मुंबई : दिवसेंदिवस वाहन उद्योगात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) मागणी झपाट्याने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये दुचाकी वाहनांची सर्वाधिक वाढ होत आहे. ज्यामध्ये ओला इलेक्ट्रिकची ओला एस1 प्रो (Ola S1 Pro) ही लोकप्रिय स्कूटरपैकी एक मानली जाते. या इलेक्ट्रिक स्कूटरला देशभरात खूप पसंती मिळाली आहे. दरम्यान, कंपनीच्या या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याचे प्रकरण समोर आले आहे. स्कूटरला आग लागल्याचा व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर जळताना दिसत आहे. ही घटना पुण्यातील आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काळ्या रंगाची Ola S1 Pro रस्त्यावर जळताना दिसत आहे. ज्यावर लोक सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
ओला इलेक्ट्रिकने पुण्यातील त्यांच्या S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेल्या आगीच्या घटनेच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यावेळी इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्यावर उभी होती, त्यामुळे या घटनेत कोणाच्याही जीवितास धोका निर्माण झाला नाही ही दिलासादायक बाब आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
ओला इलेक्ट्रिकच्या बाबतीत अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. मात्र या घटनेने इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच ओला इलेक्ट्रिकने एक निवेदन जारी केले. बंगळुरूस्थित ब्रँडने सांगितले की, “आम्हाला पुण्यातील आमच्या एका स्कूटरसोबत घडलेल्या घटनेची माहिती आहे आणि आम्ही त्याचे मूळ कारण समजून घेण्यासाठी तपास करत आहोत आणि येत्या काही दिवसांत अपडेट शेअर करू. आम्ही ही एक घटना गांभीर्याने घेत आहोत आणि यावर योग्य ती कारवाई करू आणि येत्या काही दिवसांत तुमच्यासोबत माहिती शेअर करू.”
या घटनेवर प्रतिक्रिया देताना ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले, “सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत आणि त्याचे निराकरण करू.” ओला इलेक्ट्रिकने असेही सांगितले की ज्या ग्राहकाच्या S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली आहे. आम्ही त्याच्या संपर्कात आहोत.
Ola S1 Pro Electric Scooter ला लागली आग (पुण्यातली घटना)
स्कूटर जळून खाक
ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न #Ola #OlaS1Pro #ElectricScooter #ElectricVehicles pic.twitter.com/ebbsJ45pUC— अक्षय चोरगे (Akshay Chorge) (@AkshayChorge1) March 28, 2022
ओला एस 1 प्रो (Ola S1 Pro) या इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooter) किंमत नुकतीच वाढवण्यात आली आहे. Ola S1 Pro ची किंमत 1,29,999 लाख रुपये होती आणि 18 मार्च नंतर, बंगळुरू स्थित मोबिलिटी फर्मने त्यांच्या किमती वाढवल्या आहेत. Ola S1 Pro च्या या नवीन ऑर्डर्सची डिस्पॅच प्रक्रिया एप्रिल 2022 पासून सुरू होईल, जी थेट ग्राहकांच्या घरी पोहोचवली जाईल. ओलाने माहिती शेअर केली आहे की, त्यांनी त्यांच्या स्कूटरसाठी नवीन अपडेट्स देखील जाहीर केले आहेत. हे अपडेट्स स्कूटरचा परफॉर्मन्स सुधारेल आणि मूव्हओएस 2.0 अपडेटसह नवीन फीचर्स देखील समाविष्ट करेल.
Our statement on the Pune incident. pic.twitter.com/aSX1DlTBmd
— Ola Electric (@OlaElectric) March 26, 2022
इतर बातम्या
कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी, नितीन गडकरींनी जारी केलेले नियम लागू होणार
भारतात 1 एप्रिलपासून सर्व BMW कार महागणार, पाहा किती होणार दरवाढ
नवीन कलर थीम आणि स्पोर्टी लूकसह 2022 Yamaha YZF-R3 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स