भारतात दाखल होणार 7 – सीटर MPVs नवीन कार, इनोव्हा क्रिस्टा पासून नवीन किया कार्निवल पर्यंत कोणत्या कार होणार लॉंच?

भारतात नव्याने, MPV कार दाखल होत आहेत. यामध्ये Renault Triber Turbo, new-gen Toyota Innova Crysta, Toyota Rumion, Hyundai Stargazer आणि नवीन-gen Kia कार्निव्हल कार चा समावेश आहे.

भारतात दाखल होणार 7 - सीटर MPVs नवीन कार, इनोव्हा क्रिस्टा पासून नवीन किया कार्निवल पर्यंत कोणत्या कार होणार लॉंच?
New Kia CarnivalImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 10:37 PM

मुंबई : काही MPV कार भारतीय ऑटोमोबाईल बाजारात (Automobile Market) लॉंच होणार आहेत. या गाड्यांची स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये आणि किंमती असतील. भारतात नव्याने, टॉप 5 MPV कार दाखल होणार आहेत. यामध्ये रेनॉल्ट कारपासून पुढच्या पिढीच्या किआ कार्निव्हलपर्यंच्या कारचा समावेश आहे. या वेगवेगळ्या कारची वैशिष्टये, किंमत आणि सुविधांबाबत (Price and facilities) सविस्तर माहिती जाणून घेऊया. भारतीय कार मार्केटमध्ये दाखल होणाऱया, Renault Triber बद्दलच्या ताज्या लीक्सनुसार, यात टर्बो चार्ज केलेले पेट्रोल इंजिन मिळेल. ही कार या वर्षाच्या अखेरीस लॉंच केली जाऊ शकते. फ्रेंच कार निर्माता यावेळी टर्बोचार्ज केलेले इंजिन (Turbocharged engine) लॉंच करू शकते, त्याचे लॉंच काही काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

न्यू – जनरल टोयोटा इनोव्हा क्रिस्टा

पुढील पिढीची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा अद्याप तयार झालेली नाही आणि टेस्ट लेवलवर आहे. ही कार पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला ग्राहकांच्या दारात येऊ शकते. पुढील पिढीचे व्हर्जन मोनोशॉक आर्किटेक्चरवर तयार केली गेली आहे, तर सध्याचे व्हर्जन लेडर फ्रेम प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे. हाती आलेल्या रिपोर्ट्सनुसार, टोयोटा हायब्रिड पॉवरट्रेन पर्यायावर देखील काम करत आहे.

Toyota Rumion

Toyota भारतीय बाजारपेठेत एक नवीन कार लॉंच करणार आहे, जी मारुती Ertiga ची रिब्रँडेड व्हर्जन असेल. भारतात या कारचे नाव काय असेल, तिची माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र तिचे नाव कदाचित रुमिओन असावे. Ertiga च्या तुलनेत कारमध्ये थोडे बदल दिसून येतील.

हे सुद्धा वाचा

Hyundai Stargazer

Hyundai नवीन MPV कारवर देखील काम करत आहे ज्याला Targazer म्हटले जाऊ शकते. ही कार Kia Carens च्या टक्करमध्ये सादर केली जाऊ शकते. लवकरच या कारची विक्री इंडोनेशियाच्या बाजारपेठेत करण्यात येणार असून त्यानंतर ती भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकते.

न्यू -जनरल Kia कार्निवल

Kia आता त्याच्या न्यू -जनरेशन कार्निव्हल कारवर काम करत आहे, ज्यामध्ये अनेक छान वैशिष्ट्ये आणि अद्ययावत डिझाइन पाहायला मिळणार आहे. ही कार लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे, मात्र अद्याप कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.