मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, नागरिकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवावा, जास्तीत जास्त कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनं बनवावी, यासाठी केंद्र सरकार आणि अनेक राज्यं सरकारे प्रयत्न करत आहेत. (Nitin Gadkari believes India will become No 1 electric vehicle manufacturer in world)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी विश्वास व्यक्त केला की, पुढील सहा महिन्यांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीचे उत्पादन सुरू होईल. त्यामुळे येत्या काळात भारत इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीच्या बाबतीत पहिल्या स्थानी असेल. गडकरी म्हणाले की, एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनावर चालविण्याची क्षमता असणाऱ्या इंजिनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वाहन उत्पादकांना प्रोत्साहित करू इच्छिते. या संदर्भात उत्पादकांशी वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. गडकरी म्हणाले की, ‘भारत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या क्षेत्रात पुढे जात आहे. आगामी काळात या क्षेत्रात देशाचे पहिले स्थान असेल. सध्या सर्व नामांकित ब्रँड भारतात आहेत.
नितीन गडकरी परिवहन व महामार्ग मंत्रालयाव्यतिरिक्त सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभार पाहतात. ते म्हणाले की भारतामध्ये हरित ऊर्जा निर्मितीची मोठी क्षमता आहे. मला खात्री आहे की, आम्ही सहा महिन्यांत 100 टक्के लिथियम-आयन बॅटरी तयार करण्याच्या स्थितीत असू. हायड्रोजन फ्युएल सेल (HFC) तंत्रज्ञान सुरू करण्याच्या दृष्टीने सरकार काम करत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनमधील रासायनिक अभिक्रियेद्वारे विद्युत ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा वाहनाचे इंजिन चालवण्यासाठी वापरली जाते. यासाठी खनिज इंधनाची आवश्यकता नाही.
गडकरी म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांद्वारे परिवहन प्रणाली प्रदूषणमुक्त करता येईल. पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील. तसेच ही वाहनं किंमतीच्या बाबतीत पेट्रोल आणि डिझेल वाहनांशी स्पर्धा करू शकतील.
गडकरी म्हणाले की, मला भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या स्थानावर पाहायचा आहे. यासाठी सरकार इथेनॉल, मिथेनॉल, बायो-सीएनजी, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिकसह तत्सम इंधन इंजिन असलेली वाहने तयार करण्यास उत्पादकांना प्रोत्साहन देत आहे.
संबंधित बातम्या
Tesla ने त्वरित भारतात उत्पादन सुरु करावं, अन्यथा… नितीन गडकरींचा सल्लावजा इशारा
इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्याचं टेन्शन खल्लास, मुंबईत 10 नवे चार्जिंग स्टेशन्स सुरु
‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला देशात मोठी मागणी, आणखी दोन शहरात लाँच होणार
(Nitin Gadkari believes India will become No 1 electric vehicle manufacturer in world)