Ola Electric : दिवाळीत ओला लाँच करणार नवीन सॉफ्टवेअर… इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मिळणार कॉलिंगची सुविधा…

नवीन फीचर्सची माहिती समोर येताच त्याबाबत ग्राहकांच्या मनात मोठी उत्सूकता निर्माण झालीय. मूव ओएस 2 पासून मूव ओएस 3 वर गेल्यानंतर बदल बघायला मिळतात. कंपनीनं फीचर्सचा खुलासा केलाय.

Ola Electric : दिवाळीत ओला लाँच करणार नवीन सॉफ्टवेअर... इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मिळणार कॉलिंगची सुविधा...
दिवाळीत ओला लाँच करणार नवीन सॉफ्टवेअरImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 11:36 AM

मुंबई : देशातील लोकप्रिय इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन आनंदाची बातमी आणली आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooter) एक नवीन सॉफ्टवेअर लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी मूव ओएस 3 ला दिवाळीत लाँच करण्याची माहिती दिली आहे. अपकमिंग सॉफ्टवेअर (New software) सोबत युर्जसला अनेक चांगले फीचर्सचाही अनुभव घेता येणार आहे. भाविश अग्रवाल यांच्या मते, मूव ओएस 3 च्या माध्यमातून यूजर्सला हिल होल्ड, प्रोक्सीमिटी अनलॉक, मूड्‌स, रीजेन व्ही 2, हायपरचार्जिंग, कॉलिंग सारखे चांगले फीचर्स मिळणार आहे. ओला एस 1 प्रो एक नवीन जेन इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या नवीन सॉफ्टवेअरमध्ये युजर्सना अधिक काय मिळेल याची माहिती या लेखातून घेणार आहोत.

मूव ओएस 3 मध्ये मिळणार नवीन फीचर्स

एक न्यू जेन इलेक्ट्रिक स्कूटर असल्याने ओला एस1 प्रो ॲडव्हांस कनेक्टिव्हिटी आणि ओटीए अपडेट्‌ससह उपलब्ध होणार आहे. हे अपडेट्‌स सामान्यपणे स्मार्टफोन किंवा संगणकीय उपकरणांना मिळणार्या अपडेट्‌स सारखेच राहणार आहेत. नवीन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये काही फीचर्सदेखील देण्यात येउ शकतात. या नवीन फीचर्समुळे ग्राहकांना चांगल्या ड्रायव्हिंग अनुभव मिळणार आहे.

या फीचर्सचा झाला खुलासा

नवीन फीचर्सची माहिती समोर येताच त्याबाबत ग्राहकांच्या मनात मोठी उत्सूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे यात हे बघणे महत्वाचे आहे, की मूव ओएस 2 पासून मूव ओएस 3 वर गेल्यानंतर कोणते मोठे बदल बघायला मिळतात. कंपनीचे सीईओ अग्रवाल यांनी काही फीचर्सचा खुलासा केला आहे. मूव ओएस 3 मध्ये युजर्सना हिल होल्ड, प्राक्सीमिटी अनलॉक, मूड्‌स, रीजेन वी 2, हायपरचार्जिंग, कॉलिंग, की शेअरिंग आदी फीचर्स मिळणार आहे.

असे आहेत फायदे

हिल होल्डच्या माध्यमातून वरच्या दिशेने जाण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागे जाण्याची गरज राहणार नाही. जशी चावी कारच्या जवळ जाईल, तसेच सेंसरला याचे सिंग्नल जातील. तसेच कालिंग फीचर्समध्ये टचस्क्रीन इंस्ट्रूमेंट क्लस्टरवर एक डिजिटल कीपॅड असण्याची शक्यता आहे. हे फीचर आपल्याला स्कूअरच्या स्पीकरसह सरळ कॉल घेण्याची परवानगी देउ शकते. शेवटी इलेक्ट्रिक स्कूटरच्या वापर करणारे अन्य युजर्ससाठी शेअरिंग फीचर्सही यात देण्यात आलेले आहेत.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.