्ही आहेत. कारण या एसयूव्ही 1.3-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह सादर करण्यात आल्या आहेत. यांचं इंजिन 156 bhp मॅक्स पॉवर आणि 254 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह सादर करण्यात आलेल्या अजून दोन शक्तीशाली एसयूव्ही भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये किआ सेल्टॉस आणि ह्युंदाय क्रेटा यांचा समावेश आहे. दोन्ही गाड्यांमध्ये एकच इंजिन आहे. दोन्ही गाड्यांमध्ये 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे जे 140 बीएचपी मॅक्स पॉवर आणि 242 एनएम पीक टॉर्क आऊटपुट निर्माण करतं.

फीचर्स

एमजी एस्टॉर इतर एमजी वाहनांप्रमाणे इतर अनेक फिचर्ससह सादर केली जाईल. ही कार अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कारप्ले, आयस्मार्ट कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, रियर पार्किंग सेंसर आणि 10.1 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिमसह सादर केली जाईल. ही पहिली अशी मिड साईज SUV असेल ज्यामध्ये ऑटोमॅटिक इमरजन्सी ब्रेकिंग, फ्रंट कॉलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, पार्क असिस्ट आणि अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल दिला जाईल. यामध्ये इतर अनेक फीचर्स मिळतील ज्यामध्ये एयर प्युरीफायर, वायरलेस चार्जर, स्टार्ट / स्टॉपसाठीचं पुश बटण, रेन-सेंसिंग वायपर्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ऑटोमॅटिक हेडलँप्स, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, रियर एसी वेंट, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरचा समावेश असेल.

हेही वाचा

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

Renault Kiger चं कोणतं वेरिएंट तुमच्या खिशाला परवडेल? जाणून घ्या सर्व किंमती

(MG ZS Petrol to be more POWERFUL than Hyundai Creta, Kia Seltos)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.