OLA ची ई-बाईक झाली लाँच, घरी आणा विजेवर धावणारी दुचाकी, किंमत आहे इतकी कमी

OLA E-Bike : ओला ई स्कूटर तर बाजारात येऊन लोकप्रिय झाली आहे. आता या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपनीने ई-बाईक लाँच केली आहे. ही ई-बाईक रोडस्टर, रोडस्टर एक्स आणि रोडस्टर प्रो अशा तीन मॉडेलमध्ये बाजारात दाखल होत आहे.

OLA ची ई-बाईक झाली लाँच, घरी आणा विजेवर धावणारी दुचाकी, किंमत आहे इतकी कमी
ओला ई बाईक रोडस्टर
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 4:49 PM

ओला इलेक्ट्रिकने गुरुवारी, 15 ऑगस्ट रोजी ई-मोटारसायकल लाँच केली आहे. या कंपनीची दुचाकी ‘रोडस्टर’ सीरीजला 74,999 रुपयांच्या सुरूवातीच्या किंमतीवर लाँच केली आहे. ही ई-बाईक तीन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. बाईक रोडस्टर, रोडस्टर एक्स आणि रोडस्टर प्रो. हे तीन व्हेरिएंट बाजारात येत आहेत. या प्रत्येक मॉडेलचे सब-मॉडेल पण येतील. कंपनीने ‘संकल्प 2024’ कार्यक्रमामध्ये सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे रोडस्टर प्रो ची डिलिव्हरी पुढील वर्षी दिवाळीपासून सुरु होईल. तर रोडस्टर एक्स आणि रोडस्टर जानेवारी 2025 पासून उपलब्ध होतील.

काय आहेत किंमत

रोडस्टर प्रो च्या 3.5kWh व्हेरिएंटची किंमत 1.04 लाख रुपये, 4.5kWh मॉडेलची किंमत 1.19 लाख रुपये आणि 6kWh व्हेरिएंटची किंमत 1.39 लाख रुपये आहे. रोडस्टर एक्स सीरीज त्यामानाने स्वस्त आहेत. या मॉडेलची 2.5kWh मॉडेलची किंमत 74,000 रुपये, 3.5kWh ची किंमत 85,000 रुपये आणि 4.5kWh ची किंमत 99,000 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

तीन वर्षानंतर स्वप्न सत्यात

ओला कंपनीचे एमडी आणि चेअरमन भाविश अग्रवाल या ई-बाईक लाँच कार्यक्रमात भावुक झाले. आज ओला समूह तीन कंपन्या आणि तीन विविध सेगमेंटमध्ये अग्रेसर असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण भारतासाठी किफायतशीर, सुलभरित्या आणि गुणवत्तापूर्ण इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणे हा आहे. तीन वर्षांपूर्वी ओला इलेक्ट्रिक हे एक स्वप्न होते. आज आम्ही देशातील अग्रगण्य ईव्ही कंपनी आणि जगातील सर्वात मोठी दुचाकी ईव्ही निर्माता कंपनी झालो आहोत. जगभरातील सर्व ईव्ही कंपन्यांमध्ये आता आम्ही व्यावसायिक आणि बाजारातील भांडवलाप्रमाणे पाचव्या क्रमांकावर आहोत. तर महसूलीदृष्ट्या ओला आता जगातील चौथ्या क्रमांकाची ईव्ही कंपनी आहे, तर ग्राहकांच्या आकड्याआधारे पण आम्ही अग्रेसर असल्याचे अग्रवाल यांचे म्हणणे आहे.

बॅटरी तंत्रज्ञानात पण अग्रेसर

भाविश अग्रवाल यांनी भविष्यातील तरतुदीविषयी माहिती दिली. त्यानुसार, 4680 विक्रीसह नेक्स्ट जनरेशन बॅटरी टेक्नोलॉजी विकसीत करत असल्याचे अग्रवाल म्हणाले. त्याला कंपनीने भारत सेल असे नाव दिले. त्यासाठी कंपनीने पेटंट पण दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.