Kinetic Luna | आता आली ईलेक्ट्रिक कायनेटिक लूना, 500 रुपयांत उद्यापासून बुक करा
Kinetic Luna | ई-लूनाचे बुकिंग प्रजासत्ताक दिनापासून 26 जानेवारीपासून सुरु होत आहे. ग्राहकांना केवळ 500 रुपये देऊन ही ई-लूना बुक करता येईल. कायनेटिकचा पहिला लूक पण प्रजासत्ताक दिनी सर्वांसमोर येईल. ही ई-लूना ग्राहकांना 50 किमी प्रति तासचा वेग देईल.
नवी दिल्ली | 25 January 2024 : kinetic Luna ही अनेकांची पहिली क्रश होती. पूर्वी भारतीय रस्त्यांवर कायनेटिक लूना धावत होती. शहरीच नाही तर ग्रामीण भागात पण हा फिरण्याचा एक स्वस्त पर्याय होता. कमी जागा आणि लोटण्यासाठी पण एकदम सोपी असल्याने अनेक जण पूर्वी कायनेटिक लूना खरेदीसाठी आग्रही होते. पण नंतर आलेल्या अनेक बाईक आणि स्कूटरने लूनाचे मार्केट संपवून टाकले. त्यामुळे kinetic Luna भारतीय रस्त्यांवरुन गायब झाली. पण आता नवीन रुपड्यात ती पुन्हा धावण्यासाठी सज्ज झाली आहे. आता ई-बाईकच्या रुपात ती धावणार आहे.
kinetic Green
आता कंपनीने kinetic Green च्या बॅनरखाली ई-लूना लाँच करण्याची तयारी केली आहे. लूना पुन्हा एकदा भारतीय रस्त्यावर धावताना दिसेल. ही E-Luna भारतीय रस्त्यांवर कमबॅक करत आहे. या ई-लूनाचे बुकिंग शुक्रवारपासून सुरु होत आहे. बुकिंग सुरु झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत ही बाईक लाँच होईल. बाजारात दाखल होईल. तुम्ही स्वस्त इलेक्ट्रिक मोबिलिटी पसंत करत असाल तर ई-लूना हा एक चांगला पर्याय ठरु शकतो.
या असेल या ई-लूनाची किंमत
कायनेटिक ई-लूनाचे बुकिंग 26 जानेवारीपासून देशभरात सुरु होत आहे. कंपनी याच दिवशी या लूनाचा लूक समोर आणेल. तर ई-लूना 50 किमी प्रति तासचा सर्वाधिक वेग देईल. ग्राहक लूना खरेदी करताना फेम-2 स्कीम अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकतील. पण कायनेटिक ई-लूनाची किंमत किती असेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ही लूना 82000 रुपयांच्या जवळपास बाजारात दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ई-लूनाची टक्कर बजाज इलेक्ट्रिक चेतक आणि इलेक्ट्रिक वेस्पा स्कूटरसोबत असेल.
प्रत्येक महिन्याला इतक्या ई-लूना
कायनेटिक महाराष्ट्रातील अहमदनगरमधील प्लँटमध्ये ई-लूना तयार करणार आहे. कंपनीनुसार या प्लँटमध्ये दर महिन्याला 5000 ई-लूना तयार होणार आहेत. कंपनीला विश्वास आहे की, लोकांचे ई-लूनाला तसेच प्रेम मिळेल आणि तिची जोरदार विक्री होईल. कायनेटिकने देशभरात लूनाचे 5 लाख यूनिट विक्री केली होती.
2000 रुपयांत झाली होती सुरुवात
कायनेटिकने 1970-80 च्या दशकात लूनाला केवळ 2000 रुपयांच्या किंमतीत बाजारात उतरवले होते. लूनाने 28 वर्षांपर्यंत मोपेड सेगमेंटमध्ये अधिराज्य गाजवले. बाजारात या मोपेडचा 95 टक्के वाटा होता. पण 2000 मध्ये बाजारात दूचाकीत अनेक नवनवीन प्रयोग झाले. अनेक नवीन बाईक आल्या. त्यातच ग्राहकांना खरेदीसाठी अनेक पर्याय मिळाल्याने लूनाचे उत्पादन थांबवावे लागले.