नवीन कार घेण्याचा विचार करताय? ‘या’ गोष्टी लक्षात घ्या अन्यथा होऊ शकते नुकसान…

कार खरेदी दरम्यान सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारची वैशिष्ट्ये, मायलेज, इंजिन आणि सर्व्हिसिंग सुविधा या गोष्टी तपासणे आवश्यक आहे.

नवीन कार घेण्याचा विचार करताय? ‘या’ गोष्टी लक्षात घ्या अन्यथा होऊ शकते नुकसान...
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 6:43 PM

मुंबई : वर्ष संपायला आता फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत ऑटोमोबाईल कंपन्या ईयर एंड ऑफर अंतर्गत वाहनांवर भारी सूट देत आहेत. त्याच वेळी, बहुतांश कार कंपन्यांनी नवीन वर्षात किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. अशा वेळी ग्राहक देखील घाईघाईत कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत (Planning For buying new car follow this tips for smart buy).

कार खरेदी दरम्यान सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारची वैशिष्ट्ये, मायलेज, इंजिन आणि सर्व्हिसिंग सुविधा या गोष्टी तपासणे आवश्यक आहे. याशिवाय सवलत, किंमत, आपले बजेट आणि कारबरोबर मिळणाऱ्या वस्तू यासारख्या गोष्टींकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. दरम्यान, जर आपणही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि आपल्याकडे जास्त माहिती नसेल, तर आपण आज अशी माहिती जाणून घेणार आहोत, जी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. प्रत्येकाला कार खरेदी करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे…

किंमत

वेगवेगळ्या शो रूममधील कारची किंमतही वेगळी असते. अशा परिस्थितीत आपण वेगवेगळ्या शो रूममध्ये जाऊन आपल्या पसंतीच्या कारची किंमत तपासणे फायदेशीर ठरेल. अशा प्रकारे आपण बर्‍याच पैशांची बचत करू शकता. याशिवाय कारच्या ऑनलाईन दर्शवलेल्या किंमती आणि वास्तविक किंमतीत बराच फरक असतो. मोटारींच्या किंमती बर्‍याच वेबसाईटवर विना टॅक्स नमूदकेलेल्या असतात.

सवलत

वर्षाच्या अखेरीस वाहन कंपन्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात सवलत देत आहेत. मोठ्या कंपन्यांची नावेही या यादीमध्ये समाविष्ट आहेत. अशा वेळी कार खरेदी करताना डीलरकडून सूट मिळाल्यानंतरही संपूर्ण माहिती मिळवणे शहाणपणाचे ठरेल (Planning For buying new car follow this tips for smart buy).

अ‍ॅक्सेसरीज

कार खरेदी केल्यावर ऑटो कंपनीकडून बऱ्याच अ‍ॅक्सेसरीज दिल्या जातात. तर, काही डिलर्स अ‍ॅक्सेसरीजसाठी जास्त पैसे घेतात. अशा परिस्थितीत कार खरेदी करण्यापूर्वी विक्रेत्यांकडून संपूर्ण माहिती मिळवणेअधिक फायद्याचे ठरते. असे केल्याने आपण अनावश्यक खर्च टाळू शकता.

कारची जागा

कार खरेदी दरम्यान, आपले कुटुंब किती मोठे आहे हे देखील लक्षात घेतले पाहिजे. उदाहरणार्थ, एका लहान कुटुंबासाठी मोठी कार आणि मोठ्या कुटुंबासाठी एक छोटी कार निरुपयोगी ठरू शकते. अशा वेळी आपल्याला कोणत्या प्रकारची आणि किती सीटर कारची आवश्यकता आहे, हे आधीपासूनच ठरवा.

(Planning For buying new car follow this tips for smart buy)

हेही वाचा :

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.