मुंबई : अमेरिकन दुचाकी निर्माता कंपनी हार्ले डेव्हिडसन (Harley Davidson) लवकरच त्यांची 1250 सीसी बाईक लाँच करू शकते. अशी माहिती मिळाली आहे की, कंपनी 13 जुलै रोजी ही बाईक लाँच करण्याची योजना आखत आहे. हार्ले डेव्हिडसन कंपनी स्पोर्ट सेगमेंटमध्ये एंट्री करण्यासाठी सज्ज आहे. जुलै महिन्यात बाजारात येणाऱ्या या नवीन मोटारसायकलमध्ये 1250 सीसी रिव्होल्यूशन मॅक्स इंजिन वापरण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. पॅन अमेरिकेतही हेच इंजिन वापरले गेले आहे. (New 1250cc Harley Davidson bike launching on 13th July, may be enter in Sports Segment)
बाईक लॉन्च झाल्यानंतर आता ग्राहकांना वाटतेय की, कंपनी स्पोर्ट्स बाइक सेगमेंटमध्ये प्रवेश करेल पण तसे झाले नाही, कारण कंपनी स्पोर्ट्स क्रूझर लाँच करू शकते. कारण यापूर्वी कंपनीने 1250 कस्टम प्रोटोटाइप बाजारात सादरर केल्या होत्या. लेटेस्ट टीझर इमेजमध्येही बाईक सारखीच दिसत आहे. अशा परिस्थितीत, 1250 कस्टमचे अंतिम उत्पादन 13 जुलै रोजीच पाहायला मिळेल.
हार्ले-डेव्हिडसनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जोचेन जिट्ज म्हणाले की, कंपनीची पहिली अॅडव्हेंचर टूरिंग मोटारसायकल अमेरिकेत यशस्वीपणे लाँच केल्यानंतर हार्ले-डेव्हिडसन रेव्होल्यूशन मॅक्स निर्मिती केलेली आणखी एक नवीन मोटारसायकल लॉन्च करण्यास अत्यंत उत्सुक आहे.
या बाईकचे अधिकृत लाँचिंग लवकरच होणार आहे. तर, या वर्षाच्या अखेरीस कंपनी हे वाहन जागतिक बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहे. हिरो मोटोकॉर्प आणि हार्ले डेव्हिडसन या दोन कंपन्या एकत्र आल्या आहेत. त्यामुळे येत्या चार महिन्यात या दोन कंपन्या मिळून काहीतरी वेगळं प्रोडक्ट सादर करतील.
भारतात हार्ले डेव्हिडसनची कामगिरी कंपनीच्या अपेक्षेइतकी चांगली झालेली नाही. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे, कंपनी भारतात खूप महागड्या मोटारसायकलींची विक्री करते, येथील बहुतांश ग्राहकांना त्या मोटारसायकली परवडत नाहीत. देशात खूप कमी मोटरसायकलप्रेमी आहेत ज्यांना ही बाईक त्यांच्या गॅरेजमध्ये ठेवता येईल. अशा परिस्थितीत आता हिरोशी हातमिळवणी केल्यानंतर भारतीय ग्राहक आशावादी आहेत की, कंपनी काहीतरी नवीन करू शकेल आणि आपली विक्री वाढवू शकेल.
इतर बातम्या
अवघ्या दोन तासात सर्व बाईक्सची विक्री, ‘या’ इलेक्ट्रिक बाईकसाठी ग्राहकांच्या रांगा
Suzuki Hayabusa 2021 ची भारतात डिलीव्हरी सुरु, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास?
दमदार फीचर्स आणि रेट्रो डिझाईनसह Yamaha ची शानदार बाईक भारतात लाँच, किंमत…
(New 1250cc Harley Davidson bike launching on 13th July, may be enter in Sports Segment)