Nissan Magnite की Renault Kiger, विक्रीच्या बाबतीत कोणती कार अव्वल?

सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही Nissan Magnite आणि Renault Kiger या दोन्ही गाड्यांनी मार्च 2021 मध्ये भारतीय बाजारात धुमाकूळ घातला आहे.

Nissan Magnite की Renault Kiger, विक्रीच्या बाबतीत कोणती कार अव्वल?
Renault Kiger - Nissan Magnite
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 4:14 PM

मुंबई : भारतात गेल्या काही वर्षांपासून एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हींना चांगलीच पसंती मिळत आहे. त्यामुळे अनेक कार कंपन्या भारतीयांची मागणी आणि पसंती लक्षात घेत गाड्या डिझाईन करुन भारतीय मार्केटमध्ये लाँच करत आहेत. निसान कंपनीने गेल्या वर्षी 3 डिसेंबर रोजी Nissan Magnite ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतात लाँच केली होती. ही कार भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 5.59 लाख रुपये इतकी आहे. या कारला टक्कर देण्यासाठी नुकतीच रेनॉ कंपनीने त्यांची Renault Kiger ही दमदार कार लाँच केली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5.45 लाख रुपये इतकी आहे. दरम्यान, मार्च महिन्यात या दोन्ही गाड्यांनी भारतीय बाजारात धुमाकूळ घातला आहे. (Renault Kiger Beat Nissan Magnite In March 2021 Sales)

डिसेंबर 2020 मध्ये, निसानने भारतात मॅग्नाइट SUV लाँच केली आणि या सेगमेंटमध्ये मोठा धमाका केला. त्यानंतर दोनच महिन्यात रेनॉ कंपनीने त्यांची सब-फोर मीटर SUV कायगर लाँच केली. कायगरसुद्धा या सेगमेंटमधील उत्तम कार असल्याचे आता सिद्ध झालं आहे. या सेगमेंटमध्ये दोन्ही वाहनांची जोरदार स्पर्धा सुरु आहे. मार्च 2021 मध्ये या दोन्ही गाड्या टॉप -10 बेस्ट सेलिंग कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

दोन्ही कार बेस्ट सेलिंग ठरल्या असल्या तरी मार्च 2021 मधील विक्रीच्या बाबतीत रेनॉ कायगरने मॅग्नाईटला मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. मार्च महिन्यात रेनॉने कायगरच्या 3839 युनिट्सची विक्री केली आहे तर निसानने मॅग्नाईटच्या 2987 युनिट्सची विक्री केली आहे. मार्च 2021 मधील विक्रीच्या बाबतीत कायगरचा देशात सहावा क्रमांक लागतो तर मॅग्नाईट आठव्या क्रमांकावर आहे.

कशी आहे मॅग्नाईट?

निसान कंपनीने ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही चार ट्रिममध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये XE, XL, XV आणि XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश असेल. मॅग्नाइटचे मायलेज 1.0 लीटर पेट्रोल 18.75kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (MT) वर 20kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (CVT) वर 17.7kmpl चे मायलेज देते. भारतात Nissan Magnite ची सुरूवातीची किंमत 5 लाख 59 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. निसान मॅग्नाइट ही एसयूव्ही 11 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुक करता येईल.

कशी आहे कायगर?

रेनॉ इंडियाने (Renault India) त्यांची सब फोर मीटर SUV कायगर (Renault Kiger) चार दिवसांपूर्वी (15 फेब्रुवारी) भारतात लाँच केली आहे. नवीन रेनॉ कायगरची एक्स-शोरूम किंमत 5.45 लाख रुपयांपासून सुरु होते. तर या कारच्या टॉप वेरियंटची किंमत 9.55 लाख रुपये इतकी आहे. रेनॉ कायगरमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 99 bhp पॉवर आणि 160 Nm टॉर्क निर्माण करु शकतं. सोबतच 5 स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन स्टँडर्डची सुविधा असेल. AMT सह सीवीटी ट्रांसमिशनचा पर्यायही देण्यात आला आहे. रेनॉ कायगरमध्ये मल्टीसेंस ड्राइव्ह मोड फीचर देण्यात आलं आहे. ही कार इको, नॉर्मल आणि स्पोर्ट मोडवर चालवता येईल.

Renault Kiger ही कार कंपनीने एकूण 4 वेरिएंटमध्ये सादर केली आहे. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ मॉडलचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला रेनॉ कायगरच्या सर्व वेरियंट्सच्या किंमतीबाबतची माहिती देणार आहोत. जेणेकरुन त्यापैकी कोणतं वेरियंट तुमच्यासाठी बेस्ट आहे, हे तुम्ही ठरवू शकाल. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कारची निवड करु शकाल.

निसान मॅग्नाईटच्या सर्व (10) व्हेरियंट्सच्या किंमती

  1. Magnite XE – 5.59 लाख रुपये
  2. Magnite XL – 6.32 लाख रुपये
  3. Magnite XV – 6.99 लाख रुपये
  4. Magnite XV Premium – 7.68 लाख रुपये
  5. Magnite Turbo XL – 7.49 लाख रुपये
  6. Magnite Turbo XV – 8.09 लाख रुपये
  7. Magnite Turbo XV Premium – 8.89 लाख रुपये
  8. Magnite Turbo XL CVT – 8.39 लाख रुपये
  9. Magnite Turbo XV CVT – 9.02 लाख रुपये
  10. Magnite Turbo XV Premium CVT – 9.74 लाख रुपये

रेनॉ कायगरच्या सर्व (12) व्हेरियंट्सच्या किंमती

Kiger चे वेरिएंट्स RXE RXL RXT RXZ
Energy MT 5.45 लाख रुपये 6.14 लाख रुपये 6.60 लाख रुपये 7.55 लाख रुपये
Easy-R AMT 6.59 लाख रुपये 7.05 लाख रुपये 8.00 लाख रुपये
Turbo MT 7.14 लाख रुपये 7.60 लाख रुपये 8.55 लाख रुपये
X-Tronic CVT 8.60 लाख रुपये 9.55 लाख रुपये

मॅग्नाईटमध्ये दोन इंजिनांचा पर्याय

Nissan Magnite मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल तर दुसरं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. या SUV चं नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन 999cc आहे, जे 6,250rpm वर 71 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करु शकेल आणि 3,500rpm वर 96nm इतकं पीक टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह सादर करण्यात आलं आहे. दुसरं इंजिन 1.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5,000 आरपीएम वर 99 बीएचपीची पॉवर आणि 2,800 आरपीएम वर 160 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं.

या एसयूव्हीच्या फिचर्समध्ये 8 इंचांची फ्लोटिंग टच स्क्रिन, 7 इंच टीएफटी मीटर, व्हॉइस रेकग्निशन, पुश बटन स्टार्ट, क्रुज कंट्रोल, 360 डिग्री अराऊंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 6 स्पीकर ऑडियो, ऑटोमॅटिक एसी, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमचा समावेश आहे. (comparison of Nissan Magnite Vs Renault Kiger)

Nissan Magnite मधील इतर खास फिचर्स

⦁ Nissan Magnite मध्ये Bi Projector LED हेडलँम्प्स देण्यात आले आहेत.

⦁ LED DRL, LED इंडिकेटर

⦁ 16 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स

⦁ व्हाइस रेकग्निशन, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, हाइट अडजस्टेबल ड्राइवर सीट, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर आणि एयर प्यूरिफायर सह जबरदस्त फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.

सुरक्षेच्या बाबतीत मॅग्नाईट अव्वल

निसान मॅग्नाईटने ASEAN NCAP (New Car Assessment Program) मध्ये नुकतीच तिची पहिली क्रॅश टेस्ट दिली. ज्यामध्ये ही कार पास झाली आहे असं म्हणावं लागेल. कारण या क्रॅश टेस्टमध्ये मॅग्नाईटला 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. क्रॅश टेस्टबाबत NCAP ने म्हटलं आहे की, निसानच्या या 2020 च्या मॉडेलने सहजपणे क्रॅश टेस्ट पास केली आहे आणि आम्ही त्याचा रिपोर्ट लवकरच सादर करु.

Renault Kiger चे फीचर्स

या गाडीमधील इंस्ट्रूमेंट क्लस्टर पूर्णपणे डिजिटल आहे. थ्री स्पोक स्टीयरिंग व्हील, 8 स्पीकर साउंड सिस्टम, फ्लोटिंग टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग पॅड, सिलेक्टिव ड्राइव्ह मोड, प्रीमियम क्वालिटी सीट्स, प्लास्टिक कवर्ड दरवाजे, फिलिप्स एयर प्यूरीफायर, रियर एसी वेंट्स, 405 लीटर बूट स्पेससारख्या अनेक फीचर्समुळे ही कार बेस्ट एसयूव्ही ठरू शकते.

देखभालीसाठी कमी खर्च आणि उत्तम ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्सच्या अनुभवासाठी सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारची मागणी सध्या वाढली आहे. ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेता अनेक कंपन्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारचे उत्पादन करत आहेत. त्यामुळेच जगप्रसिद्ध असेलेली फ्रान्सची कंपनी Renault ने आज कायगर (Kiger) ही एसयूव्ही बाजारात सादर केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार एसयूव्हीची सुविधा असणारी ही आतापर्यंतची सर्वांत स्वस्त कार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारची किंमत 5.45 लाख रुपये आहे. याआधी Nissan कंपनीची Magnite ही एसयूव्ही नुकतीच लॉन्च झाली होती. या करची किंमत 4.99 लाख रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार या करची किंमत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे Renault ची Kiger सर्वात स्वस्त एसयूव्ही ठरू शकते.

कसं आहे Renault Kiger चं डिझाइन?

या एसयूव्हीच्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर एक स्कल्प्टेड टेलगेट, एक एलईडी टेल लँप क्लस्टर, रिफ्लेक्टरसह हाय माउंट स्टॉप दिवे, टेलगेट माउंटेड स्पॉइलर, वायपर आणि बम्पर असणार आहेत. इतकंच नाहीतर परवाना प्लेट रीसेस बम्परवर असेल. याच्या पुढच्या बाजूला ब्लॅक बम्पर क्लेडिंग, 16 इंच अ‍ॅलोय व्हील, ब्लॅक बी पिलरही देण्यात आलं आहे.

या गाडीच्या इंटीरियरबद्दल बोलायचं झालं तर, त्याला ड्युअल-टोन कलर देण्यात आला आहे. याशिवाय Apple Car Play आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, स्वयंचलित हवामान नियंत्रण, क्रूझ कंट्रोल, पुश बटण स्टार्ट आणि स्टॉप बटन्स, क्रूज़ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट आणि स्टॉप बटन, माउंटेड कंट्रोल्ससोबतच मल्टी-फंक्शनल स्टीअरिंग व्हील देण्यात आलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Kiger ही भारतात तयार होणारं जागतिक उत्पादन असणार आहे. नवीन रेनॉ कायगर ही कार किया सोनेट, ह्युंदाई वेन्यू, मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, टाटा नेक्सॉन, महिंद्रा केयूव्ही 300 आणि इतर कार्ससाठी तगडा स्पर्धक असणार आहे.

बेस्ट एसयूव्ही कोणती?

निसान मॅग्नाईट आणि रेनॉ कायगर या दोन्ही गाड्यांच्या किंमती पाहिल्या तर तुम्हीही म्हणाल की, या व्हॅल्यू फॉर मनी अशा कार आहेत. मॅग्नाईट सुरक्षेच्या बाबतीत अव्वल आहे. तर फीचर्समध्ये कायगर मॅग्नाईटपेक्षा थोडी अधिक दमदार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही गाड्यांच्या बेस व्हेरियंटला मोठी मागणी आहे. मॅग्नाईटसाठीचा वेटिंग पिरियड तर खूप मोठा (8 महिन्यांचा) आहे. दुसऱ्या बाजूला कायगरलाही मोठी पसंती मिळत आहे.

संबंधित बातम्या

Tata Altroz भारतीय बाजारात धुमाकूळ, विक्रीत तब्बल 558 टक्क्यांची वाढ

Renault India चा जलवा, गाड्यांच्या विक्रीत तब्बल 278 टक्क्यांची वाढ

(Renault Kiger Beat Nissan Magnite In March 2021 Sales)

सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.