बाईक चालवताना नाही वाजणार थंडी, हे गॅझेट देणार ऊब

Motorcycle Handlebar | हिवाळ्यात दुचाकीवरचा प्रवास म्हणजे एक परीक्षाच असते. त्यात ग्रामीण भागात तर ओलिती असल्याने मोठ्या दिव्यातून जावे लागते. अशावेळी हे गॅझेट तुमच्या उपयोगी पडू शकते. त्यामुळे तुमच्या हाताला आराम मिळेल. तुम्ही आरामात बाईक अथवा स्कूटर दामटू शकता. त्यामुळे हात आखडणार नाही. कोणते आहे हे गॅझेट?

बाईक चालवताना नाही वाजणार थंडी, हे गॅझेट देणार ऊब
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 11:01 AM

नवी दिल्ली | 8 डिसेंबर 2023 : हिवाळ्यात दुचाकी चालविण्याची परीक्षा भारतीयांना द्यावी लागते. सकाळी आणि संध्याकाळी थंडीत बाईक चालवणे अवघड जाते. बाईक अथवा स्कूटरचे हँडल पकडल्यावर हात जाम होतात. रात्रीच्यावेळी तर अधिक त्रास जाणवतो. बाईक अथवा स्कूटरचे बँलन्स करणे अवघड जाते. एकतर समोर धुके असते आणि त्यात हात जाम होतो. पण हे गॅझेट तुमच्यासाठी वरदान ठरु शकते. तुमची अडचण दूर करण्यासाठी हे गॅझेट खास ठरेल. या गॅझेटच्या वापरामुळे तुमची मोठी अडचण दूर होईल. तुम्ही घरबसल्या हे गॅझेट ऑनलाईन खरेदी करु शकता. त्यासाठी ऑर्डर देऊ शकता.

Moyishi Pair Grip Handlebar Muff

बाईकचे हँडल धरण्यासाठी हे हँडग्लोव्ज, हातमोजे मदतीला येतील. हे हातमोजे तुमचे हात गरम ठेवतील. बाईक अथवा स्कूटरवर थंडीत प्रवास करताना तुमचे हात गरम राहतील. हे हातमोजे घातल्यानंतर हँडल नीट आणि पक्के धरता येईल. त्यामुळे बँलन्स हलणार नाही. तुमचे हात थंडीने थरथरणार नाहीत. त्यामुळे दुचाकी घसरण्याचा वा धडकण्याची भीती नसेल. हे हँडलबार ग्लोव्ज तुमचे हात गरम, ऊबदार ठेवतील. त्याला Handlebar Muff असे पण म्हणतात. त्यामुळे हाताला ऊब मिळेल आणि दुचाकी चालवताना त्रास होणार नाही.

हे सुद्धा वाचा

किंमत आणि सवलत

या Handlebar Muff ला बाजारात खूप मागणी आहे. या हँडलबार मफ्सची किंमत तशी 10,359 रुपये आहे. अर्थात ही किंमत खूप अधिक आहे. पण ई-कॉमर्स प्लेटफॉर्म एमेझॉनवर तुम्हाला हे हातमोजे सवलतीत मिळत आहेत. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 30 टक्के सवलत मिळत आहे. त्यामुळे हे हातमोजे 7,248 रुपयांना खरेदी करता येतील. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हे हातमोजे अनेक रंगात पण उपलब्ध आहेत. हे वॉटरप्रूफ थर्मल ग्लव्स आहेत. ते तुमच्या हाताला ऊबदार करतील. थंडीपासून वाचवतील.

ईएमआयचा पर्याय

आता 7,248 रुपये ही किंमत पण अधिक आहे. ग्राहकांसाठी या प्लॅटफॉर्मवर ईएमआयचा पर्याय देण्यात आला आहे. तुम्हाला एकदाच इतकी रक्कम खर्च करण्याची गरज नाही. ग्राहकांना ईएमआयचा पर्याय वापरुन हे हातमोजे खरेदी करता येतील. मासिक ईएमआयवर, हप्त्यावर हे हँडग्लोव्ज तुम्हाला 326 रुपयांवर खरेदी करता येतील.

अपघाताची भीती कमी

थंडीत दुचाकी चालविताना हात आखडतात. हाताला थंडी झोंबते. साधे हातमोजे थंडी थांबवू शकत नाही. हात जाम होतात. आखडतात. समोर धुक्याचे वातावरण असते. रस्ता निसरडा असेल तर अनेकदा अपघात होण्याची भीती असते. त्यामुळे हँडलबार मफ्फच्या मदतीने तुम्ही हाताला ऊबदार ठेवू शकता. पण असे उत्पादन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी त्या उत्पादनाविषयी काय रेटिंग दिले आणि काय कमेंट केली ती नक्की वाचा.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.