वनप्लस (OnePlus) लवकरच भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीने नुकतेच नॉर्ड 2 टी (Nord 2T) बाजारात आणले आहे. कंपनी आणखी एक टी-सीरीज फोन आणत असल्याचे विश्वसनीय माहिती आहे. हा नवीन स्मार्टफोन वनप्लस 10 टी (OnePlus 10T) असण्याची शक्यता असून त्याच्या लाँच तारखेबद्दल सध्या कोणतीही अधिकृत माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. लिक झालेल्या माहितीनुसार या नवीन स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात येउ शकतो. हा स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज दिला जाऊ शकतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्याची मेन लेंस 50MP असेल. टिपस्टर पारस गुगलानी यांनी याबाबतची अधिक माहिती शेअर केली आहे. हा स्मार्टफोन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी येईल, अशी अपेक्षा आहे.
हा स्मार्टफोन भारतात अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. एका माहितीनुसार स्मार्टफोन जेड ग्रीन आणि मूनस्टोन ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध होऊ शकतो. हँडसेटचे लीक झालेले रेंडर पंच होल कटआउटसह डिसप्ले दिसून येत आहे.
फोन अलर्ट स्लाइडरशिवाय लाँच होऊ शकतो. हा स्मार्टफोन भारतात 25 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
OnePlus 10T स्मार्टफोन OxygenOS 12 सह लाँच केला जाऊ शकतो. यात 6.7 इंचाचा फुल HD + AMOLED डिसप्ले मिळून तो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. हँडसेटमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्याची प्राथमिक लेंस 50MP ची असू शकते. याशिवाय 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेंस आणि 2MP मॅक्रो लेंस मिळू शकतात. फ्रंटमध्ये कंपनी 16MP सेल्फी कॅमेरा देऊ शकते. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी 4800mAh बॅटरी दिली जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, स्मार्टफोन 150W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. सेफ्टीसाठी कंपनी यात फिंगरप्रिंट सेंसर देईल. हँडसेटची रचना OnePlus 10 Pro सारखीच असेल.