2023 Hyundai Verna : आली रे आली नवी कोरी सेडान दणक्यात आली… 6 एअरबॅग…. 65 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्ससह लाँच, जाणून घ्या फीचर्स
Hyundai Verna यामध्ये, कंपनीने दोन पेट्रोल इंजिन पर्यायांसह सादर केले आहे, त्यात डिझेल इंजिनचा पर्याय उपलब्ध नाही. या कारमध्ये लक्झरी फीचर्ससोबतच, कंपनीने स्टँडर्ड 30 सेफ्टी फीचर्स आणि एकूण 65 सेफ्टी फीचर्सचा समावेश केला आहे.
नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी ह्युंदाईने (hyundai) अखेर आपल्या प्रसिद्ध सेडान कार Hyundai Verna चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल भारतीय बाजारात लाँच (launched in India market) केले आहे. आकर्षक लूक आणि शक्तिशाली इंजिन क्षमतेने सजलेल्या या कारमध्ये कंपनीने अनेक मोठे बदल केले आहेत ज्यामुळे ती मागील मॉडेलपेक्षा खूपच चांगली आहे. या कारमध्ये कंपनीने इलेक्ट्रॉनिक सनरूफ आणि अॅडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (ADAS) यासह अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. या फॅमिली सेडान कारची सुरुवातीची किंमत 10,89,900 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
नवीन Verna ब्रँडच्या स्पोर्टी डिझाइन लँग्वेजवर तयार केली गेली आहे, जी नवीन Tucson SUV मध्ये दिसली होती. या कारमध्ये अनेक डिझाईन एलिमेंट्स समाविष्ट करण्यात आले आहेत, ज्यामुळे ती मागील मॉडेलपेक्षा खूपच चांगली बनली आहे. याला स्प्लिट हेडलाइट्ससह संपूर्ण एलईडी लाइट बार देण्यात आला आहे. तसेच ग्रिल स्ट्रेच करण्यात आले असून ते कारची संपूर्ण रुंदी व्यापते. टक्सनमध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले.
कंपनीने या सेडान कारला फ्युचरिस्टिक लुक आणि डिझाइन देण्याचा प्रयत्न केला आहे. फ्लॅट बोनेट आणि उत्तम क्रीज लाइनने सजलेल्या या सेडानमध्ये फ्लेअर व्हील आर्क देण्यात आले आहे, ज्यामुळे कारच्या साइड प्रोफाइलला मस्क्यूलर लुक मिळतो. स्टायलिश डायमंड कट अलॉय व्हील्स कारचा लुक वाढवतात. या सेडान कारचा लूक अतिशय आकर्षक असून तरुणांना ही सेडान खूप आवडेल अशी अपेक्षा आहे.
या कारचे इंटीरियर ड्युअल टोन प्रीमियम थीमने सजवण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, तिला ड्रायव्हर सेंट्रिक केबिन देण्यात आली आहे आणि ती पूर्वीपेक्षा जास्त लेग रूम, हेड रूम आणि जागा प्रदान करते. तुम्हाला या कारमध्ये 528 लीटर बूट स्पेस मिळते जे सेगमेंटमध्ये सर्वोत्तम आहे. कारमध्ये दिलेली 64 कलर अॅम्बियंट लाइटिंग सिस्टीम कारचे इंटीरियर आणखी चांगले बनवते.
सेडानला फ्री-स्टँडिंग ड्युअल-स्क्रीन सेटअप मिळतो, ज्याला 10.25-इंच पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, तसेच समान आकाराची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. सेडानला लोअर आणि मिड व्हेरियंटमध्ये ड्युअल-टोन ब्लॅक आणि ऑफ-व्हाइट इंटीरियर थीम मिळते, तर टॉप-एंड ट्रिमला कॉन्ट्रास्ट लाल हायलाइट्ससह ऑल-ब्लॅक केबिन दिसेल..
65 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स :
नवीन Hyundai Verna मध्ये, कंपनीने स्टँडर्ड 30 सेफ्टी फीचर्स आणि एकूण 65 सेफ्टी फीचर्स समाविष्ट केली आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने, या कारला 6 एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), VSM, ट्रॅक्शन कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स मिळतात. इतर फीचर्समध्ये स्विच करण्यायोग्य कंट्रोलर, 8-स्पीकर बोस प्रीमियम ऑडिओ सिस्टम, तीन ड्राइव्ह मोड – इको, नॉर्मल आणि स्पोर्ट, हवेशीर फ्रंट सीट्स, इलेक्ट्रिक सनरूफ, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, एलईडी हेडलाइट्स यांचा समावेश आहे