पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर, आता इलेक्ट्रिक स्कूटर महागल्या, Ola कडून दरवाढीची घोषणा
ओला एस 1 प्रो (Ola S1 Pro) या इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooter) किंमत वाढणार आहे आणि पुढची खरेदी विंडो ओपन झाल्यावर कंपनी ही स्कूटर जास्त किमतीत विकणार आहे.
मुंबई : ओला एस 1 प्रो (Ola S1 Pro) या इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooter) किंमत वाढणार आहे आणि पुढची खरेदी विंडो ओपन झाल्यावर कंपनी ही स्कूटर जास्त किमतीत विकणार आहे. सध्या, Ola S1 Pro ची किंमत 1,29,999 लाख रुपये आहे आणि 18 मार्च नंतर, बंगळुरू स्थित मोबिलिटी फर्मने त्यांच्या किमती वाढवण्याबद्दल माहिती शेअर केली आहे. अलीकडेच कंपनीने गेरुआ रंग सादर केला आहे, जो खास होळीच्या (Holi 2022) पार्श्वभूमीवर आणला गेला आहे. या रंगाची स्कूटर केवळ 17 आणि 18 मार्च दरम्यान खरेदी करता येईल. कंपनीने शेअर केलेल्या माहितीनुसार, Ola S1 Pro च्या या नवीन ऑर्डर्सची डिस्पॅच प्रक्रिया एप्रिल 2022 पासून सुरू होईल, जी थेट ग्राहकांच्या घरी पोहोचवली जाईल.
ओलाने माहिती शेअर केली आहे की, त्यांनी त्यांच्या स्कूटरसाठी नवीन अपडेट्स देखील जाहीर केले आहेत. हे अपडेट्स स्कूटरचा परफॉर्मन्स सुधारेल आणि मूव्हओएस 2.0 अपडेटसह नवीन फीचर्स देखील समाविष्ट करेल.
ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर ट्विट करून ही माहिती दिली आहे. ग्राहक ही स्कूटर ओला अॅपद्वारेच खरेदी करू शकतात. Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या खरेदीबद्दल त्यांनी खरेदीदारांचे आभार मानले आहेत.
Ola S1 चं उत्पादन बंद
ला इलेक्ट्रिकने आपल्या सर्वात स्वस्त ई-स्कूटर S1 चे उत्पादन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सर्व S1 ग्राहकांना याबाबत माहिती देणारा ईमेलही पाठवला आहे. कंपनीने संभाव्य S1 खरेदीदारांना पाठवलेल्या ईमेलनुसार, कंपनी हे व्हेरिएंट बनवणे थांबवत आहे. ओलाचा दावा आहे की, त्यांच्या बहुतेक ग्राहकांनी अधिक महाग असलेलं आणि लोडेड व्हेरिएंट S1 Pro (Ola S1 Pro) खरेदी केले आहे. ग्राहकांची पसंती एस 1 प्रो या स्कूटरला जास्त आहे, त्यामुळे कंपनी उत्पादन लाइनमध्ये त्या व्हेरियंटला प्राधान्य देत आहे. S1 ग्राहकांना S1 Pro वर अपग्रेड करण्याचा पर्याय देण्यात आला आहे, परंतु यासाठी त्यांना अधिक पैसे मोजावे लागतील. मात्र, तरीही ग्राहकांना S1 व्हेरिएंटच घ्यायचं असेल तर त्यांना वर्षाच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागेल.
ओलाने ई-स्कूटर S1 चे उत्पादन थांबवले
ई-स्कूटर निर्मात्या कंपनीची ही नवीन डेव्हलपमेंट अशा खरेदीदारांसाठी योग्य नाही ज्यांनी ईव्ही पाहिल्याशिवाय किंवा अनुभवल्याशिवाय ब्रँडवर विश्वास ठेवला होता. या ग्राहकांनी महिनोन्महिने वाट पाहिली आणि आता या बातमीनंतर ओलाच्या ग्राहकांच्या विश्वासाला तडे जाऊ शकतात. ओलाचे हे वर्तन चुकीचे आहे. ग्राहकांचं म्हणणं आहे की, कंपनीने योग्य वेळी S1 व्हेरिएंटसाठी बुकिंग घेणे बंद करायला हवे होते, तसेच उत्पादन बंद करण्यापूर्वी ज्या ग्राहकांनी एस 1 ई स्कूटर बुक केली आहे, त्यांना वाहन डिलीव्हर करायला हवे होते.
इतर बातम्या
जुनी वाहनं 8 पट शुल्क भरुन Re register करा, अन्यथा भंगारात काढण्याशिवाय पर्याय नाही
शानदार लूक, ॲडव्हान्स फीचर्ससह Renault Kwid MY22 लाँच, किंमत…
100 फुट लांब कार, हेलिपॅड, गोल्फ कोर्स आणि स्विमिंग पूलसह अनेक सुविधांनी सुसज्ज, गिनीजमध्ये नोंद