Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हेंटिलेटेड सीट्‌स, कनेक्टेड कार टेक अन्‌ बरचं काही… टाटा हॅरियरचे नवीन व्हेरिएंट पाहिलेत का?

या व्हेरिएंटची किंमत 20 लाखांपासून ते 21.60 लाखांपर्यंत (एक्सशोरुम) आहे. नवीन व्हेरिएंटमध्ये फ्लॅगशिप फाइव-सीटर एसयुवीच्या लोवर व्हेरिएंटमध्ये नसलेले नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. हे सर्व व्हेरिएंट क्रायोटेक 2.0 लीटर डिझेल इंजीनने परिपूर्ण आहेत.

व्हेंटिलेटेड सीट्‌स, कनेक्टेड कार टेक अन्‌ बरचं काही... टाटा हॅरियरचे नवीन व्हेरिएंट पाहिलेत का?
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 5:35 PM

टाटा मोटर्सने हेरियर एसयुव्हीचे (Tata Harrier) तीन नवीन व्हेरिएंट मार्केटमध्ये आणले आहेत. या कार निर्माता कंपनीने आपल्या ऑफिशिअल वेबसाइटला XZS XZS ड्युअल टोन आणि XZS डार्क एडिशन नावाच्या नवीन व्हेरिएंटने अपडेट केले आहे. या व्हेरिएंटची किंमत 20 लाखांपासून ते 21.60 लाखांपर्यंत (एक्सशोरुम) आहे. नवीन व्हेरिएंटमध्ये फ्लेगशिप फाइव-सीटर (Flagship five-seater) एसयुवीच्या लोवर व्हेरिएंटमध्ये नसलेले नवीन फीचर्स यात देण्यात आले आहेत. हे सर्व व्हेरिएंट क्रायोटेक 2.0 लीटर डिझेल इंजीनने परिपूर्ण आहेत. यात सहा स्पीड मॅन्यूअल गिअरबाक्स किंवा सहा स्पीड ऑटोमॅटीक ट्रांसमिशन (Automatic transmission) हे दोन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आल आहेत. नवीन व्हेरिएंट टॉप-स्पेक XZ+ व्हेरिएंट आणि ऑटो हॅरियर एसयुव्हीच्या काजीरंगा एडिशनपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे.

हॅरियरच्या नवीन व्हेरिएंटमध्ये जोडण्यात आलेले काही खास फीचर्समध्ये पॅनोरमिक सनरुफ, 17 इंच ड्युअल टोन डायमंड कट अलॉय व्हील आणि ऑटो-डिमिंग IRVMs आदींचा समावेश आहे. ड्राइव्हर सीटमध्ये आता सिक्स-वे पॉवर ॲडजस्टेबल फंक्शनसोबत ॲडजस्टेबल लम्बर सपोर्ट देण्यात आलेला आहे. दरम्यान, टाटाने हॅरियरच्या नवीन व्हेरिएंटमध्ये व्हेंटिलेटेड सीट्‌स आणि आईआरए कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी सारखे फीचर्स दिले आहेत. हॅरियरची एक्सझेडएसचा वेटिंग टाईम जवळपास 30 दिवस आहे. तर दुसर्या व्हेरिएंटचा डिलिव्हरी टाईमदेखील 10 आठवड्यांपर्यंतचा आहे.

हॅरियर एसयुव्ही व्हेरिएंटची स्पेसिफिकेशन्स

जवळपास सर्वच एसयुव्ही बर्यापैकी एकसमान असतात. एक्सटीरियरबाबत बोलायचे झाल्यास, हॅरियरच्या नवीन व्हेरिएंटमध्ये एलईडी डीआरएल सोबत प्रोजेक्टर हेडलाईट्‌स देण्यात आले आहेत. या व्हेरिएंटमध्ये इंटीग्रेटेड टर्न इंडिकेटर्स देण्यात आले आहे. आतल्या बाजूला एसयुव्ही स्टडर्ड 8.8 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, 7 इंच ड्राईव्हर डिसप्ले, वायरलेस अँड्रॉईड ऑटो ॲप्पल कारप्ले, एअर प्यूरिफायर सारख्या विविध फीचर्सचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

सेफ्टीतही आहे दमदार

सेफ्टीचा विचार केल्यास, नवीन हॅरियर व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल, रोल ओव्हर मिटिगेशन, हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल, टेक्शन कंट्रोल ईएसपी, एबीएस आणि क्रूज कंट्रोल आदी देण्यात आलेले आहे. हुडेच्या खालचे इंजीन हेरियर व्हेरिएंटमध्ये वापरले आहेत तेच आहे. 20 लीटर इनलाइन फोर सिलेंडर टर्बोचार्ज्ड युनिट 170 पीएसचे जास्तीत जास्त आउटपूट आणि 350 एनएमचे पीक टार्क जनरेट करण्याचा दावा होत आहे. दरम्यान, मॅन्यूअल व्हेरिएंटचे मायलेज जवळपास 16.35  किमी परलिटर आहे. तर ऑटोमॅटिक व्हेरिएंटचा मायलेज 14.6 सांगण्यात येत आहे.

कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा.
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश.
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात.
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना.
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन.