आमची इलेक्ट्रीक स्कूटर एकद ‘फीट ‘; वाहनांच्या भविष्यातील क्रांती ‘हिट’ !
'तुम्ही सज्ज असा किंवा नाही, क्रांती येत आहे.' (Ready or not, a revolution is coming) अशा निर्धारासह इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उतरलेल्या ओला कंपनीच्या क्रांतीला अपघाताची मालिकेने काळवंडलय. नुकत्याच गुवाहाटी अपघाताने त्यात भर घातली. स्कूटरमधील बिघाडावर ग्राहकाने आगपाखड केल्यानंतर कंपनीने त्यांचे मॉडेल फिट असल्याचा दावा केला आहे.
मुंबई : ‘तुम्ही सज्ज असा किंवा नाही, क्रांती येत आहे.’ (Ready or not, a revolution is coming) अशा निर्धारासह इलेक्ट्रीक स्कूटर (Electric Scooter) बाजारात उतरलेल्या ओला (OLA) कंपनीच्या क्रांतीला अपघाताची मालिकेने काळवंडलय. नुकत्याच गुवाहाटी अपघाताने ( Guwahati Accident) त्यात भर घातली. स्कूटरमधील बिघाडावर ग्राहकाने आगपाखड केल्यानंतर कंपनीने त्यांचे मॉडेल फिट असल्याचा दावा केला आहे. यापूर्वी वाहनाला आग लागून ते भस्मात झाले होते. तर या प्रकरणात ग्राहकालाही इजा पोहचल्याने कंपनीने हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. संपूर्ण तपासणी नंतर कंपनीने त्यांची इलेक्ट्रीक स्कूटर ओला एस 1 प्रो (S1 Pro) ला क्लीनचिट दिली आहे. आमचे उत्पादन शंभर कॅरेट दमदार आहे, त्यात कोणताही तांत्रिक दोष नाही, पण ओवरस्पीडिंगमुळे (OverSpeeding) ही दुर्घटना घडल्याचे खापर कंपनीने उलट ग्राहकावरच फोडले आहे. तर ग्राहकाने कंपनीच्या स्कूटरमधील ब्रेक सिस्टिममध्येच (Brake System) गडबड असल्याचा आरोप केला आहे.
दावे-प्रतिदावे
ओला कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन या घटनेचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, ग्राहक सातत्याने स्कूटर अतिगतीने पळवत होता. परंतू, अचानक आलेल्या रस्त्यातील अवरोधामुळे त्याने घाबरुन जोरात ब्रेक दाबले. त्यामुळे हा अपघात झाला. ओलाच्या दाव्यानुसार, या अपघातात ग्राहकाने तीन वेळा स्कूटरला अतिवेगाने पळविले. पहिल्यावेळेस दोन वेळा जवळपास 11 किलोमीटर स्कूटरला अतिवेगाने पळविण्यात आले. त्यानंतर तिस-यांदा ग्राहकाने अतिवेगाने स्कूटर पळविण्याचा प्रयत्न केल्यावर हा अपघात घडला. त्यावेळी स्कूटरचा वेग 95 किलोमीटर प्रति तास होता. तसेच त्याने समोरुन आलेल्या अवरोधामुळे एकाचवेळी तीन ही ब्रेक दाबल्याने हा अपघात झाला. तर ग्राहकाने कंपनीच्या स्कूटरमधील ब्रेक सिस्टिममध्येच (Brake System) गडबड असल्याचा आरोप केला आहे.
काय आहे प्रकरण
ग्राहकाने ओलाच्या इलेक्ट्रीक स्कूटर एस 1 प्रो च्या उत्पादनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तांत्रिक दोषामुळेच हा अपघात घडल्याचा आणि त्याच्या मुलाला त्यात इजा झाल्याचा दावा केला आहे. या अपघातात ग्राहकाच्या मुलाचा हात तुटल्याने(Fracture) त्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. ग्राहकाच्या दाव्यानुसार, तो ब्रेक दाबत असताना ओलाची इलेक्ट्रीक स्कूटर अतिवेगाने पळत होती. त्याने दोन-तीन वेळा प्रयत्न केल्यावर हा अपघात झाला. ग्राहकाच्या दाव्यानुसार, गुवाहाटी येथे उपचार होत नसल्याने तातडीने पुढील उपचारांसाठी त्याला मुलाला मुंबईत भरती करावे लागले.
अपघात मालिकेमुळे चिंता
ओला कितीही दावे करत असली तरी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उतरलेल्या ओला कंपनीच्या क्रांतीला अपघाताची मालिकेने काळवंडलय. नुकत्याच गुवाहाटी अपघाताने त्यात भर घातली. स्कूटरमधील बिघाडावर ग्राहकाने आगपाखड केल्यानंतर कंपनीने त्यांचे मॉडेल फिट असल्याचा दावा केला आहे.पण सातत्याने होणा-या अपघात सत्रामुळे त्यांच्या भविष्यातील वाहन उद्योगातील क्रांतीवर प्रश्नचिन्ह उभं केले आहे.
इतर बातम्या
वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर
Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती
3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स