होंडा कंपनीच्या दुचाकीची प्रतिक्षा अखेर संपली. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उतरवण्यात आल्या आहेत. कंपनीने होंडा ॲक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. Activa E आणि QC1 या दोन इलेक्ट्रिक स्कूटरची मोठी चर्चा सुरू आहे. दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारात जोरदार चर्चा आहे. या दोन्ही ई-स्कूटर बाजारातील गुणवत्तेच्या कसोटीवर उतरण्यासाठी कंपनीने मेहनत केल्याचा दावा करण्यात येत आहे. Honda Activa E ला स्वॅपेबल बॅटरी सेटअप देण्यात आला आहे. तर QC1 मध्ये बॅटरी निघणार नाही.
येत्या फेब्रुवारीत ई-स्कूटरची विक्री
होंडा ॲक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटर फेब्रुवारी 2025 पासून देशातील तीन प्रमुख शहरांपैकी बेंगळुरू, दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्कूटरची बुकिंग ही जानेवारी 2025 मध्ये सुरू होईल. होंडा बंगळुरू, दिल्ली आणि मुंबईतील होंडा मोबाईल पॉवर पॅकसाठी ई-स्वॅपची सुविधा देईल.
Honda Activa E स्कूटरचे काय आहेत फीचर्स
होंडा ॲक्टिवा इलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाईन पूर्वीच्या स्कूटरसारखेच आकर्षक आहे. ही स्कूटर भारतीय ग्राहकांमध्ये जास्त लोकप्रिय आहे. मागील बाजूस एलईडी कमिनेशन लाईट आणि इंडिकेटर नवीन खास डिझाईनमध्ये आहे. ग्राहकांना दोन होंडा मोबाईल पॉवर पॅक देण्यात येते. मुख्य व्हील साईड मोटर 4.2 किलोवॅटच्या रेटेड आउटपुट आणि 6.0 किलोवॅटची जास्तीत जास्त आऊटपूट देते.
QC1 स्कूटरचे काय फीचर्स
होंडा QC1 ही एक मोपेड आहे. पुढील वर्षासाठी ती खास लाँच करण्यात आली आहे. ही रोजच्या कामासाठी उपयोगात येईल. या मोपेडमध्ये एक फिक्स बॅटरी देण्यात आली आहे.. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ग्राहकांना एक 1.5 kWh फिक्स बॅटरी सेटअप देण्यात आला आहे. चार्जरचा वापर करून ग्राहक घरीच ही मोपेड चार्ज करू शकतात.
या स्कूटरमध्ये रिअर व्हील, कॉम्पॅक्ट इन-व्हील मोटर ऑफर देण्यात आली आहे. या मोपेडचा रेटेड आउटपुट 1.2 किलोवॅट आणि मॅक्सिमम आऊटपूट 1.8 किलोवॅट इतका आहे. यामध्ये हाय फ्रीक्वेन्सी एलईडी आणि 5 इंचाची एलसीडी इंस्ट्रूमेंट पॅनल देण्यात आला आहे.