मारुती सुझुकीच्या तीन जबरदस्त कार, जाणून घ्या काय असेल खास

Maruti Suzuki Upcoming Cars | मारुती सुझुकी नवीन वर्षात स्विफ्ट आणि डिझायर अपडेट करणार आहे. या दोन कार जोरदार फीचर्स आणि मायलेजसह बाजारात येतील. याशिवाय SUV सेगमेंटवर पण कंपनी फोकस करत आहे. नवीन कार लाँच करण्याची तयारी कंपनी करत आहे. जाणून घ्या काय आहेत या कारची फीचर्स?

मारुती सुझुकीच्या तीन जबरदस्त कार, जाणून घ्या काय असेल खास
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 4:27 PM

नवी दिल्ली | 5 डिसेंबर 2023 : मारुती सुझुकी भारतीय भारतीय बाजारातील सर्वात मोठी कंपनी आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात कंपनीचा दबदबा आहे. आता कंपनी SUV सेगमेंटवर फोकस करत आहे. या सेगमेंटमध्ये नवीन कार बाजारात आणण्याची तयारी सुरु आहे. एसयुव्ही सेगमेंट अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. इतकंच नाही, मारुतीने नवीन मॉडेल बाजारात आणण्याची तयारी कंपनीने केली आहे. त्यामुळे पुढील वर्षात ऑटो क्षेत्रात तीव्र स्पर्धा पाहायला मिळेल. त्यात ग्राहकांना अनेक फीचर्ससह कार मिळेल.

या दोन मॉडेल्सवर भर

Maruti Suzuki ने सध्या त्यांच्या दोन लोकप्रिय कारवर लक्ष केंद्रीत केले आहे. कंपनी लोकप्रिय मॉडेल्स स्विफ्ट आणि डिझायर या दोन कारचे पुढील अपडेट व्हर्जन आणण्याच्या तयारीत आहोत. नवीन वर्षात मारुती सुझुकी काही नवीन मॉडेल्स पण बाजारात आणण्याची तयारी केली आहे.

हे सुद्धा वाचा

नवीन 7-सीटर प्रीमियम SUV

मारुती प्रीमियम क्लालिटीची नवीन 7-सीटर SUV येत आहे. कंपनीने अजून ही कार कधी बाजारात येईल, त्याचा खुलासा केला नाही. ही कार जून 2024 अथवा त्यानंतर बाजारात येऊ शकते. या नवीन कारचे फीचर्स आणि इंजिन ग्रँड व्हिटारा सारखे असू शकते. या कारमध्ये 1.5 लिटर, K15C आणि 1.5 लिटर हायब्रिड इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. या कारचे उत्पादन मारुती सुझुकीच्या खरखोदा प्लँटमध्ये करण्यात येणार आहे.

eVX SUV

मारुती भारतीय बाजारमध्ये इलेक्ट्रिक कार घेऊन येण्याच्या तयारीत आहे. eVX कॉन्सेप्टवर ही कार बाजारात येईल. या ईव्हीचे प्रोटोटाईप ऑटो एक्सपो 2023 मध्ये नजरेस पडले. ही इलेक्ट्रिक एसयुव्ही 4.3 मीटर लांब असेल. या कारचे उत्पादन सुरु झाले आहे. कंपनी 2024 मध्ये सणासुदीत ही कार बाजारात उतरवण्याची तयारी करत आहे. मारुती सुझुकी ही कार गुजरातमधील प्लँटमध्ये तयार करणार आहे.

नवीन स्विफ्ट आणि डिझायर

मारुती सुझुकी नवीन जनरेशनची स्विफ्ट हॅचबॅक आणि डिझायर सिडेन तयार करणार आहे. या दोन्ही कार फेब्रुवारी आणि एप्रिल 2024 मध्ये बाजारात दाखल होतील. या दोन्ही कार नवीन 1.2 लीटर, 3-सिलेंडर Z12E पेट्रोल इंजिनसह येईल. या कारला CVT गिअरबॉक्ससोबत जोडण्यात येईल. रिपोर्ट्सनुसार, नवीन स्विफ्ट एक लिटर पेट्रोलमध्ये 24.50 किलोमीटरपर्यंत मायलेज देईल.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.