खिशात नाही दमडी, तरी पण खरेदी कार, शंभर टक्के लोन मिळणार

Electric Car Loan | इलेक्ट्रिक कार खरेदी करायची आहे, पण बजेटमुळे तुम्ही खरेदीचा विचार पुढे ढकलताय का? इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी अनेक बँका या कारच्या खरेदीसाठी कर्जावर विशेष ऑफर, सवलत देत आहेत. या बँकेने तर मोठी ऑफर आणली आहे.

खिशात नाही दमडी, तरी पण खरेदी कार, शंभर टक्के लोन मिळणार
Follow us
| Updated on: Feb 24, 2024 | 11:49 AM

नवी दिल्ली | 24 February 2024 : कार खरेदी करायची अनेकांची इच्छा असते. पण इतर जबाबदाऱ्या कर्जबाबतच्या अडचणी यांचा त्यांना सामना करावा लागतो. त्यातच आता इलेक्ट्रिक कारचा जमाना आला आहे. पेट्रोल-डिझेलच्या महागाईवर मात करण्यासाठी सरकार या कारच्या उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. तर खरेदीसाठी बँका पण अनेक ऑफर्स आणत आहेत. इलेक्ट्रिक कारच्या खरेदीसाठी कर्जावर विशेष सवलत आणि इतर ऑफरचा भडीमार करत आहे. तर एसबीआय इलेक्ट्रिक कार खरेदीवर मोठी सवलत देत आहे. तुम्ही या कर्जासाठी अर्ज केल्यास झटपट कार घरी आणू शकता.

एसबीआयची विशेष योजना

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, एसबीआयने इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी एक विशेष योजना बाजारात आणली आहे. 21 वर्षापासून ते 70 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला ही बँक ईव्हीसाठी कर्ज देते. तुम्ही 3 ते 8 वर्षापर्यंतच्या कर्जासाठी सुलभ पद्धतीने हप्ता देऊ शकतात. ईव्ही कारच्या कर्जावरील व्याजावर वाहन कर्जासाठी विशेष, 0.25 टक्क्यांची सूट देण्यात येत आहे. तुम्हाला इलेक्ट्रिक कारच्या ऑनरोड किंमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्जाची सुविधा मिळते. तर काही खास मॉडेलवर तुम्हाला 100 टक्के कर्जाची सुविधा देण्यात येत आहे. त्यामुळे खिशात दमडी नसतानाही तुमचे कार खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

किती कर्ज आणि किती व्याज

  • भारतीय स्टेट बँक या वेळी सर्वसाधारण कारवर 8.85 ते 9.80 टक्क्यांनी कर्ज देत आहे. तर इलेक्ट्रिक कारसाठी विशेष ऑफर सुरु आहे. इलेक्ट्रिक कारवर एसबीआय 8.75 ते 9.45 टक्के दराने कर्ज पुरवठा करते.
  • एसबीआय विविध उत्पन्न गटासाठी ईव्ही कार कर्ज देते. जर तुम्ही सरकारी कर्मचारी आहात आणि तुमचे किमान वेतन 3 लाख रुपये वार्षिक असेल. तर बँक तुमच्या नेट मासिक उत्पन्नावर जास्तीत जास्त 48 पट कार कर्ज देऊ शकते. शेती व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना, ज्याची वार्षिक कमाई कमीत कमी 4 लाख रुपये आहे. त्यांना एकूण उत्पन्नाच्या 3 पट कर्ज मिळू शकते. व्यापारी, व्यावसायिक, खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना करपात्र उत्पन्नाच्या चर पट कर्ज सुविधा देण्यात आली आहे.

कर्ज घेताना या गोष्टींवर लक्ष द्या

जर तुम्ही पगारदार असाल आणि इलेक्ट्रिक कारसाठी कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्याकडे गेल्या 6 महिन्यातील बँक खात्यातील सविस्तर माहिती द्यावी लागेल. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, ओळखपत्र, एड्रेस प्रुफ इतर संबंधित कागदपत्रं द्यावी लागतील.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.