टाटा मोटर्सच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारची होतेय ‘रेकॉर्ड ब्रेक’ विक्री… मागणी वाढल्याने उत्पादनात वाढ

टाटा मोटर्स कंपनीने चैन्नइमधील आपल्या एका इव्हेंट दरम्यान आपल्या ग्राहकांना 101 इलेक्ट्रिक कार्सची डिलिव्हरी दिली आहे. वितरित केलेल्या मॉडेल्समध्ये टाटा नेक्सॉल ईव्ही आणि टाटा टिगोर ईव्ही यांचा समावेश आहे. या दोन्ही कार भारतातील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार ठरल्या आहेत.

टाटा मोटर्सच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारची होतेय ‘रेकॉर्ड ब्रेक’ विक्री... मागणी वाढल्याने उत्पादनात वाढ
TATA MotorsImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 8:58 PM

मुंबईः टाटा मोटर्सने (Tata Motors) शनिवारी ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये पुन्हा आपला ठसा उमटवला आहे. इलेक्ट्रिक कार विक्रीमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. चेन्नईमधील एका कार्यक्रमात कंपनीनं एकाच दिवसात ग्राहकांना 101 इलेक्ट्रिक वाहनांचे विक्रमी वितरण केले आहे. चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान कंपनीने ही कामगिरी नोंदवली आहे. कंपनीने एका इव्हेंट दरम्यान आपल्या ग्राहकांना या इलेक्ट्रिक कार सुपूर्द केल्या आहेत. वितरित केलेल्या मॉडेल्समध्ये टाटा नेक्सॉल ईव्ही (Tata Nexon EV) आणि टाटा टिगोर ईव्ही (Tata Tigor EV) यांचा समावेश आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक कार सध्या देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक कार मॉडेल ठरल्या आहेत.

महाराष्ट्र अन्‌ गोव्यातही वितरण

टाटा मोटर्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे. यात लिहिले आहे, की ‘टाटा मोटर्सने चेन्नईमधील एका समारंभात ग्राहकांना 101 ईव्ही कार्सचे यशस्वीरीत्या वितरण केले आहे. तामिळनाडूमध्ये एका दिवसात वितरित करण्यात आलेल्या ईव्ही कार्सची ही सर्वाधिक संख्या असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. दरम्यान, टाटा मोटर्सने एकाच दिवसात महाराष्ट्र आणि गोव्यातही 712 नेक्सॉन ईव्ही आणि टिगोर ईव्ही वितरण केले आहे. यामध्ये 564 नेक्सॉन ईव्ही आणि 148 टिगोर ईव्हीचा समावेश आहे.

विक्रीत 432 टक्के वाढ

भारतात टाटा मोटर्स ही इलेक्ट्रिक फोर व्हीलर सेगमेंटमधील आघाडीची कार निर्माता कंपनी असून यात तिचा तब्बल 85 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. गेल्या महिन्यात, टाटाने 3,357 इलेक्ट्रिक वाहनांसह आतापर्यंतची सर्वोच्च ईव्ही कार्सची विक्री नोंदवली आहे. गेल्या एका वर्षात, टाटा मोटर्सने 19,106 युनिट्सची विक्री केली असून मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 353 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ईव्हीची तिन महिन्यातील विक्री 9,095 युनिट्सवर होती, त्यात आता तब्बल 432 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक कारच्या श्रेणीसाठी कंपनीला सरासरी 5,500 ते 6,000 बुकिंग्स मिळत आहेत. मागणी वाढल्याने आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे.

नेक्सॉन ईव्हीची सर्वाधिक विक्री

टाटा मोटर्स तिच्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओमध्ये तीन मॉडेल्सची विक्री करीत आहे. यात, नेक्सॉल ईव्ही, टिगोर ईव्ही आणि एक्सपीआरईएस-टी चा समावेश आहे. त्यात, नेक्सॉन ईव्ही आतापर्यंतची सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार बनली आहे. ही कार एका चार्जवर 312 किमी एआरएआय प्रमाणित श्रेणीसह येते. याला एक शक्तिशाली 129 PS परमनेंट मॅगनेट एसी मोटर आणि उच्च क्षमतेचा 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो.

संबंधित बातम्या

भारतीय सैन्याच्या सामर्थ्याला बळ! AK-47 रायफलचे अपग्रेड व्हर्जन हाती, खासियत जाणून घ्या

Ulhasnagar Fraud : चंद्रावर जमीन घेणाऱ्यानं 770 स्क्वेअर फूट जागा लाटली? उल्हासनगरच्या राम वाधवाविरोधात फसवणुकीचा गुन्हा

Poultry Farmers: कोरोनानंतर आता पुन्हा पोल्ट्री व्यावसायिक संकटात; अतिउष्णतेमुळे कोंबड्या मृत, कोंबड्यांना वाचवण्यासाठी खर्च वाढला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.