मुंबई : दररोज वाढत्या महागाईनं (Fuel Inflation) सगळ्यांचं जगणं मुश्किल केलंय. अशातच वाढत्या इंधनाच्या दरांत वेगवेगळ्या पर्यायी इंधनांचा वापर करण्याचं आवाहन सरकारकडून केलं जातं आहे. अशातच इलेक्ट्रीक वाहनांना (Electric vehicles) प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न होतोय. अवजड वाहनांमध्येही आता इलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय उभा राहिला आहे. बॅटरीवर चालणाऱ्या इ-ट्रकमुळे (E-truck) वाढत्या इंधनाच्या दरांतून दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. त्यामुळे परवडणाऱ्या दरात वाहतूक करणं सोपं होईल. तसंच मालाची किंमतही आवाक्यात राहिल, असंही तज्ज्ञांनी म्हटलंय. दरम्यान, दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या खर्चामुळे आता लोकही इलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय स्वीकारु लागलेली आहेत. यातच अवजड मालवाहतुकीसाठीही इ-ट्रकसारखा पर्यायही आता वाहनचालकांसमोर उपलब्ध झाला आहे.
भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रीक बस पुरवणाऱ्या ओलेक्ट्रानं या इ-ट्रकची निर्मिती केली आहे. या ट्रकच्या चाचण्याही सुरु केल्या आहेत. लवकरच भारतीय रस्त्यावर हा ट्रक धावताना दिसेल.
युक्रेन आणि रशियाच्या युध्दामूळे होरपळलेल्या अनेक देशात भारत देखील सामील आहे. वाढत्या इंधनाच्या दरांची सगळ्यांना हैराण केलेलंय. दररोज वाढणाऱ्या डिझेलच्या किमंतीमूळे वाहतूक व्यवस्थेचा खर्च वाढतोय. हा खर्च अखेर ग्राहकांच्या माथीच येत आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे भाज्या, फळं नेहमीच्या जगण्यातील दैनंदिन गोष्टीही महागल्या आहेत.
या सगळ्यात नव्या टेक्नॉलॉजीने जग बदलतय. नव्या तंत्रज्ञानाचा फायदा सुद्धा होतोय. हैद्राबादच्या भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रिक बस पुरवणाऱ्या ओलेक्ट्राने इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या म्हणजेच इट्रकच्या धर्तीवर आता रोडटेस्ट सुरु केल्या आहेत. लवकरच हा ट्रक भारतीय रस्त्यावर धावताना दिसणार आहे.
इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये माफीर असलेल्या ओलेक्ट्राने आता ट्रक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रवेश केलाय. बिल्ट-ऑन हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक टिप्परची रेंज ही एका चार्जवर 220 किलोमीटर इतकी जबरदस्त आहे. हैदराबादच्या उत्पादन प्रकल्पात यांची बाधणी होणार आहे. दरम्यान, याबाबत बोलताना कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्तापकीय संचालक के.व्ही. प्रदीप यांनी म्हटलंय की,
हा भारतातील अशा प्रकारचा पहिला ट्रक आहे. आमच्यासाठी खूप आनंद आणि अभिमानाचा क्षण आहे. या टिपरमध्ये अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत. वचन दिल्याप्रमाणे, आम्ही स्वप्न साकार केलंय.
नवीन इंजिन, 6-स्पीड AT सह Maruti Suzuki Ertiga 2022 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
प्रतीक्षा संपली…ग्लोबल एनसीएपी सेफ्टी कार्सची यादी प्रसिध्द… भारतातील ‘या’ 10 कार सर्वाधिक सुरक्षित
का होत आहेत चारचाकी वाहने महाग? चारचाकी घ्यायचे आहे? त्याआधी हे वाचा