बाईकमध्ये पेट्रोल इंजिनऐवजी बॅटरी बसवण्याला प्राधान्य, खर्च किती?

पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत आणि हा खर्च टाळण्यासाठी लोकांनी एक भन्नाट जुगाड केला आहे. (People converting petrol Engine bike into electric)

बाईकमध्ये पेट्रोल इंजिनऐवजी बॅटरी बसवण्याला प्राधान्य, खर्च किती?
electric bike
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 11:51 AM

मुंबई : भारतात कोणालाही कोणत्याही गोष्टीचा जुगाड मिळू शकतो. इथले लोक त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळे जुगाड करत असतात. सध्या देशभरातील नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे चिंतेत आहेत. पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत आणि हा खर्च टाळण्यासाठी लोकांनी एक वेगळाच जुगाड केला आहे. पेट्रोलच्या झंझटपासून मुक्तता मिळवण्यासाठी अनेक जण त्यांच्या बाईकमधील पेट्रोल इंजिन इलेक्ट्रिक इंजिनमध्ये कनव्हर्ट (Convert) करत आहेत. त्यामुळे त्यांची बाईक आता पेट्रोलऐवजी बॅटरीवर धावतेय. (People are converting petrol Engine bike into electric Engine Check here all details about this engine)

आता बरेच लोक त्यांच्या बाईकमधील पेट्रोल इंजिन काढून त्याजागी बॅटरी बसवून घेत आहेत. म्हणजेच आता गाडीत पेट्रोल टाकण्याऐवजी बाईकमधील बॅटरी चार्ज करावी लागणार आहे. याचाच अर्थ तुमची गाडी आता विजेवर चालू शकते. त्यावरील खर्च हा पेट्रोलच्या खर्चापेक्षा खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत बाईकमधील पेट्रोल इंजिन Convert (रुपांतरित) कसे होते? त्याची किंमत किती आहे? असं करणं योग्य आहे का? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. आज आम्ही तुम्हाला या जुगाडची आणि त्यावरील खर्चाबाबतची माहिती देणार आहोत. परंतु एक गोष्ट तुम्हाला माहीत असायला हवी, की गाडीमधील इंजिन Convert करणं गुन्हा आहे. असं केल्यास, तुम्हाला दंडदेखील भारावा लागू शकतो.

किती खर्च होतो?

बरेच लोक सध्या सोशल मीडियावर स्वत: ची जाहिरात करत आहेत, अनेकांनी असा दावा केला आहे की ते त्यांच्या बाईकमधील पेट्रोल इंजिन इलेक्ट्रिक इंजिनमध्ये रूपांतरित करीत आहेत. यावर केवळ 10 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही ते सांगतात. असेही म्हटले जात आहे की बॅटरीनुसार शुल्कही बदलते. दरम्यान, इंजिन Convert करणाऱ्या एका मेकॅनिकने या बाईकच्या वेगाविषयी दावा केला आहे, इंजिन Convert केलेली बाईक ताशी 65-70 किमी इतक्या वेगाने धावते.

इंजिन कसे Convert केले जाते?

असे सांगितले जात आहे की पेट्रोल इंजिनला इलेक्ट्रिकमध्ये रुपांतरित (Convert) करताना, गीअर बॉक्स काढून टाकला जातो आणि त्यानंतर बाईक थेट अॅक्सिलरेटरद्वारे (Accelerator) नियंत्रित केली जाते. म्हणजेच जशी तुम्ही स्कूटी चावता अगदी तशीच बाईक चालवता येते. परंतु अशा प्रकारे स्कूटीचे इंजिन बदलले जाऊ शकत नाही, त्यासाठी बरेच बदल करावे लागतील. त्यामुळे त्यावर खूप खर्च करावा लागतो.

किती फायदा होणार?

आता असा दावा केला जात आहे की ही बॅटरी तुम्ही 2 तास चार्ज केली तर ही बाईक 40 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. बॅटरी पूर्ण चार्ज केली तर बाईक तब्बल 300 किमीपर्यंतची रेंज देते. परंतु या बाबी तुम्ही कोणती बॅटरी वापरताय, यावर अवलंबून आहेत.

बेकायदेशीर प्रकार

तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या बाईकमधील इंजिन बदलत असाल तर हा कायद्याने गुन्हा आहे. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 52 नुसार कोणत्याही मोटार वाहनात बदल करणे, इंजिन बदलणे हा कायदेशीर गुन्हा आहे. या नियमाप्रमाणे कोणतीही व्यक्ती कंपनीने बनवलेल्या कार किंवा बाईकमध्ये बदल करू शकत नाही. जर तसे केले तर हा गुन्हा ठरतो आणि तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तसेच इंजिन बदलल्यामुळे तुमचा विमा देखील समाप्त होऊ शकतो.

संबंधित बातम्या

खुशखबर! आता पेट्रोल-डिझेलसह LPG सिलेंडर स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं ‘कारण’

Petrol Diesel Rate Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी काय आहे पेट्रोलचा भाव? वाचा तुमच्या शहरातले दर

(People are converting petrol Engine bike into electric Engine Check here all details about this engine)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.