‘ही’ आहे मारुतीची खरी मायलेज कार… अवघ्या 4.25 लाखांपासून सुरू, सहा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

मारुती सुझुकी इंडियाने नुकतेच मारुती सुझुकी एस-प्रेसोची 2022 व्हेरिएंट भारतात आणले आहे. कंपनीने त्यांचे पेट्रोल इंजिन अपडेट केले आहे. याशिवाय त्यांचे मायलेजही वाढवण्यात आले आहे. भारतीय बाजारात नवीन एस-प्रेसोची एक्स-शोरूम किंमत 4.25 लाख रुपये आहे.

‘ही’ आहे मारुतीची खरी मायलेज कार... अवघ्या 4.25 लाखांपासून सुरू, सहा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध
‘ही’ आहे मारुतीची खरी मायलेज कार... अवघ्या 4.25 लाखांपासून सुरू, सहा व्हेरिएंटमध्ये उपलब्धImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 11:05 AM

देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकी (Maruti Suzuki) इंडियाने मारुती सुझुकी एस-प्रेसोची 2022 सिरीज भारतात लॉन्च केली आहे. कंपनीकडून या कारचे पेट्रोल इंजिन अपडेट करण्यात आले आहे. याशिवाय कारच्या मायलेजमध्येही वाढ करण्यात आली आहे. भारतीय बाजारात नवीन एस-प्रेसोची (S-Presso) एक्सशोरूम किंमत 4.25 लाख रुपये आहे. कंपनीकडून किंमतीत 70,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र या किंमती व्हेरियंटच्या आधारावर वेगवेगळ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्याच्या वरच्या व्हेरिएंटमध्ये नवीन फीचर्सही (Features) देण्यात आले आहेत. नवीन एस-प्रेसोच्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही व्हेरिएंटमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या लेखाच्या माध्यमातून एस-प्रेसोच्या सर्व व्हेरिएंटच्या किंमती आणि फीचर्सबाबत आपण माहिती घेणार आहोत.

व्हेरिएंट  –  एक्सशोरूम किंमती

S-Presso std MT : 4.25 लाख. S-Presso LXi MT :  4.95 लाख. S-Presso VXi MT : 5.15 लाख. S-Presso VXi+ MT : 5.49 लाख. S-Presso VXi (O) AGS : 5.65 लाख. S-Presso VXi+ (O) AGS : 5.99 लाख.

सर्व व्हेरिएंटचे मायलेज

STD MT, LXI MT : 24.12 kmpl VXI MT, VXI+MT : 24.76 kmpl VXI(O) AGS, VXI+(O) AGS : 25.30 kmpl

हे सुद्धा वाचा

मारुती सुझुकी एस-प्रेसोचा परफार्मेंस

2022 मारुती सुझुकी एस-प्रेसो आता नवीन जनरेशन असलेल्या K-Series 1.0 लीटर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. त्याचे इंजिन 66 bhp ची कमाल पॉवर आणि 89 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह AMT युनिटशी जोडलेले आहे. मेकॅनिकल अपडेट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात आता आयडल स्टार्ट/स्टॉप टेक्नोलोजीचा वापर करण्यात आला असून त्यामुळे AMT व्हेरिएंट मॉडेलमध्ये 25.30 kmpl आणि मॅन्युअलमध्ये 24.76 kmpl पर्यंत मायलेज मिळू शकेल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.