okinawa Electric scooter : आगीच्या घटनांनंतरही भारतात नंबर वन ठरली ‘ही’ इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी
ओकिनावा ऑटोटेक देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी आहे. मे 2022 मध्ये कंपनीने देशातील सर्वात जास्त एकूण 9309 युनिटची विक्री केली होती. मागील वर्षी मेमध्ये कंपनी फक्त 217 युनिटचीच विक्री केली होत.
okinawa Electric scooter : गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. आग लागल्याच्या घटनांमध्ये ओकिनावा (Okinawa) इलेक्ट्रिक स्कूटरचाही सहभाग होता. परंतु असे असतानादेखील ऑटोमोबाईल इंडिस्ट्रीच्या (Automobile Industry) संघटन फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या माहितीनुसार, ओकिनावा ऑटोटेक देशाती सर्वात मोठी टू-व्हीलर कंपनी ठरली आहे. मे 2022 मध्ये कंपनीने देशातील सर्वात जास्त एकूण 9309 युनिटची विक्री केली होती. मागील वर्षी मेमध्ये कंपनी फक्त 217 युनिटचीच विक्री केली होत. गेल्या महिन्यात ओलाने 9225 युनिटची विक्री करुन दुसरा क्रमांक मिळवला होता.
क्रमांक एकवर आली ओकिनावा कंपनी
ओकिनावाने नुकतेच दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये 1200 ते 1500 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची घोषणा केली आहे. ओकिनावाच्या सध्या 150000 इलेक्ट्रिक टू-व्हीलर रस्त्यांवर धावत आहेत. ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याच्या घटनांमधून बाहेर पडून कंपनीने वेगाने आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरचा व्यापार देशभरात पसरविला आहे.
दरम्यान, इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या बाजारात सतत मोठी ग्रोथ झालेली दिसून येत आहे. परंतु ओला इलेक्ट्रिक, प्योर ईवी, ओकिनावा स्कूटर्स आदी अनेक स्कूटरमध्ये आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या. बॅटरीच्या तक्रारीनंतर ओकिनावा ने Praise Pro EV ची 3215 युनिट्सला परत मागविले होते. अशा घटनांमुळे ग्राहकांच्या मनात शंका निर्माण होण्यास कारण ठरते.
ओकिनावा कंपनीचे म्हणणे आहे, की इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सकडे ग्राहकांचा चांगला ओढा वाढत आहे. त्याच्या सुरक्षेला लक्षात घेउन आम्ही या सेगमेंटमध्ये चांगले काम करीत आहोत. एका रिपोर्टनुसार, ओकिनावाचे फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर जीतेंद्र शर्मा यांनी सांगितलेय, की कंपनीने पुढील वर्षांमध्ये मजबूतीसह नवनवीन वाहने व कंपनीला प्रेझेंट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी पुढील काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे पूर्ण इको सिस्टम तयार करणार आहे.
इटलीच्या Tacita सोबत टायअप
ओकिनावाचे फाउंडर जितेंद्र शर्मा यांनी सांगितले, की कंपनी भविष्यातील स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार आहे. ओकिनावाने इटलीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता टेसिटासोबत टायअप केले आहे. ही पार्टनरशिप पारंपारिक इंधनाच्या वापराला कमी करण्यासाठी दिशादर्शकाचे काम करणार आहे. कंपनी इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या जगात एक प्रमुख खेळाडू म्हणून लीड करेल, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला आहे.