मुंबई : वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ झपाट्याने विस्तारत आहे, मारुतीपासून ते बीएमडब्ल्यूपर्यंत सर्वजण इलेक्ट्रिक वाहनांवर काम करत आहेत. अनेक कार उत्पादकांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कारही सादर केल्या आहेत. आता लक्झरी कार उत्पादक बीएमडब्ल्यू त्याची बीएमडब्ल्यू 3 सीरीज इलेक्ट्रिक कार तयार करत आहे, ही दमदार कार एकाच चार्जवर 400 किंवा 500 किलोमीटर नव्हे तर तब्बल 700 किलोमीटरची अंतर पार करु शकते. BMW च्या दमदार रेंन्जमुळे तुम्ही एकाच चार्जमध्ये दिल्लीहून लखनौला पोहचाल.
जर्मन कार उत्पादक BMW New NK (Neue Klasse) EV तयार करत आहे. या नवीन प्लॅटफॉर्मवर तयार होणारी पहिली EV कार सेडान असेल, ज्याचे कोडनेम NK1 असेल. ही आगामी EV नविन जनरेशन ची BMW 3 सिरीजची इलेक्ट्रिक आवृत्ती असेल. अशी माहिती गाडीवाडी नावाच्या वेबसाईटवरून प्राप्त झाली आहे.
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली BMW 3 सिरीज लवकरच एक नवीन मॉडेल सादर करू शकते.BMW ही कंपनी आईसी इंजिन आणि ट्रान्समिशनऐवजी इलेक्ट्रिक पॉवरट्रेन वापरेल. NK1 ची रचना वेगळी असेल, परंतु त्यातील काही घटक नेक्ट जनरेशन BMW 3 Next Generation BMW 3 Series सिरीज सारखे दिसू शकतात.
BMW ब्रँडची सहा जनरेशनची इलेक्ट्रिक पॉवर ट्रेन NK 1 ला पॉवर करण्यासाठी वापरली जाईल, ज्यामध्ये कंपनी स्वतः बनवलेली इलेक्ट्रिक मोटर बसवणार आहे. कंपनीच्या मते, ही एक शक्तिशाली मोटर असेल त्यामुळे ती वीजचा जास्त वापर करेल. या प्लॅटफॉर्मवर 800 व्होल्टची बॅटरी वापरली जाईल, ज्याची चार्जिंग क्षमता 350 किलोवॅट असेल.बीएमडब्ल्यूच्या मते ही कार एकाच चार्जवर 700 किमीची ड्राइव्ह देऊ शकते, जी बाजारातील इतर कारच्या तुलनेत खूप जास्त आहे.
इतर बातम्या:
अवघ्या 27 हजारात घरी न्या Suzuki Access 125, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील
लॅपटॉपप्रमाणे कुठेही चार्ज करा, सिंगल चार्जवर 150km रेंज, भारताची पहिली AI इनेबल बाईक सादर