मुंबई : भारतात पेट्रोल पंपावर फसवणूक होणे सामान्य आहे. पेट्रोल पंपावर फसवणुकीचे (Petrol Pump Fraud) प्रकारही समोर आले आहेत. इंधन भरताना ग्राहकांना पूर्ण इंधन दिलं जात नाही आणि त्यांच्यासोबत फसवणूक केली जाते. अशात लोकांना मोठा फटका बसतो आहे ग्राहकालाही कळत नाही आणि अनेकवेळा पेट्रोल भरून घेताना ग्राहकाची फसवणूक होते, हे काम तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच केले जाते. मात्र काही गोष्टींची काळजी घेतल्यास हे टाळता येऊ शकते.
ही सर्वात सामान्य युक्ती आहे, जी पेट्रोल पंपावर अवलंबली जाते. म्हणूनच पेट्रोल डिझेल घेताना मीटरवर लक्ष ठेवा, ते शून्य झाले आहे की नाही. अनेकवेळा ग्राहक मीटरवर लक्ष ठेवत नाही तेव्हा ते शून्य न करता इंधन ओतले जाते. त्यामुळे ग्राहकांचे नुकसान होत आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला 200-300 पेट्रोल घ्यायचे असेल आणि तुमच्या आधी कोणीतरी 100 पेट्रोल घेतले असेल तर या युक्तीने तुमची 100 रुपयांची पेट्रोल फसवणूक होऊ शकते.
अनेक वेळा पेट्रोल पंपावर तुमची फसवणूक करण्यासाठी तुमचे लक्ष विचलीत होणे कारणीभूत ठरू शकते. जसे की एखाद्या ऑफरबद्दल माहिती देणे, काच साफ करणे, हवा भरणे, परंतु तुम्ही तुमचे लक्ष फक्त मीटरवर ठेवावे.
जर तुम्हाला कधी शंका आली की तुम्हाला पूर्ण पेट्रोल मिळत नाही, तर तुम्ही पेट्रोल पंपावर बोलून त्याचे प्रमाण तपासू शकता. यासाठी सर्व पेट्रोल पंपांवर एक लिटर उपलब्ध असून तुमच्या समोरील पेट्रोल पंपावर उपस्थित कर्मचारी पेट्रोल बाहेर काढून तपासेल.
असे अनेक पंप आहेत जे प्रामाणिकपणे व्यावसाय करतात, अनेक पंप चांगल्या आणि योग्य प्रमाणात इंधन पुरवण्यासाठी ओळखले जातात. तुम्हाला माहीत नसेल तर जवळचा कोणता पेट्रोल पंप चांगला आहे ते शोधा आणि त्यातून इंधन भरा.