Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ola S1 ते Komaki TN95, 2021 मध्ये या टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती

2021 या वर्षात देशात उत्तमोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक लाँच करण्यात आल्या. त्यामध्ये Ola S1, Simple One, Eeve Soul, Bounce Infinity E1 (बाउन्स इन्फिनिटी ई1), KOMAKI TN 95 या स्कूटर्सचा समावेश आहे.

Ola S1 ते Komaki TN95, 2021 मध्ये या टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती
Electric Scooters : Ola S1, Eeve Soul, Bounce Infinity E1
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 9:43 PM

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करत आहेत. (Ola S1, simple one to Komaki TN95 Top electric scooters launched in 2021 know price and features)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. वाहन कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. 2021 या वर्षात देशात उत्तमोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक लाँच करण्यात आल्या. त्यामध्ये Ola S1, Simple One, Eeve Soul, Bounce Infinity E1 (बाउन्स इन्फिनिटी ई1), KOMAKI TN 95 या स्कूटर्सचा समावेश आहे.

Ola S1 Electric Scooter

ओला इलेक्ट्रिक एस 1 स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ई-स्कूटर सुमारे 120 किलोमीटरच्या रेंजसह येते. एस 1 प्रो, त्यांची टॉप-स्पेक ई-स्कूटर आहे, जी एका चार्जवर सुमारे 180 किलोमीटर रेंजसह येते असा दावा कंपनीने केला आहे.

एस 1 मॉडेलसाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आउटपुट 2.98 kWh असेल, तर थोडी महाग असलेल्या एस 1 प्रो मॉडेलमध्ये 3.97 kWh बॅटरी देण्यात आली आहे. S1 Pro ची टॉप स्पीड 115 kmph इतकी आहे, ज्यामध्ये हायपर समाविष्ट आहे. S1 आणि S1 Pro दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल LED लायटिंग पॅकेज आणि नेव्हिगेशनसह 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात. हा डिस्प्ले 3GB रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि 4G कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे.

Simple One

इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप सिंपल एनर्जीने (Simple Energy) ऑगस्ट महिन्यात देशातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (Simple One Electric Scooter) 1.10 लाख रुपये या किंमतीमध्ये (एक्स-शोरूम) लाँच केली आहे. सिंपल एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटर (Simple One Electric Scooter) 4.8 kWh पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरीसह सुसज्ज आहे, या बॅटरीचं वजन 6 किलोपेक्षा जास्त आहे. या स्कूटरच्या डिटॅचेबल आणि पोर्टेबल नेचरमुळे ई-स्कूटरची बॅटरी घरी चार्ज करणे सोपे होईल. साध्या लूप चार्जरने जरी ही स्कूटर चार्ज केली तरी 60 सेकंदांच्या चार्जिंगवर ही स्कूटर 2.5 किमीपर्यंत धावेल. EV कंपनी पुढील तीन ते सात महिन्यांत देशभरात 300 हून अधिक फास्ट चार्जरदेखील स्थापित करेल.

ई-स्कूटर सिंगल चार्जमध्ये इको मोडमध्ये 203 किलोमीटर आणि आयडीसी स्थितीत 236 किलोमीटरची रेंज प्रदान करेल. या स्कूटरचं टॉप स्पीड 105 किमी प्रति तास इतकं आहे. ही स्कूटर 3.6 सेकंदात 0 ते 50 किमी प्रति तास, 0 ते 40 किमी प्रति तास वेग 2.95 सेकंदात धारण करु शकते. स्कूटरला 4.5 KW चे पॉवर आउटपुट आणि 72 Nm चे टॉर्क मिळते. इलेक्ट्रिक स्कूटर फ्यूचरिस्टिक डिझाईनला सपोर्ट करेल आणि मिड-ड्राइव्ह मोटरवर आधारित असेल. यात 30 लीटर बूट स्पेस देण्यात आली आहे, 12-इंचांची चाके, 7-इंचांचा डिजिटल डॅशबोर्ड, ऑन-बोर्ड नेव्हिगेशन, जिओ-फेन्सिंग, एसओएस मेसेज, डॉक्यूमेंट स्टोरेज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असेल.

EeVe Soul Electric Scooter

EeVe India ने दोन दिवसांपूर्वी सोल (Soul) नावाची आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. नवीन सोल ई-स्कूटरची किंमत 1.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे आणि कंपनीचा दावा आहे की, ही किंमत ‘युरोपियन तंत्रज्ञान’ स्टँडर्ड्सवर आधारित आहे. EeVe India ही भारतातील उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर/टू व्हीलर कंपनी आहे जी कोलकाता आणि मुंबई येथे आहे. तसेच, ही कंपनी उत्सर्जन मुक्त (एमिशन फ्री) इलेक्ट्रिक स्कूटर आणि दुचाकींचे उत्पादन करते.

ईव्ही सोलमध्ये (Eeve Soul) IoT इनेबल्ड, अँटी-थेफ्ट लॉक सिस्टम, GPS नेव्हिगेशन, यूएसबी पोर्ट, कीलेस एक्सपीरियन्स, रिव्हर्स मोड, सेंट्रल ब्रेकिंग सिस्टम, जिओटॅगिंग आणि जिओ-फेन्सिंग यांसारखे स्मार्ट फिचर्स देण्यात आले आहेत. ही स्कूटर तीन वर्षांच्या वॉरंटीसह देशात लॉन्च करण्यात आली आहे. स्कूटर इलेक्ट्रिक मोटरसह येते जी अॅडव्हान्स्ड लिथियम फेरस फॉस्फेट (LFP) स्वॅपेबल/डिटेचेबल बॅटरीद्वारे चालविली जाते. ही स्कूटर 0-100% पर्यंत चार्ज होण्यासाठी जवळपास 3-4 तास लागतात असे म्हटले आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 60 किमी प्रतितास इतका आहे आणि ही स्कूटर एकदा संपूर्ण चार्ज केल्यानंतर 120 किमीपर्यंतची रेंज देते.

Bounce Infinity E1

या महिन्याच्या सुरुवातीली भारतीय टू व्हीलर सेगमेंटमध्ये एका स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरने एंट्री घेतली आहे. या स्कूटरचे नाव बाउन्स इन्फिनिटी ई-1 (Bounce Infinity E1) असे आहे. या स्कूटरच्या प्रमुख फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बाउन्स इन्फिनिटी E1 2kWh लिथियम-आयन बॅटरीसह सुसज्ज आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 85 किमीपर्यंतची रेंज देते. ही स्कूटर 68,999 रुपये इतक्या किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे, जी बॅटरी आणि चार्जरसह येते. पण तुम्ही ही स्कूटर बॅटरीशिवायदेखील खरेदी करु शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ 36 हजार रुपये मोजावे लागतील.

Bounce Infinity E1 इलेक्ट्रिक स्कूटर पाच कलर व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या स्कूटरची डिलिव्हरी मार्चमध्ये सुरू होईल. बाउन्सने इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटरसह बॅटरी लाँच केली आहे. यासोबतच ग्राहकांना बॅटरीशिवाय स्कूटर खरेदी करण्याचा पर्यायही उपलब्ध होणार आहे. यामुळे कंपनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत खूपच कमी ठेवू शकली आहे. Bounce Infinity E1 मध्ये 2kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. जी सिंगल चार्जवर 85 किमीची रेंज देऊ शकते. म्हणजेच या स्कूटरची बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ती 85 किमीपर्यंत चालवता येते. तसेच या स्कूटरचा टॉप स्पीड 65KM इतका आहे.

KOMAKI TN 95 आणि Komaki SE

Komaki ने त्यांची बॅटरी ऑपरेटेड दुचाकी TN95, SE आणि M5 लॉन्च केल्या आहेत. TN95 आणि SE या 98,000 रुपये आणि 96,000 किंमतीच्या इलेक्ट्रिक स्कूटर आहेत, तर M5 मॉडेल 99,000 रुपये इतक्या किंमतीत उपलब्ध आहे. TN95 इलेक्ट्रिक स्कूटर डिटॅचेबल लिथियम-आयन बॅटरीसह येते जी युजर्सना सिंगल चार्जवर 100 किमी ते 150 किमीची रेंज देऊ शकते.

तर Komaki SE मध्ये तुम्हाला 3 kW BLDC इलेक्ट्रिक मोटर मिळेल. जी डिटॅचेबल लिथियम आयन बॅटरी पॅकसह येते. Komaki SE या स्कूटरचं टॉप स्पीड 85 किमी प्रति तास इतकं आहे, तर ही स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यानंतर 95-125 किमीपर्यंतची रेंज देते. Komaki SE मध्ये फ्रंट Glove बॉक्स मिळेल जो यूएसबी चार्जिंग पोर्टसह मिळतो. यामध्ये तुम्हाला दोन रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. तसेच तुम्हाला ऑनबोर्ड सेल्फ डायग्नॉसिस सिस्टिमही दिली आहे. या स्कूटरमध्ये तुम्हाला सर्विस रिमायंडरदेखील देण्यात आला आहे.

या स्कूटरमध्ये तुम्हाला LED डिस्प्ले, मल्टीमीडिया कंट्रोल स्विच आणि इनबिल्ट ब्लुटूथ स्पीकर्स देण्यात आले आहेत. स्कूटर रिमोट लॉकिंग आणि अँटी थेफ्ट सिस्टिमसह सादर करण्यात आली आहे. सस्पेंशन ड्युटीबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला टेलिस्कोपिक फोर्क्स अपफ्रंट आणि रियरमध्ये ट्विन शॉक्स देण्यात आले आहेत. ब्रेकिंगसाठी दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. कोमाकीने म्हटलं आहे की, SE फुल चार्ज होण्यासाठी केवळ 1.5 यूनिट्स विजेचा वापर करते.

इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होऊ लागल्या आहेत. कुठेतरी याचे श्रेय दिल्ली सरकारच्या ईव्ही धोरणाचा एक भाग म्हणून दिल्या जाणाऱ्या अनुदानाला द्यावे लागेल. ईव्ही निर्माता कंपनीचे म्हणणे आहे की, सर्व टेस्ट व्हीकल आणि आफ्टर-सेल्स सर्व्हिस केवळ डीलरशिपवर उपलब्ध असेल. इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत, येणार्‍या काळात ग्राहकांना अधिक मॉडेल्स पाहायला मिळतील.

इतर बातम्या

Suzuki ते Hero, भारतात 2022 मध्ये 4 नव्या इलेक्ट्रिक स्कूटर दाखल होणार

अमिताभ बच्चन आणि युवराज सिंहनंतर MG Motor कडून NFT ची घोषणा, ठरली पहिलीच कारउत्पादक कंपनी

सिंगल चार्जमध्ये 120KM रेंज, EeVe Soul हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत…

(Ola S1, simple one to Komaki TN95 Top electric scooters launched in 2021 know price and features)

'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली.
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान.
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम.
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ.
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना.
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी.
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?.
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.