आता ड्रायव्हिंग लायसन्स सोबत घेऊन फिरण्याची गरज नाही, फक्त फोनमध्ये ठेवा ‘हे’ ॲप

जर तुमच्या खिशात ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र नसेल आणि तुम्हाला वाहतूक पोलिसांनी पकडले तर तुम्हाला दंड भरण्याची गरज नाही. यावेळी फक्त तुमच्याकडे हे दोन अॅप असणं गरजेचे आहे.

आता ड्रायव्हिंग लायसन्स सोबत घेऊन फिरण्याची गरज नाही, फक्त फोनमध्ये ठेवा 'हे' ॲप
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 9:00 AM

अनेकदा आपण गाडी घेऊन घराबाहेर पडल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स विसरतो आणि नेमकं त्याच वेळी आपल्याला वाहतूक पोलीस पकडतात. यानंतर मग आपल्याला दंड भरावा लागतो. पण आता तुम्हाला खिशात ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन फिरण्याची अजिबात आवश्यकता नाही. जर तुमच्या खिशात ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र नसेल आणि तुम्हाला वाहतूक पोलिसांनी पकडले तर तुम्हाला चलान फाडण्याची किंवा दंड भरण्याची गरज नाही. यावेळी फक्त तुमच्याकडे हे दोन ॲप असणं गरजेचे आहे.

वाहन चलनाच्या रकमेतही पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेकदा आवश्यक कागदपत्रांमुळे आपल्याला चलान भरावे लागते. पण तुम्हाला माहित आहे का फक्त एका मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही ही समस्या टाळू शकता. पूर्वी जिथे चालान लगेच कळायचे, आता अनेकदा फोनवर मेसेज आल्यावरच कळते की तुमचे चालान कापले गेले आहे. पण, तुम्ही काळजी करु नका. आता डिजिलॉकर आणि एमपरिवहन अ‍ॅपवर कागदपत्रांची डिजीटल प्रतही वैध मानली जाणार आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

नियम वाचा आणि दंड टाळा

आयटी अ‍ॅक्टनुसार ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, विमा अशा कागदपत्रांच्या प्रत्यक्ष प्रती दाखवणे बंधनकारक नाही. डिजिलॉकर आणि एमपरिवहन अ‍ॅपवर उपलब्ध कागदपत्रांची डिजीटल प्रत वैध मानली जाईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांना यासंदर्भात सूचनाही दिल्या आहेत.

आता वाहतूक पोलिस त्यांच्या मोबाईलमधून क्यूआर कोड स्कॅन करून ड्रायव्हर आणि वाहनाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती मिळवू शकतात. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याची नोंदही डिजीटल पद्धतीने ठेवता येणार आहे.

या स्टेप्स करा फॉलो?

या फीचरचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये डिजिलॉकर आणि एमपरिवहन अ‍ॅप डाऊनलोड करावे. अ‍ॅपमध्ये नोंदणी करण्यासाठी आपला मोबाइल नंबर प्रविष्ट करा आणि ओटीपी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर तुमचे युजरनेम आणि पासवर्ड सेट करून अ‍ॅपमध्ये लॉग इन करा. आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक डिजिलॉकर अ‍ॅपमध्ये लिंक करावा लागेल ओटीपीद्वारे त्याची पडताळणी करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आणि विम्याची डिजिटल प्रत डिजिलॉकरवरून डाऊनलोड करू शकता.

एमपरिवहन अ‍ॅपमध्ये वाहन मालकाचे नाव, वाहनाच्या नोंदणीची तारीख, मॉडेल क्रमांक, विम्याची वैधता आदी सर्व आवश्यक माहिती असते. अशा प्रकारे या अ‍ॅप्सचा वापर करून तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय वाहतूक पोलिसांना आवश्यक कागदपत्रे दाखवू शकता आणि दंड टाळू शकता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.