स्वस्तात मस्त इ-बाइक, एका चार्चमध्ये चालवा 125 किमी. फक्त 999 रूपयांत करा बुक

नवीन Odysse Vader लाँच करण्यासोबतच कंपनीने अधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. इच्छुक ग्राहक ही बाईक कंपनीच्या अधिकृत डीलरशिपद्वारे फक्त रु.999 मध्ये बुक करू शकतात.

स्वस्तात मस्त इ-बाइक, एका चार्चमध्ये चालवा 125 किमी. फक्त 999 रूपयांत करा बुक
इ बाइकImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 9:32 PM

मुंबई : आणखी एका नवीन खेळाडूने इलेक्ट्रिक मोटरसायकल विभागात प्रवेश केला आहे. आघाडीच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप Odysse Electric ने आज आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक (E bike India) Odysse Vader बाजारात आणली आहे. आकर्षक लूक आणि शक्तिशाली बॅटरी पॅकने सुशोभित केलेली ही देशातील पहिली बाईक आहे ज्यामध्ये 7-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, ज्याचा वापर Android डिस्प्ले आणि Google Map नेव्हिगेशनसाठी केला जाईल. कंपनीने ही बाईक 1,09,999 रुपये (एक्स-शोरूम, अहमदाबाद) च्या किमतीत लॉन्च केली आहे.

Odysse Vader अनेक प्रकारे खास आहे, फक्त किंमत नाही. ही इलेक्ट्रिक बाइक दैनंदिन वापरासाठी अतिशय योग्य मानली जाते, कंपनीने यामध्ये 18 लिटर क्षमतेची स्टोरेज स्पेस दिली आहे. याशिवाय, ही बाईक अनेक वेगवेगळ्या रंगांमध्ये देखील उपलब्ध आहे, ज्यात मिडनाईट ब्लू, फेयरी रेड, ग्लॉसी ब्लॅक, व्हेनम ग्रीन आणि मिस्टी ग्रे यांचा समावेश आहे.

बॅटरी पॅक आणि परफोर्मन्स

कंपनीने या बाईकमध्ये 3.7 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे, जी 3 kW क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरला जोडलेली आहे. ही इलेक्ट्रिक मोटर 6 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की ही बाईक एका चार्जमध्ये 125 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते आणि तिची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 4 तास लागतात. त्याचा टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रति तास आहे.

हे सुद्धा वाचा

फक्त 999 रुपयात बुक करा

नवीन Odysse Vader लाँच करण्यासोबतच कंपनीने अधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. इच्छुक ग्राहक ही बाईक कंपनीच्या अधिकृत डीलरशिपद्वारे फक्त रु.999 मध्ये बुक करू शकतात. येत्या जुलै महिन्यापासून या बाईकची डिलिव्हरी सुरू होणार असून, या बाईकचे खरेदीदार फेम-2 सबसिडीचा लाभ घेऊ शकतात.

थोडक्यात पण महत्त्तवाचे

किंमत : 1.10 लाख रुपये बॅटरी : 3.7 kWh लिथियम-आयन ड्रायव्हिंग रेंज : 125 किमी चार्जिंग वेळ : 4 तास टॉप स्पीड : 85 किमी प्रतितास

वडेरचे कर्ब वजन 128 किलो आहे, त्याला कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टम (CBS) आणि समोर (240mm) आणि मागील (220mm) डिस्क ब्रेक मिळतात. मोटरसायकलमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमसह 7-इंचाचे इन्स्ट्रुमेंट पॅनेल आहे आणि ते अॅप आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. यात एलईडी लाइटिंग आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग देखील मिळते.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.