मुंबई : मध्यमवर्गीयांमध्ये लोकप्रिय असलेली मारुती अल्टो (Maruti Alto) कार एका नवीन स्वरूपात लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपल्या वाहनांचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. यामध्ये मारुती अल्टोचाही समावेश आहे. दरम्यान लॉन्चच्या आधी कारची एक झलक पाहायला मिळाली आहे. नवीन मारुती अल्टोमधील अनेक फीचर्स हे आधीच्या मॉडेल्सपेक्षा खूपच वेगळे असतील. नवीन अल्टो (Alto 2022) कार ही आकार आणि उंचीने मोठी असेल. हे वाहन HEARTECT प्लॅटफॉर्मवर विकसित केले जाईल. या प्लॅटफॉर्मवर मारुती सुझुकीने S-Presso (Maruti Suzuki Car), Celerio आणि WagonR सारख्या हॅचबॅक कार बनवल्या आहेत.
2022 अल्टो एकदम नवीन मारुती अल्टो डिझाइन आणि स्टायलिश अवतारात येईल. यामध्ये एक मोठं ग्रिल, नवीन बंपर आणि मोठ्या टेलगेटचा समावेश आहे. कारचे हेडलाइट्स आणि टेल लाइट्सही नवीन डिझाइनमध्ये असतील. कारमध्ये केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही अनेक बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नवीन मॉडेलमध्ये नवीन डॅशबोर्ड आणि सेंट्रल कन्सोल देण्यात आला आहे. नवीन अल्टोमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, कीलेस एंट्री, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देखील मिळेल.
सेफ्टीच्या अनुषंगाने नवीन अल्टोमध्ये अनेक बदल देखील केले आहेत. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन मॉडेलमध्ये अधिक सेफ्टी फीचर्स अपडेट केली जातील. नवीन मारुती अल्टोमध्ये K10C DualJet 1.0L 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन असेल. हे इंजिन 67 bhp पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करेल. तसेच, यात अधिक इंजिन पर्याय ऑफर केले जाऊ शकतात. तसेच, कार मॅन्युअल गियर आणि ऑटोमॅटिक गियर दोन्ही पर्यायांमध्ये ऑफर केली जाईल. सीएनजी पर्यायातही कार उपलब्ध करून दिली जाऊ शकते.
नवीन अल्टो यावर्षी दिवाळीच्या आसपास लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. या कारची किंमत 3.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते. दरम्यान, मारुती सुझुकीने आपल्या सेलेरिओ, बलेनो आणि वॅगनआर वाहनांची नवीन मॉडेल्सही लॉन्च केली आहेत. आता कंपनी नवीन अल्टो लाँच करणार असल्याने ग्राहक या कारच्या लॉन्चिंगची वाट पाहत आहेत.
इतर बातम्या
वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर
Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती
3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स