Nissan च्या ‘या’ कारला तुफान मागणी, उत्पादन वाढवण्याचा कंपनीचा निर्णय, दर महिन्याला 3500 गाड्या बनवणार
निसान इंडिया कंपनीने गेल्या वर्षी 3 डिसेंबर रोजी Nissan Magnite ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतात लाँच केली होती.
मुंबई : निसान इंडिया कंपनीने गेल्या वर्षी 3 डिसेंबर रोजी Nissan Magnite ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतात लाँच केली होती. ही कार भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. लाँचिंगनंतर अवघ्या 15 दिवसात या कारने 15 हजार बुकिंग्सचा टप्पा पार केला होता. त्यानंतर या कारच्या काही व्हेरियंट्ससाठी इतकी मागणी आहे की, या कारसाठी तब्बल 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड आहे. याचाच अर्थ या कारला भारतीय मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे. या कारला देशभरात मोठी मागणी आहे, आणि त्या तुलनेत पुरवठा कमी पडतोय, परिणामी कंपनीला या कारचं प्रोडक्शन (उत्पादन) वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. (Nissan magnite is on high demand, company Decided to increase production to 3500 units per month in chennai plant)
निसान इंडियाने निर्णय घेतला आहे की, ते त्यांच्या चेन्नई येथील प्लांटमध्ये दर महिन्याला निस्सान मॅग्नाईटच्या 3,500 युनिट्स गाड्यांचं प्रोडक्शन करणार आहेत. दरम्यान, कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मॅग्नाईटने नुकताच 50,000 बुकिंग्सचा टप्पा पार केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात सन 2021-21 मध्ये निसान मोटर इंडियाने एकूण 18,886 वाहनांची विक्री केली आहे. कंपनीने 2019-20 मध्ये 17,831 वाहनांची विक्री केली होती. कंपनीने त्यांच्या विक्रीत 6 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. चालू आर्धिक वर्षात कंपनीच्या विक्रीत तीन अंकी (टक्क्यांमध्ये) वाढ होईल, अशा योजना कंपनीने आखल्या आहेत.
कारच्या किंमतीत वाढ
निसान इंडियाने लाँचिंगनंतर आतापर्यंत या कारच्या किंमतीत तिसऱ्यांदा वाढ केली आहे. ही कार लाँच केल्यानंतर वर्षाच्या एका क्वार्टरमध्ये दोन वेळा कंपनीने या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. सर्वात आधी जानेवारी महिन्यात या कारच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. तेव्हा या कारचं बेस व्हेरिएंट XE च्या किंमतीत 50,000 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर निसान इंडियाने कोणतीही मोठी घोषणा न करता मार्च महिन्यात निसान मॅग्नाइट सब कॉम्पॅक्ट एसयूव्हीची किंमत देशभरात 30,000 रुपयांनी वाढवली होती. कंपनीने आपल्या पहिल्या सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या किंमती वाढवण्याची ही दुसरी वेळ होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा या कारच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
निसानने या कारच्या नॉन टर्बो व्हेरिएंट्सच्या किंमतीत 33,000 रुपयांची वाढ केली आहे. तर टर्बो पेट्रोल व्हेरिएंट्सच्या किंमतीत 20,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीने XV प्रीमियम (O) टर्बो पेट्रोल लाइनअप च्या किंमतीमधील वाढीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. XV प्रीमियम आणि XV प्रीमियम (O) व्हेरिएंट्समध्ये निसानच्या कनेक्टेड कार टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.
निसान मॅग्नाईटच्या सर्व (10) व्हेरियंट्सच्या किंमती
- Magnite XE – 5.59 लाख रुपये
- Magnite XL – 6.32 लाख रुपये
- Magnite XV – 6.99 लाख रुपये
- Magnite XV Premium – 7.68 लाख रुपये
- Magnite Turbo XL – 7.49 लाख रुपये
- Magnite Turbo XV – 8.09 लाख रुपये
- Magnite Turbo XV Premium – 8.89 लाख रुपये
- Magnite Turbo XL CVT – 8.39 लाख रुपये
- Magnite Turbo XV CVT – 9.02 लाख रुपये
- Magnite Turbo XV Premium CVT – 9.74 लाख रुपये
मॅग्नाईटसाठी 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड
दरम्यान, लाँचिंगनंतर अवघ्या 15 दिवसात या कारने 15 हजार बुकिंग्सचा टप्पा पार केला होता. त्यानंतर आता आता अशी माहिती मिळाली आहे की, या कारच्या काही व्हेरियंट्ससाठी इतकी मागणी आहे की, त्या कारसाठी तब्बल 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड आहे. याचाच अर्थ या कारला भारतीय मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे. शोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज लोक ही गाडी पाहण्यासाठी आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे, अशी माहिती दिल्लीतल्या काही डिलर्सनी दिली आहे. या कारच्या टॉप व्हेरियंटला सर्वाधिक मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. (Nissan Magnite waiting period Stretches to 8 months)
कशी आहे मॅग्नाईट?
कंपनीने ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही चार ट्रिममध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये XE, XL, XV आणि XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश असेल. मॅग्नाइटचे मायलेज 1.0 लीटर पेट्रोल 18.75kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (MT) वर 20kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (CVT) वर 17.7kmpl चे मायलेज देते. भारतात Nissan Magnite ची सुरूवातीची किंमत 4 लाख 99 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. निसान मॅग्नाइट ही एसयूव्ही 11 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुक करता येईल.
दोन इंजिनांचा पर्याय
Nissan Magnite मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल तर दुसरं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. या SUV चं नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन 999cc आहे, जे 6,250rpm वर 71 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करु शकेल आणि 3,500rpm वर 96nm इतकं पीक टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह सादर करण्यात आलं आहे. दुसरं इंजिन 1.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5,000 आरपीएम वर 99 बीएचपीची पॉवर आणि 2,800 आरपीएम वर 160 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं.
या एसयूव्हीच्या फिचर्समध्ये 8 इंचांची फ्लोटिंग टच स्क्रिन, 7 इंच टीएफटी मीटर, व्हॉइस रेकग्निशन, पुश बटन स्टार्ट, क्रुज कंट्रोल, 360 डिग्री अराऊंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 6 स्पीकर ऑडियो, ऑटोमॅटिक एसी, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमचा समावेश आहे.
Nissan Magnite मधील इतर खास फिचर्स
⦁ Nissan Magnite मध्ये Bi Projector LED हेडलँम्प्स देण्यात आले आहेत.
⦁ LED DRL, LED इंडिकेटर
⦁ 16 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स
⦁ व्हाइस रेकग्निशन, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, हाइट अडजस्टेबल ड्राइवर सीट, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर आणि एयर प्यूरिफायर सह जबरदस्त फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.
‘या’ गाड्यांना टक्कर
Nissan Magnite मार्केटमध्ये मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza), ह्युंदाई वेन्यू (Hyundai Venue), टाटा नेक्सॉन (Tata Nexon), फोर्ड इकोस्पोर्ट (Ford Ecosport), महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV 300), टोयोटा अर्बन क्रुझर (Toyota Urban Cruiser), होंडा WR-V (Honda WR-V) आणि नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या किया सोनेट (Kia Sonet) या कारशी थेट टक्कर होत आहे.
संबंधित बातम्या
भारतीयांच्या मनात भरलेली Nissan Magnite क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?
निसानच्या ‘या’ कारला भारतात तुफान मागणी, विक्रीच्या बाबतीत फेब्रुवारीत नवा रेकॉर्ड
(Nissan magnite is on high demand, company Decided to increase production to 3500 units per month in chennai plant)