आता घरबसल्या बघा वाहनाचे प्रदूषण प्रमाणपत्र… ‘या’ पध्दतीने फॉलो करा…

आजकाल कुठेही प्रवासात असल्यास आपल्या वाहनाचे पीयूसी सोबत ठेवणे आवश्‍यक असते. केव्हाही वाहतूक पोलिसांकडून वाहनाच्या पीयूसीची मागणी करण्यात येत असते. ते न दाखविल्यास भलामोठा दंडही आकरला जात असतो. त्यामुळे पीयूसी सेंटरमधून आपल्या वाहनाचे पीयूसी काढणे अत्यंत आवश्‍यक असते. आता हे पीयूसी वाहनधारक ऑनलाइन पध्दतीनेही पाहू शकतात.

आता घरबसल्या बघा वाहनाचे प्रदूषण प्रमाणपत्र... ‘या’ पध्दतीने फॉलो करा...
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 11:32 AM

मुंबईः पर्यावरणाला वाचविण्यासाठी वायू प्रदूषणास (Air pollution) आळा घालणे महत्वाचे आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे ती समस्या कमी करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. दुसरीकडे आपण अनेकदा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूर सोडणारी वाहनेही बघतो. त्यातून मोठ्या प्रमाणात वायू प्रदुषण होते. याची तपासणी करण्यासाठी सरकारने काही नियम आखून दिले आहेत. गाड्यांसाठी सरकारी मान्यताप्राप्त पीयूसी (PUC) सेंटर प्रत्येक ठिकाणी दिसून येतात. पीयूसी सेंटरवर आपल्या गाडीच्या प्रदूषणाची तपासणी केली जात असते. पीयूसी सेंटर आणि आरटीओ (RTO) प्रदूषणाबाबत प्रमाणपत्र देत असते. परंतु जर तुम्हाला या प्रमाणपत्रासाठी फिरफिर नको असेल तर, तुम्ही स्वत: देखील हे प्रमाणपत्र काढू शकतात.

जवळच्या पीयूसी सेंटवर जावे

वाहनधारक घरबसल्या आपल्या कार किंवा बाइकचे प्रदूषण प्रमाणपत्र पाहू शकतात. परंतु यासाठी तुम्हाला आपल्या गाडीचे प्रदूषण प्रमाणपत्र काढून घ्यावे लागणार आहे. यासाठी वाहनधारक आपल्या जवळील पीयूसी सेंटवर जाउन हे काम करु शकतात.

प्रदूषणाची तपासणी करावी

जवळील पीयूसी सेंटर गेल्यावर संबंधितांकडून आपल्या वाहनाची तपासणी करुन घ्यावी. पीयूसी सेंटरवरील ऑपरेटर तुमच्या गाडीची तपासणी करेल. वाहनधारकाचे वाहन ठरवून दिलेल्या मर्यादेत वायूचे उत्सर्जन करतेय, की जास्त याची तपासणी केली जाईल. सर्व तपासणी झाल्यावर पीयूसी ऑपरेटर प्रदूषण सर्टिफिकेट देईल. त्यानंतर प्रदूषण प्रमाणपत्र काढण्यासाठी काही शासकीय शुल्क भरावा लागत असतो. वाहनधारक कार, बाईक किंवा कोणत्याही वाहनानुसार ठरवून दिलेला शुल्क भरावा लागतो.

अशा पध्दतीने ऑनलाइन पीयूसी काढा

1) परिवहन सेवा वेबसाइटवर जावे.

2) पीयूसी स्टेट्‌स पर्यायावर क्लिक करा.

3) आता गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर टाका.

4) गाडीच्या चेसिस नंबरची शेवटचे पाच आकडे टाका.

5) कॅप्चा कोड टाकून सबमिट करा.

6) तुमच्या गाडीचे प्रदुषण प्रमाणपत्र दिसून येईल.

7) प्रिंट पर्यायावर क्लिक कारुन प्रदूषण प्रमाणपत्राचे प्रिंट काढून सेव्ह करा.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.