Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमालच झाली, Ola – Uber चे भाडे आयफोन आणि एंड्रॉईड फोन युजरसाठी वेग-वेगळे, केंद्राने पाठविली नोटिस

तुम्ही जर नेहमीचे ओला आणि उबेरचे ग्राहक आहात तर या गाड्या एण्ड्रॉईड फोनधारकापेक्षा आयफोनधारकांकडून जादा भाडे आकारतात असा आरोप होत आहे. या संदर्भात केंद्र सरकारने ओला आणि उबर या खाजगी कंपन्याला नोटीस धाडली आहे.

कमालच झाली, Ola - Uber चे भाडे आयफोन आणि एंड्रॉईड फोन युजरसाठी वेग-वेगळे, केंद्राने पाठविली नोटिस
Follow us
| Updated on: Jan 23, 2025 | 6:56 PM

ओला आणि उबर या मोबाईलवरुन धावणाऱ्या टॅक्सीचे भाडे आयफोन आणि एण्ड्रॉईड फोनसाठी वेगवेगळे असल्याची बाब उघडकीस आली आहे. या संदर्भात ग्राहक मंत्रालयाच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाद्वारे ( सीसीपीए )  गुरुवारी कॅब एग्रीगेटर्स ओला आणि उबर यांना नोटीस पाठविली आहे. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या संदर्भात आयफोन आणि एण्ड्रॉईडधारकांसाठी वेगवेगळे भाडे आकारण्याच्या मुद्द्यावर आपली भूमिका सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यानी सोशल मिडिया एक्सवर लिहीले आहे की विविध मोबाईल मॉडेलवर ( आयफोन/एण्ड्रॉईड ) वेगवेगळे भाडे आकारण्याच्या प्रवाशांच्या तक्रारीनंतर ग्राहक प्रकरणांचा विभाग सीसीपीएच्या द्वारे प्रमुख कॅब एग्रीगेटर्स ओला आणि उबर यांना कारणे दाखवा नोटीस धाडली आहे आणि त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे.

हे पाऊल प्रल्हाद जोशी यांनी गेल्या महिन्यात दिलेल्या सूचनेनंतर दिला आहे. ज्यात त्यांनी म्हटले की ग्राहक शोषणाबाबत झिरो टॉलरन्स धोरण आखले जात आहे. त्यानी सीसीपीएने या आरोपांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. केंद्रीय मंत्री या प्रथेला पहिल्या नजरेच अनुचित व्यापार असे म्हटले आहे. तसेत ग्राहकांप्रती असलेल्या पारदर्शिकतेची घोर अवहेलना असे म्हटले आहे.

गेल्या महिन्यात एक आश्चर्यचकीत करणारी थिअरी इंटरनेटवर खूप व्हायरल झाली होती. राईड -हेलिंग एप एकाच राईडसाठी आयफोन युजरकडून एण्ड्राईड युजरच्या तुलनेत जास्त पैसे उकळत आहेत? सोशल मीडियावर या संदर्भात खूपच गहन चर्चा आणि युजरच्या अनेक प्रतिक्रीया आल्या. मिडिया रिपोर्टनुसार या संदर्भात झालेल्या परिक्षणानंतर या दाव्या मागे केवळ षडयंत्राचा भाग किंवा सिद्धांत नसणार असे स्पष्ट झाले आहे.

चेन्नई सारख्या मार्गावर कॅबच्या भाड्याची चाचपणी आयफोन आणि एण्ड्रॉईड  एपवर एकसाथ करण्यात आली. ज्यात iOS यूजर्सकरीता लागोपाठ जादा भाडे दाखविले गेले. परंतू हा असमानता किंवा पक्षपाताचा निर्णायक पुरावा नाही असेही म्हटले जात आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात ?

चेन्नईस्थित राईड- हेलिंग प्लॅटफॉर्म फास्टट्रॅकचे प्रमुख संचालक सी अंबीगपती यांनी दावा केला की युजरच्या हार्डवेअरच्या आधारे तांत्रिकदृष्ट्या भाड्यात फेरबदल करणे शक्य आहे. हॉर्डवेअर डिटेल्सच्या आधारे भाड्यात फेरबदल करणे आणि डायनामिक प्रायझिंगच्या एल्गोरिदमच्या सत्यते मागे दडणे कंपन्यांसाठी हातचा मळ आहे असे चेन्नईस्थित राईड – हेलिंग प्लॅटफॉर्म फास्टट्रॅकचे प्रमुख संचालक सी अंबिगपती यांना म्हटले आहे.

भेदभावाचा सामना

कंपन्या आपल्या कारभाराचा अंदाज काढण्यासाठी जुन्या युजरचा डाटाचा देखील लाभ उचलते.  कंपन्यानी एकदा का नियमित युजरची ओळख पटवली  की हा युजर भाडे बुक करणारच या आत्मविश्वासाने त्या आपल्या नेहमीच्या ग्राहकाला भाडे वाढवून सांगतात असे अंबिगपतीय यांनी म्हटले आहे. तज्ज्ञ जादा पारदर्शकतेची मागणी करीत म्हणतात की जर अंदाजे लागणारा वेळ, अंतर आणि कारचा प्रकार या सारखे घटक सुसंगत आहे तर युजरला त्यांच्या डिव्हाईस आधारे भेदभावाचा सामना करावा लागणार नाही.

राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना.
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप.
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप.
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण.
'ते चु*** आहेत चु***', राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका
'ते चु*** आहेत चु***', राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका.
कोणी कितीही मागून-पुढून खाजवू द्या, आम्ही भूतकाळात पडणार नाही; राऊतांन
कोणी कितीही मागून-पुढून खाजवू द्या, आम्ही भूतकाळात पडणार नाही; राऊतांन.
केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले
केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले.
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल.
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न.