Nissan कंपनीची बजेट एसयुव्ही Magnite नव्या अवतारात, किंमत आणि सेफ्टी दोन्हींमध्ये बेस्ट

निसान कंपनी भारतात मॅग्नाईट नावाची एसयुव्ही गाडीची विक्री करते. आता कंपनीने आपल्या या गाडीत काही अपडेट केले आहेत. कॅश डिस्काउंटसह निसान कंपनीकडून मॅग्नाईट गाडी विकत घेतल्यावर 2 वर्षांची सर्व्हिस फ्री दिली जात आहे.

Nissan कंपनीची बजेट एसयुव्ही Magnite नव्या अवतारात, किंमत आणि सेफ्टी दोन्हींमध्ये बेस्ट
बजेट Nissan Magnite एसयुव्ही नव्या ढंगात सादर, जाणून घ्या किंमत आणि इतर वैशिष्ट्ये
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 10:40 PM

मुंबई : भारतात सेडानपेक्षा एसयुव्ही गाड्यांची मागणी गेल्या काही वर्षात वाढली आहे. कंपन्यांच्या विक्री केलेल्या गाड्यांच्या आकडेवारीवरून ही माहिती वारंवार अधोरेखित झाली आहे. त्यामुळे प्रत्येक कंपन्या आपल्या एसयुव्ही गाड्यांची जाहिरात करत आहे. भारतीय बाजारातही एसयुव्ही गाड्यांची विक्री गेल्या महिन्यात चांगल्या पटीने वाढली आहे. जापानची वाहन निर्मात कंपनीही या बाबतीत मागे नाही. निसान कंपनी भारतात मॅग्नाईट नावाची एसयुव्ही गाडीची विक्री करते. आता कंपनीने आपल्या या गाडीत काही अपडेट केले आहेत. त्याचबरोबर स्टँडर्ड सेफ्टी फीचर्सही अपडेट केले आहेत. मॅग्नाईटमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल आणि हिल असिस्ट यासारखे बरेचसे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच सेफ्टीसाठी एसयुव्हीमध्ये ड्युअल फ्रंटल एअरबॅग, रियर पार्किंग सेंसर, ईबीडीसह एबीएस आणि फ्रंट सीट बेल्ट रिमांईडर सारखे फीचर्स या आधीपासूनच होते. आता ट्रॅक्सल कंट्रोल सिस्टम, हायड्रोलिक ब्रेक असिस्ट, व्हेईकल डायनामिक कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सारखे फीचर्स नव्याने जोडण्यात आले आहेत. त्यामुळे ही कार सुरक्षित गाड्यांच्या श्रेणीत आली आहे.

काय आहे किंमत

निसान मॅग्नाईटच्या एंट्री लेव्हल XE व्हेरियंटची किंमत 6 लाखांपासून सुरु होते आणि टॉप एंडच्या XV टर्बो प्रीमियम (o) ड्युअल टोन मॉडेलसाठी 10.94 लाखांपासून सुरु होते. ही किंमत एक्स शोरुम आहे. मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्ट करण्यात आली होती. त्यात प्रौढ पेसेंजरच्या सुरक्षेसाठी 4 स्टार आणि मुलांच्या सुरक्षेसाठी 2 स्टार देण्यात आले आहेत.

निसान मॅग्नाईटमध्ये दोन इंजिनचा पर्याय

निसान मॅग्नाईटमध्ये दोन इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. यात 1.0 लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 71 एचपी पॉवर आणि 96 एनएम टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे 1.0 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 100 एचपी आमि 160 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड गियरबॉक्सला जोडण्यात आलं आहे आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशनसह येते. ही गाडी 20 किमीपर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे.

निसान मॅग्नाईट एसयुव्हीवर काय आहे ऑफर?

कॅश डिस्काउंटसह निसान कंपनीकडून मॅग्नाईट गाडी विकत घेतल्यावर 2 वर्षांची सर्व्हिस फ्री दिली जात आहे. त्यामुळे गाडीच्या मेंटनेसबाबत दोन वर्ष विचार करण्याची गरज नाही. पण स्पेअर पार्ट चेंज करणं किंवा ऑईल बदलणं यासाठी पैसे भरावे लागतील. असं तरी हे बदलताना कंपनी कोणताही सर्व्हिस चार्ज आकारणार नाही. दुसरीकडे मॅग्नाईटवर कंपनी लोनही ऑफर करत आहे. ऑन रोड कॉस्टवर स्वस्त व्याजदरात लोन उपलब्ध करुन दिलं जात आहे. कंपनी या कारवर 6.99 टक्के व्याजाने लोन देते.

भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.