रेल्वे ट्रॅकवर चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेला Jawa कंपनीकडून 1.75 लाखांची बाईक गिफ्ट
रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. (Mayur Shelke Jawa Motorcylce)
मुंबई : रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके (Mayur Shelke) देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा मयुर शेळकेचं फोन करुन कौतुक केलं. दरम्यान, Jawa Motorcycle कंपनीने मयुर शेळकेचं कौतुक करण्यासाठी त्याला एक मोटारसायकल गिफ्ट केली आहे. (Railways Hero Mayur Shelke Who Saved A 6-Year Old got Jawa Forty Two bike as a Gift)
जावा मोटारसायकलचे संस्थापक अनुपम थरेजा यांनी आश्वासन दिले होते की, आपण मयुर शेळकेचा सन्मान करू. दरम्यान, आता कंपनीने त्यांना न्यू जावा फोर्टी टू (New Jawa 42) मोटारसायकल भेट दिली आहे. दुसरीकडे, त्याचे धाडस पाहता मध्य रेल्वेने त्यांना 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले आहे. मयुरने त्याला मिळणाऱ्या बक्षिसातील अर्धी रक्कम अंध माता संगीता शिरसाट (Sangeeta Shirsat) यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच रेल्वेकडून मिळालेल्या 50 हजारांपैकी 25 हजार रुपये मयुर शिरसाट कुटुंबाला देणार आहे. आधी शौर्य गाजवून मनं जिंकणारा मयुर आपल्या ठायी असलेल्या दातृत्व गुणाचंही दर्शन घडवत आहे.
We were honored to meet Pointsman #MayurShelke at his residence & hand over the Jawa forty two Golden Stripes Nebula Blue as appreciation for his selfless bravery as part of the #JawaHeroes initiative. More power to you Mayur & loads of respect from the Jawa family & #Kommuniti. pic.twitter.com/LalvesyOsL
— Jawa Motorcycles (@jawamotorcycles) April 23, 2021
देवदूताची मुख्यमंत्र्यांकडून दखल
मयुरच्या शौर्याची दखल थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही घेतली आहे. मयुर शेळकेला फोन करुन उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं. “तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. कल्पनेच्या पलिकडचं काम केलंत तुम्ही” अशा शब्दात ठाकरेंनी मयुरला कौतुकाची थाप दिली.
काय झाला संवाद?
उद्धव ठाकरे : जय महाराष्ट्र
मयुर शेळके : जय महाराष्ट्र साहेब
उद्धव ठाकरे : तुमचा थरारक व्हिडीओ पाहिला.. बापरे
मयुर शेळके : धन्यवाद साहेब धन्यवाद
उद्धव ठाकरे : नाही नाही, हे म्हणजे… माझ्याकडे शब्द नाहीत.. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्ही त्या मुलाचा जीव वाचवलात. आईचे खूप आशीर्वाद मिळाले असतील
मयुर शेळके : नक्कीच… धन्यवाद साहेब
उद्धव ठाकरे : नीट काळजी घ्या, तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत… कल्पनेच्या पलिकडचं काम केलंत तुम्ही
मयुर शेळके : तुमच्या कौतुकाने नक्कीच मला कुठेतरी अभिमान वाटतोय. तुम्ही वेळात वेळ काढून माझं कौतुक केलंत
उद्धव ठाकरे : तसंच काम केलंत तुम्ही (Uddhav Thackeray praises Mayur Shelke )
मयुर शेळके : तुम्ही कोव्हिड काळात समाजासाठी जे काम करताय, त्याच्यातूनच आम्हाला प्रेरणा मिळते
उद्धव ठाकरे : नक्कीच आपण सगळे चांगलं काम करु, नीट राहा, जय महाराष्ट्र
मयुर शेळके : जय महाराष्ट्र साहेब
ऐका संवाद :
नेमकं काय घडलं ?
रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
Video : अंध आईच्या हातातला मुलगा चालता चालता रेल्वे ट्रॅकवर पडला आणि तेवढ्यात रेल्वे आली…
एकही दिल है, कितनी बार जितोगे? मयुर शेळके 50 हजारांपैकी निम्मी रक्कम अंध महिलेला देणार