रेल्वेने बाईक पाठवा घरी, येतो इतका खर्च, अशी आहे प्रक्रिया
Indian Railway | जर तुम्हाला बाईक रेल्वेने तुमच्या गावी पाठवायची असेल तर ती पाठवता येते. त्यासाठी दुचाकी नोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्स, फोटोकॉफी आवश्यक आहे. रेल्वेच्या पार्सल ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मागण्यात येते. बाईक पाठवण्यासाठी काय प्रक्रिया ती पण समजून घ्या.
नवी दिल्ली | 11 February 2024 : अनेकदा नोकरी वा इतर कामानिमित्त अनेकांना बिऱ्हाड हलवावं लागतं. त्यासाठी अनेक जण ट्रेनचा वापर करतात. दुसऱ्या शहरात प्रवासासाठी बाईकची गरज असते. रेल्वेने पण तुम्हाला बाईक इच्छित शहरात नेता येते. पण अनेक लोकांना याविषयीची माहिती नसते. तुम्ही रेल्वेने तुमची बाईक पण नेऊ शकता. त्यासाठी बाईक रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची गरज असते. रेल्वेच्या पार्सल ऑफिसमध्ये ही सुविधा मिळते. त्यासाठी अशी प्रक्रिया आहे, इतका येतो खर्च?
याकडे द्या लक्ष
जर तुम्हाला ट्रेनमधून बाईक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे दुचाकीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची फोटोकॉपी, झेराक्स आवश्यक आहे. रेल्वेच्या पार्सल कार्यालयात ही फोटोकॉपी जमा करावी लागते. सोबतच आरसी आणि विम्याची फोटोकॉपी पण असावी. पूर्ण कागदपत्रानिशी तुमची बाईक पाठवता येईल.
इंधनाची टाकी करा रिकामी
बाईकची वाहतूक करताना पेट्रोलची टाकी पूर्णपणे रिकामी करा. कार्डबोर्डवर तुमचे गंतव्य स्थान, म्हणजे ज्याठिकाणी तुम्हाला बाईक उतरवायची आहे, त्या शहराचे नाव स्पष्ट आणि ठळकपणे नमुद कराा. मोटारसायकल पॅक करण्यापूर्वी क्लच, ब्रेक मोकळे करा. त्यामुळे पॅकिंग करताना ते अडचण देणार नाहीत आणि बाईक सुरक्षित राहील. सर्वात महत्वाचे म्हणजे दुचाकीच्या इंधन टाकीतील सर्व पेट्रोल अगोदर काढून घ्या. पेट्रोल टाकी ड्राय करा. पार्सल ऑफिसमध्ये एक अर्ज देण्यात येईल. त्यामध्ये संपूर्ण माहिती, शहराचा पत्ता, दुचाकीची कंपनी, रजिस्ट्रेशन क्रमांक, दुचाकीचे वजन आणि या दुचाकीची किंमत नमूद करा.
ही आवश्यक माहिती भरा
बाईक पॅकिंगसाठी खर्च येतो. साधारणपणे 300 रुपये ते 1000 रुपयांदरम्यान हा खर्च येतो. पॅकिंग केल्यानंतर, अर्ज जमा केल्यानंतर, योग्य माहिती भरल्याची खात्री केल्यानंतर संबंधित बाईक तुमच्या गंतव्य स्थानी पोहचविण्यात येईल. पार्सल फॉर्मध्ये तुम्हाला बाईकचा इंजिन क्रमांक, चेचिस क्रमांक द्यावा लागेल. तुमचे नाव नमूद करावे लागेल. तुम्हाला पावती देण्यात येईल. ती अगदी संभाळून ठेवा. बाईक घेण्यासाठी तिची गरज लागणार आहे.